वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०१ पृ. १
  • देवाचे वचन नीट हाताळा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे वचन नीट हाताळा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • सत्याचे वचन कुशलतेने हाताळा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • तुम्ही देवाचे वचन नीट शिकविता का?
    आमची राज्य सेवा—१९९६
  • तुमच्या उपाध्यपणात कुशल व्हा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ‘आत्म्याच्या तरवारीचा’ कुशलतेने वापर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km १२/०१ पृ. १

देवाचे वचन नीट हाताळा

१ एका अधिकाऱ्‍याला साक्ष देताना, “फिलिप्पाने बोलावयास आरंभ केला व ह्‍या [एका विशिष्ट] शास्त्रलेखापासून सुरवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.” (प्रे. कृत्ये ८:३५) फिलिप्प ‘सत्याचे वचन नीट हाताळत’ होता. (२ तीम. २:१५, NW) पण प्रवासी पर्यवेक्षकांना असे दिसून आले आहे की बरेच प्रचारक साक्षकार्य करताना क्वचितच बायबलचा उपयोग करतात. तुम्ही सेवाकार्यात बायबलचा उपयोग करता का?

२ आपण जे काही मानतो व शिकवतो त्याचा मूलाधार देवाचे वचनच आहे. (२ तीम. ३:१६, १७) हेच वचन लोकांना यहोवाकडे आकर्षित करते आणि त्यांना जीवनदायक ज्ञान देते. म्हणूनच सेवाकार्यात आपल्या आवडीच्या विषयांवर संभाषण करण्याऐवजी बायबलचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. (इब्री ४:१२) बहुतेक लोकांना बायबलविषयी फार कमी ज्ञान असल्यामुळे आपण त्यातून वाचून त्यांना हे दाखवले पाहिजे की त्यात कोणते व्यवहारोपयोगी मार्गदर्शन आहे आणि मानवजातीच्या भविष्याकरता कोणती आशा देण्यात आली आहे.

३ सरळ बायबलमधून वाचून दाखवा: सेवेला जाताना तुम्ही असे करून पाहू शकता. मोठी बॅग नेण्याऐवजी, त्या महिन्यात द्यावयाचे साहित्य एखाद्या लहानशा, सुटसुटीत बॅगेत ठेवून बायबल हातात घ्या. एखाद्या व्यक्‍तीशी संभाषण सुरू झाल्यावर तुम्ही काहीतरी उपदेश देत आहात असे त्या व्यक्‍तीला न वाटू देता सहज बायबल उघडा. अशा ठिकाणी बसा किंवा उभे राहा ज्यामुळे ऐकणारी व्यक्‍ती देखील बायबलमध्ये पाहू शकेल. तुम्ही त्या व्यक्‍तीलाही ते वचन मोठ्याने वाचायला सांगू शकता. केवळ तुमच्या तोंडून ऐकण्यापेक्षा जेव्हा ती व्यक्‍ती एखादी गोष्ट लिहिलेली आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहते तेव्हा तिचा अधिक गहिरा प्रभाव पडतो. अर्थात त्या वचनातील माहितीचा अर्थ तुम्ही समजावून सांगू शकता आणि ज्या शब्दांतून मुख्य विचार कळवण्यात आला आहे त्यांवर अधिक जोर देऊ शकता.

४ एक-वचन सादरता: स्वतःची ओळख करून दिल्यानंतर तुम्ही असे म्हणू शकता: “आज लोक निरनिराळ्या मार्गांनी जीवनाकरता उपयुक्‍त मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या मते सर्वात उत्तम जीवनोपयोगी मार्गदर्शन आपल्याला कोण देऊ शकते? [उत्तर ऐकून घ्या.] या विधानाविषयी तुम्हाला काय वाटते? [नीतिसूत्रे २:६, ७ वाचा आणि उत्तर ऐकून घ्या.] मनुष्याची बुद्धी अतिशय उणी पडली आहे आणि यामुळे कित्येक लोकांना दुःखद परिणाम भोगावे लागले आहेत. याउलट देवाची बुद्धी नेहमीच विश्‍वासार्ह आणि हितकारक ठरली आहे.” यानंतर साहित्य दाखवा आणि त्यातून देवाच्या व्यवहारोपयोगी बुद्धीचे एक उदाहरण सांगा.

५ येशूने प्रामाणिक हृदयाच्या लोकांना मदत करण्यासाठी शास्त्रवचनांचा उपयोग केला. (लूक २४:३२) पौलाने देखील जे शिकवले त्याचे पुरावे शास्त्रवचनांतून दाखवले. (प्रे. कृत्ये १७:२, ३) आपण देवाचे वचन हाताळण्यात अधिकाधिक निपुण होत गेल्यास सेवेतील आपला आत्मविश्‍वास आणि आनंद उत्तरोत्तर वाढत जाईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा