मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“तुम्ही अशा एका जगाची कल्पना करू शकता का जिथे, यहुदी व अरबी, हिंदू व मुस्लिम, काळे आणि गोरे, कॅथलिक व प्रॉटेस्टंट हे सर्व सुखाने नांदतील? हे अशक्य आहे असे कदाचित तुम्हाला वाटेल. परंतु, संपूर्ण जगभरातील लोकांना अशा पूर्वग्रहांवर व द्वेषावर मात करण्यास कशाप्रकारे मदत करण्यात आली त्याबद्दलची या मासिकातील माहिती वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल.”
टेहळणी बुरूज नोव्हें.१५
“‘येशू आपल्यासाठी मरण पावला,’ हे वाक्य तुम्ही ऐकले असेल. [योहान ३:१६ वचन बोलून दाखवा.] पण एका मनुष्याच्या मृत्यूमुळे आपल्या सर्वांचे जीवन कसे वाचू शकते याचा तुम्ही कधी विचार केलात का? [घरमालकाचे मत ऐका.] बायबल याचे साधेसोपे उत्तर देते. ‘येशू तारण करतो—कसे?’ हा लेख त्याचे वर्णन करतो.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“बहुतेक धर्मातील लोक विश्वास करतात की, विश्वाची निर्मिती करणारा एक परमेश्वर आहे. तुमचाही आहे का? [समोरच्या व्यक्तीचे मत ऐका.] पण तो कोण आहे हे जाणून घेणे शक्य आहे का असा कदाचित तुमच्या मनात विचार आला असेल. या लेखात सांगितले आहे की एका आदिवासी स्त्रीला बायबलमधून दाखवल्यावर देवाचे नाव काय आहे ते समजले. [निर्गम १५:३ वाचा.] हे नाव माहीत झाल्यावर तिच्या जीवनात कशाप्रकारचा बदल झाला हे तुम्हाला नक्कीच वाचायला आवडेल.”
टेहळणी बुरूज डिसें.१
“वर्षाच्या या वेळी, पुष्कळ लोक बक्षीसे देण्या-घेण्यात व इतर दयाळू कार्ये करण्यात गुंतले आहेत. यावरून सुवर्ण नियमाची आठवण होते. [मत्तय ७:१२ वाचा.] या नियमानुसार संपूर्ण वर्षभर जगणे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? [घरमालकाचे मत ऐका.] हे मासिक तुम्हाला ‘सुवर्ण नियम—आजही लागू होतो का?’ या विषयावर आणखी माहिती देते.”