वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०१ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००१
आमची राज्य सेवा—२००१
km १२/०१ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक द्यावे. जानेवारी: मंडळीच्या साठ्यामध्ये असलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक. कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाचा साठा असलेल्या मंडळ्या हे पुस्तक सादर करू शकतात. फेब्रुवारी: जीवन—ते कसे अस्तित्वात आले? उत्क्रांतीने की निर्मीतीने? (इंग्रजी), प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे!, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा मंडळीच्या साठ्यामध्ये असलेले कोणतेही १९२ पानी पुस्तक. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करण्यात येईल.

◼ सन २००३ चा स्मारक विधी बुधवार, एप्रिल १६ रोजी सूर्यास्तानंतर असेल याकडे कृपया लक्ष द्यावे. ही आगाऊ सूचना देण्याचा उद्देश असा की एकच राज्य सभागृह अनेक मंडळ्या वापरत असल्यामुळे स्मारक विधीकरता इतर सभागृह भाड्याने घेणे आवश्‍यक असल्यास, बांधवांना सभागृहांकरता आधीपासूनच आवश्‍यक तरतुदी किंवा बुकींग करता यावी. स्मारक विधी शांतीने आणि सुव्यवस्थित पार पडावा म्हणून भाड्याने घेतलेल्या सभागृहाच्या इमारतीत त्या दिवशी इतर कोणत्या कार्यक्रमामुळे गडबड किंवा गोंधळ असणार नाही याविषयी वडिलांनी सभागृहाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्‍यांकडून आधीच कबूल करून घ्यावे. ही सभा अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे याप्रसंगी भाषण कोण देणार हे ठरवताना वडील वर्गाने दर वर्षी आलटून पालटून भाषण देण्यापेक्षा किंवा दर वर्षी एकाच बांधवाने भाषण देण्यापेक्षा जो बांधव अधिक चांगल्याप्रकारे भाषण देऊ शकेल त्याची निवड करावी. अभिषिक्‍तांपैकी एक सुयोग्य बांधव भाषण देण्याकरता उपलब्ध असल्यास त्यांची निवड केली जावी.

◼ नोव्हेंबर १, २००१ अंकापासून आसामी व मिझो भाषांत टेहळणी बुरूज हे मासिकाच्या स्वरूपात प्रकाशित होईल.

◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

बायबलच्या प्राथमिक शिकवणुकी —ओडिया

तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (पत्रिका क्र. २६) —आसामी, इंग्रजी, कन्‍नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी

यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरता प्रकाश १ —गुजराती

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा