घोषणा
◼ साहित्य सादरता नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. लोकांकडे आधीपासूनच ही प्रकाशने असल्यास, देवाच्या शोधात मानवजात (इंग्रजी), किंवा इतर कोणतेही जुने प्रकाशन सादर करता येऊ शकते. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक द्यावे. जानेवारी: मंडळीच्या साठ्यामध्ये असलेले कोणतेही १९२ पृष्ठांचे जुने पुस्तक. कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाचा साठा असलेल्या मंडळ्या हे पुस्तक देखील सादर करू शकतात. फेब्रुवारी: जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी), प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आहे!, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य, किंवा तुमच्या मंडळीच्या साठ्यात असलेले १९२ पानाचे कोणतेही जुने पुस्तक.
◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने डिसेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
◼ मंडळीतल्या सर्वांनी टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या सर्व नवीन व नूतनीकरण वर्गण्याही मंडळीमार्फतच पाठवाव्यात.
◼ शाखा दप्तर प्रचारकांच्या वैयक्तिक साहित्य मागण्यांची पूर्ती करत नाही. मंडळीची दर महिन्याची साहित्य मागणी संस्थेला पाठवण्यापूर्वी, अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी दर महिन्याला मंडळीत याची घोषणा करण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून ज्यांना साहित्य हवे आहे ते संबंधित बांधवाकडे त्याची ऑर्डर देऊ शकतील. कोणती प्रकाशने खास मागणीची (स्पेशल रिक्वेस्टची) आहेत ते कृपया लक्षात ठेवा.
◼ प्रांतीय अधिवेशनासाठी असलेल्या बॅज कार्डाच्या प्लास्टिक होल्डरचा मर्यादित साठा उपलब्ध आहे. मंडळ्या लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) भरून आपल्या आवश्यक तेवढ्याच मागण्या पाठवू शकतात. पुढील वर्षी वापरता यावेत म्हणून ते जपून ठेवण्याचे सर्वांना उत्तेजन दिले जाते.
◼ टेरिटरी मॅप कार्डांचे (S-12) प्लास्टिक व्होल्डर्स उपलब्ध आहेत. मंडळ्या लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) भरून याची मागणी पाठवू शकतात.
◼ नवीन प्रकाशने उपलब्ध:
वॉचटावर (२००० जाड पुठ्ठ्यांचा बांधणी खंड) —इंग्रजी
सावध राहा! (२००० जाड पुठ्ठ्यांचा बांधणी खंड) —इंग्रजी
तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (ट्रॅक्ट क्र. २६) —आसामी, इंग्रजी, कन्नड, तामीळ, तेलगू, मराठी, मल्याळम, मिझो, हिंदी
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
पवित्र शास्त्रवचनांचे नवीन जग भाषांतर—१९८६ आवृत्ती (सामान्य आवृत्ती; bi12 समासातील संदर्भासहित) —इंग्रजी
तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे —इंग्रजी, हिंदी, कन्नड, नेपाळी
शास्त्रवचनांतून युक्तीवाद करणे —इंग्रजी
बायबल चर्चा कशारीतीने सुरू करून चालू ठेवाव्यात —हिंदी
चर्चेसाठी बायबल विषय —कन्नड
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान —तेलगू