वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०१ पृ. ५-६
  • तुमची समजशक्‍ती वाढवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची समजशक्‍ती वाढवा
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • नवीन खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२०००
  • तरुणांनो—आपल्या ज्ञानेंद्रियांचा सराव करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुम्ही ‘बऱ्‍यावाईटातला भेद ओळखू’ शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • आपली समजशक्‍ती प्रशिक्षित करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ११/०१ पृ. ५-६

तुमची समजशक्‍ती वाढवा

१ आपण सध्या राहत असलेल्या पीडादायक शेवटल्या दिवसांनी देवाच्या लोकांवर नाना प्रकारचे दबाव आणि गंभीर परीक्षा आणल्या आहेत. (२ तीम. ३:१-५) विश्‍वासात मजबूत राहण्याकरता आपल्या सर्वांना उत्तेजनाची आवश्‍यकता आहे. (१ करिंथ. १६:१३) यहोवाच्या मदतीने आपण त्याच्या वचनाचा नियमितरीत्या अभ्यास केला, त्याच्या पवित्र आत्म्यावर अवलंबून राहिलो, त्याच्या संघटनेशी जडून राहिलो तरच आपण विश्‍वासात स्थिर राहू शकतो.—स्तो. ३७:२८; रोम. ८:३८, ३९; प्रकटी. २:१०.

२ “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा” हा, या वर्षाच्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाचा विषय अगदी उचित होता. तो १ करिंथकर १४:२० वचनावर आधारित होता. तेथे प्रेषित पौल असे म्हणतो: “बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.” या कार्यक्रमाविषयी तुम्हाला काय वाटले?

३ “किती प्रोत्साहनदायक कार्यक्रम होता!” “आम्हाला याचीच गरज होती!” बांधवांच्या प्रतिसादाची केवळ ही दोन उदाहरणे आहेत. खास संमेलन दिवशी आपल्या १२ वर्षीय मुलीचा बाप्तिस्मा पाहायला आलेल्या एका साक्षीदार नसलेल्या पित्याने म्हटले, की कार्यक्रम पाहून ते अतिशय प्रभावीत झाले आणि हा कार्यक्रम आपल्या कुटुंबाच्या लाभासाठी आहे असेही त्यांना वाटले. तुम्हालाही असेच वाटते का? आपण कार्यक्रमातील काही ठळक मुद्द्‌यांची आठवण करू या.

४ समजशक्‍ती वाढवण्यासाठी अक ज्ञानाची आवश्‍यकता आहे: “समजुतदारपणा आता विकसित करा” या पहिल्या भाषणात, आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कशाची आवश्‍यकता असल्याचे वक्‍त्‌याने सांगितले? फक्‍त बौद्धिक क्षमता पुरेशी नाही. आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या दुष्टाईवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला बायबलबद्दलची समजशक्‍ती विकसित करून ती वाढवण्याची गरज आहे. यासाठी आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची आवश्‍यकता आहे. आपल्याला त्याचे नियम समजवावेत, त्याच्या निर्बंधांची आठवण करून द्यावी, अशी आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणे यहोवाला विनंती करू शकतो; जेणेकरून आपण पूर्ण मनाने त्याची सेवा करू शकतो.—स्तो. ११९:१, २, ३४.

५ पुढील भागात, विभागीय पर्यवेक्षकांनी दाखवून दिले, की यहोवा आपले वचन आणि आपली संघटना यांच्याद्वारे “बायबल समजण्यात प्रौढ होण्यासाठी मदत” करतो. समज याचा अर्थ, “एखादी गोष्ट जवळून पाहण्याची व तिच्यातील विविध भागांचा आणि संपूर्ण गोष्टीचा संबंध काय ते ग्रहण करण्याद्वारे त्या गोष्टीची रचना व तिचा अर्थ समजून घेण्याची क्षमता,” असे सांगण्यात आले होते. ही क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला कोण मदत करू शकेल? आध्यात्मिक प्रगती करण्यास आपल्याला मदत करण्याकरता यहोवाने मनुष्यांमध्ये दाने दिली आहेत. (इफिस. ४:११, १२) त्याची पृथ्वीवरील संघटना आपल्याला देवाचे वचन दररोज वाचण्यास व मंडळीच्या सर्व सभांना नियमाने उपस्थित राहण्यास आर्जवते. (स्तो. १:२) आपल्या व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक अभ्यासात तसेच सभांची व क्षेत्र सेवेची तयारी करताना बायबल आणि आपल्या ख्रिस्ती प्रकाशनांचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला शिकवले जाते. या सर्व व्यवस्थांचा तुम्ही फायदा घेता का? तुमचा नियमित, व्यक्‍तिगत बायबल वाचन कार्यक्रम चालू आहे का? असे केल्यानेच जगाच्या प्रवृत्ती, नाद, तत्त्वज्ञान, फसवे प्रभाव यांच्यापासून आपण स्वतःचे संरक्षण करू शकतो.—कलस्सै. २:६-८.

६ आपल्या समजशक्‍तीला आपण प्रशिक्षित केले पाहिजे: “आपल्या ज्ञानेंद्रियांना [“समजशक्‍तीला,” NW] प्रशिक्षित करण्याद्वारे आध्यात्मिकतेचे रक्षण करा” असे शीर्षक असलेल्या आपल्या पहिल्या भाषणात, भेट देणाऱ्‍या वक्‍त्‌याने सांगितले, की जगातल्या लोकांना बरोबर आणि चूक यांतला भेद कळत नाही. (यश. ५:२०, २१) कारण, ते देवाच्या धार्मिक दर्जांना स्वीकारून त्यांनुसार कार्य करत नाहीत. परंतु, यहोवाच्या संघटनेकडून आध्यात्मिक प्रशिक्षण प्राप्त करणारे आपण, आपल्या कार्यांना व वर्तणुकीला मार्गदर्शन देणारे देवाचे दर्जे स्वीकारतो. म्हणूनच, यहोवाच्या दृष्टीत जे उत्तम व ग्रहणीय व त्याच्या परिपूर्ण इच्छेनुरूप आहे ते स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या आपण स्थितीत आहोत.—रोम. १२:२

७ गोंधळून टाकणारी जगाची विचारसरणी व परिणामी वाईट प्रतिफळ आपल्याला टाळायचे असेल तर आपण सतत आपल्या समजशक्‍तीला प्रशिक्षित करीत राहिले पाहिजे. हे आपण कसे करू शकू? इब्री लोकांस ५:१२-१४ मध्ये लिहिल्याप्रमाणे प्रेषित पौलाने वचनाचे केवळ ‘दूध’ घेत राहणे पुरेसे नाही यावर भर दिला. मंडळीच्या पुस्तक अभ्यासात यशयाच्या भविष्यवाणीचा आपण जो अभ्यास करतो त्यासारखा घन आध्यात्मिक आहार आपण घेतला पाहिजे. आणि मग शिकलेल्या गोष्टींचा आपण लगेच आपल्या जीवनात अवलंब केला पाहिजे. असे आपण करतो तेव्हा, यहोवाची तत्त्वे व दर्जे किती उचित आहेत याची आपल्याला खात्री पटते. अशाप्रकारे, बरोबर आणि चूक यांतला फरक कळण्यासाठी आपल्या समजशक्‍तीला प्रशिक्षण मिळते.

८ काही जण आध्यात्मिकतेत मागे पडले आहेत ही दुःखाची गोष्ट आहे. ते का मागे पडले? यहोवाच्या दृष्टीत उत्तम व धार्मिक असलेल्या गोष्टींवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले नाही. त्यामुळे, शास्त्रवचनीय अर्थाने आक्षेपार्ह असलेले रेडिओ व टीव्हीवरील कार्यक्रम, हिणकस संगीत किंवा कम्प्युटर चॅट रुम्समधील वाईट प्रभाव या गोष्टींना ते बळी पडले. परंतु, आपण सुज्ञपणे वागलो तर अनैतिक, मूर्ख अथवा दुष्ट लोकांचा आपल्यावर होणारा कसलाही प्रभाव आपण टाळू शकतो.—नीति. १३:२०; गलती. ५:७; १ तीम. ६:२०, २१.

९ तरुणांनी “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे” असावे: या कार्यक्रमात दोन भाग होते ज्यात विशेषकरून तरुण लोकांना त्यांची समजशक्‍ती वाढवण्यास उत्तेजन दिले. “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे” असण्याचा अर्थ, यहोवाच्या नजरेत अशुद्ध असलेल्या गोष्टींच्या बाबतीत तान्ह्या मुलांसारखे कमअनुभवी असणे, असे वक्‍त्‌याने म्हटले. (१ करिंथ. १४:२०) आपल्या सर्वांना, सर्व प्रकारच्या दुष्टाईपासून व तिचा आपल्यावर प्रभाव होण्यापासून बचाव व्हावा म्हणून आपण वेळेचा उपयोग कसा करतो याविषयी अतिशय दक्ष राहण्याचे उत्तेजन देण्यात आले होते. (इफिस. ५:१५-१७) ज्यामुळे आध्यात्मिक गोष्टींची समज वाढणार नाही अशा साहित्याचे वाचन करण्यात आपण किती वेळ खर्च करतो हे पाहण्याचे आपल्याला प्रोत्साहन देण्यात आले होते. तुम्ही तसे केले का? काय दिसून आले तुम्हाला? दररोज बायबलचे वाचन करण्याव्यतिरिक्‍त, संस्था आपल्याला पुरवत असलेल्या साहित्याचे वाचन करण्याचा निश्‍चय करा. असे केल्याने आपल्या सर्वांना आणि विशेषतः तरुणांना “सूज्ञता [समज] संपादन” करण्यात मदत होईल.—नीति. ४:७-९.

१० “समजुतदारपणे बायबल सिद्धान्तांचे अनुकरण करणे लाभदायक”: हा खास संमेलन दिवसाच्या शेवटल्या भाषणाचा विषय होता. भेट देणाऱ्‍या वक्‍त्‌याने आपल्याला समजावले, की यहोवा जीवन देणाऱ्‍या समजबुद्धीचा उगम आहे व ही समज इतर मानव देत असलेल्या ज्ञानापेक्षा कैकपटीने श्रेष्ठ आहे. कल्पना करा, यहोवाची समज मिळवण्याची आपल्याला थेट संधी आहे! समज मिळण्याची प्रामाणिक इच्छा बाळगणाऱ्‍यांना व विश्‍वासाने त्याच्याजवळ मागणाऱ्‍यांना तो सढळ हाताने देतो. (नीति. २:३-५, ९; २८:५) यहोवा देत असलेल्या या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घेत आहात का?

११ बायबल वाचत असताना देवाची तत्त्वे ओळखायला शिकण्यास आपल्याला उत्तेजन दिले जाते. (२ तीम. ३:१६, १७) यहोवा काय म्हणत आहे त्याची अचूक समज मिळण्यासाठी त्या तत्त्वांचा काळजीपूर्वक अभ्यास करा. या तत्त्वांवर मनन करण्यासाठी व ती आपल्या मनावर व हृदयावर बिंबवण्यासाठी वेळ काढा. अशाने तुम्ही तुमच्या समजशक्‍तीला प्रशिक्षित करू शकाल जेणेकरून जीवनात तुम्ही यशस्वी निर्णय घेऊ शकाल. (यहो. १:८) आपण अशा काही परिस्थितींवर आता विचार करूया ज्यांचा पुष्कळ लोकांना सामना करावा लागतो आणि हेही पाहूया, की बायबल तत्त्वांचा अवलंब केल्याने आपण यशस्वी कसे होऊ शकतो.

१२ ‘वेशभूषेची व केशभूषेची अमुक पद्धत मी स्वीकारावी का?’ जगातील लोकांच्या कपडे घालण्याच्या व साजशृंगार करण्याच्या पद्धतीवरून त्यांच्यामध्ये बंडाळीचा आत्मा दिसून येतो. अशाप्रकारचा आत्मा लोकांना गबाळा, अनाकर्षक किंवा असभ्य पेहराव करण्यास प्रवृत्त करतो. अशा प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी कोणती बायबल तत्त्वे आपल्याला मदत करू शकतात? आपल्या समजशक्‍तीला आपण प्रशिक्षित केले असेल तर आपण १ तीमथ्य २:९, १० मधील तत्त्वाचा विचार करू. तिथे, “भिडस्तपणाने व मर्यादेने . . . देवभक्‍ति स्वीकारलेल्या [लोकांस] शोभते” अशाप्रकारचा पेहराव करण्यास सांगितले आहे. २ करिंथकर ६:३ व कलस्सैकर ३:१८, २० येथील इतर तत्त्वे देखील आपण लागू करू शकतो.

१३ ‘कौटुंबिक बंधने मजबूत राखण्यासाठी मी काय करू शकतो?’ कौटुंबिक सदस्यांमध्ये चांगल्या प्रकारचा सुसंवाद असला पाहिजे. याकोब १:१९ आपल्याला असे सांगते: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” कौटुंबिक सदस्यांनी एकमेकांचे ऐकून घेतले पाहिजे आणि एकमेकांशी बोलले पाहिजे कारण कौटुंबिक वर्तुळातील संवाद हा दुहेरी मार्गाप्रमाणे असतो. क्रूर, गर्विष्ठपणे किंवा निर्बुद्धपणे आपण बोलत असू तर आपले म्हणणे खरे असले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे, आपण पती असो वा पत्नी, पालक असो वा मूल, आपले संभाषण “सर्वदा कृपायुक्‍त, मिठाने रूचकर केल्यासारखे” असण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.—कलस्सै. ४:६.

१४ ‘भौतिकवादाचा माझ्यावर परिणाम होत आहे का?’ भौतिकवाद अशाप्रकारचा दबाव आहे जो एखाद्याचे जीवन अतिशय क्लिष्ट बनवतो. तो लोकांना खरा आनंद देत नाही. (उप. ५:१०; लूक १२:१५; १ तीम. ६:९, १०) भौतिकवादाचा पाश टाळण्यास आपल्याला मदत करण्याकरता येशूने हे महत्त्वपूर्ण तत्त्व शिकवले: आपला डोळा निर्दोष ठेवा. संतुलित व साधेसुधे जीवन जगणे म्हणजे राज्यावर आपली नजर केंद्रित ठेवणे आणि इतर सर्व गोष्टींना दुय्यम स्थान देणे.—मत्त. ६:२२, २३, ३३.

१५ आपला हेतू काय असला पाहिजे: देवाचे वचन जे धार्मिक तत्त्वांचा विश्‍वसनीय उगम आहे आपल्याला निर्णय घेण्यास मार्गदर्शन देते. ही तत्त्वे शिकण्याची, त्यांच्यावर मनन करण्याची, आपल्या जीवनात त्यांचा अवलंब कसा करायचा ते समजण्याची आपल्याला गरज आहे. अशाप्रकारे, आपल्या “ज्ञानेंद्रियांना [“समजशक्‍तीला,” NW] . . . चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” केल्याने आपला स्वतःचा फायदा होतो आणि यहोवाचा सन्मान होतो.—इब्री ५:१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा