मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“आज जगातील धार्मिक व जातीय गटांमध्ये द्वेष खदखदत आहे. अशा वातावरणात ‘आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम’ करणे उचित किंवा शक्य आहे का? [घरमालकाचे विचार ऐका.] परंतु, एका थोर शिक्षकाने हेच करायला शिकवले. त्याने म्हटले: [वाचा मत्तय ५:४४.] त्याच्या बोलण्याचा काय अर्थ होतो आणि त्याच्या शिकवणीचा आज काय परिणाम होत आहे ते या मासिकात सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज ऑक्टो.१५
“आनंदी व अधिक चांगले जग आणण्यासाठी कशाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? [घरमालकाचं मत ऐका.] जगात सुधार घडवून आणण्यासाठी मानवाने नानाविध प्रकारची सरकारे आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, याबाबतीत देवाचा काय दृष्टिकोन आहे ते पाहा. [वाचा यिर्मया १०:२३] फार लवकर जगात सुधार कसा येणार आहे याबद्दल, ‘आनंदी जगाचे रहस्य’ या लेखात माहिती दिली आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“तरुण या नात्याने, तुम्हाला सर्वात जास्त कशाविषयी चिंता वाटते? [मत ऐका.] पुष्कळ लोकांना त्यांच्या भविष्याची, परिक्षांची, नोकरीची किंवा मित्रांच्या पसंतीची चिंता असते. परंतु अधिक चिंता केल्याने आपल्यालाच त्रास होतो. [नीतिसूत्रे १२:२५ वाचा.] सावध राहाच्या! या अंकात, जीवनांतील ताणतणाव व चिंता कमी करण्याविषयी काही व्यावहारिक सल्ला दिला आहे. माझी खात्री आहे, तुम्हालाही तो फायदेकारक ठरेल.”
टेहळणी बुरूज नोव्हे.१
एखाद्या खळबळजनक बातमीबद्दल सांगितल्यावर घरमालकास विचारा: “लोक अशी दुष्कृत्ये का करतात? बरोबर काय आणि चूक काय यांतील फरक आपल्या सर्वांना समजतो. तरीसुद्धा लोक वाईटच करत असतात. का बरं? [घरमालकाचं मत ऐकल्यावर, प्रकटीकरण १२:९ वाचा.] आपल्या विवेकबुद्धीचं रक्षण करण्याद्वारे आपण स्वतःला कशाप्रकारे सुरक्षित ठेवू शकतो हे या मासिकात सांगितलं आहे.”