सन २००२ साठी ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
सन २००२ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थांनुरूप चालवली जाईल.
मूळ-पाठ: टेहळणी बुरूज [w], सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान [kl], बायबल कथांचं माझं पुस्तक [my] आणि सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य [ gt] ह्यांवर आधारित नेमणुका दिल्या जातील.
प्रशालेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने ळेवर सुरू केला जावा. कार्यक्रमात कोणते भाग हाताळले जाणार आहेत याचा सुरवातीला सारांश देण्याची गरज नाही. प्रत्येक भाग कोणत्या विषयावर आहे त्याबद्दल प्रशाला पर्यवेक्षकांनी त्या त्या भागाच्या सुरवातीला सांगावे. नंतर तो पुढील प्रकारे चालवला जावा:
नेमणूक क्र. १: १५ मिनिटे. वडील किंवा सेवा सेवकांकरवी ही नेमणूक हाताळली जावी आणि ती टेहळणी बुरूज, किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान यावर आधारलेली असेल. हा भाग टेहळणी बुरूज मासिकावर आधारित असेल तर १५ मिनिटांच्या बोधप्रद भाषणाच्या रूपात सादर केला जावा आणि त्यानंतर उजळणी प्रश्न विचारू नयेत; परंतु हा भाग ज्ञान पुस्तकावर आधारित असेल तर १० ते १२ मिनिटांच्या भाषणाच्या रूपात सादर करून ३ ते ५ मिनिटे पुस्तकातील छापील प्रश्न उजळणीसाठी विचारू शकता. केवळ साहित्य उरकणे हा या मागील हेतू नसावा तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीच्या व्यावहारिक मूल्यावर लक्ष केंद्रित करून मंडळीस अत्यंत सहायक ठरणारे मुद्दे ठळकपणे मांडणे हा असावा. आराखड्यात दिलेले शीर्षक भाषणाचा विषय म्हणून उपयोगात आणावे.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी आपले भाषण मर्यादित वेळेमध्ये संपवण्याची दक्षता घ्यावी. आवश्यक असल्यास किंवा वक्त्याने विनंती केल्यास खासगी सूचना दिल्या जाऊ शकतील.
बायबल वाचनातील ठळक मुद्दे: ६ मिनिटे. हा भाग वडिलांनी किंवा सेवा सेवकाने हाताळावा. त्यांनी स्थानिक गरजांप्रमाणे साहित्याचा प्रभावीपणे अवलंब करावा. यासाठी ठराविक विषयाची गरज नाही. हा भाग म्हणजे, नेमून दिलेल्या वाचनाचा केवळ एक सारांश नसावा. नेमून दिलेल्या अध्यायांचे ३० ते ६० सेकंदांपर्यंत संपूर्ण पुनरावलोकन यात समाविष्ट करता येईल. तथापि, या भागाचा प्रमुख हेतू, ही माहिती आपल्याकरता का व कशाप्रकारे महत्त्वाची आहे, हे जाणण्यास श्रोत्यांना साहाय्य करणे हा आहे. यानंतर प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
नेमणूक क्रमांक २: ५ मिनिटे. या नेमणुकीत एखाद्या बांधवाला बायबलच्या भागाचे वाचन नेमून दिले जाते. हे प्रशालेच्या मुख्य वर्गास तसेच उपवर्गांस लागू होईल. वाचनाच्या नेमणुका बहुधा, विद्यार्थ्याला सुरवातीच्या व समारोपाच्या विवेचनांमध्ये संक्षिप्त स्पष्टीकरणात्मक माहिती सादर करण्याएवढ्या पुरेशा असतात. यात ऐतिहासिक पार्श्वभूमी, भविष्यसूचक किंवा सिद्धान्तीय अर्थसूचकता आणि तत्त्वांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व वचने मध्यंतरी न थांबता सलग वाचली जावीत. अर्थात, वाचावयाची वचने क्रमाने नसतील तेथे वाचन पुन्हा कोठून सुरू होते त्याबद्दल विद्यार्थी सांगू शकतो.
नेमणूक क्रमांक ३: ५ मिनिटे. ही नेमणूक भगिनीला नेमून देण्यात येईल. या प्रस्तुतीचा विषय बायबल कथांचं माझं पुस्तक यावर आधारित असेल. यासाठी तुमच्या क्षेत्रात उपयोगी ठरणारी कोणतीही दृश्य रचना वापरली जाऊ शकते आणि हा भाग बसून किंवा उभे राहून सादर केला जाऊ शकतो. हा भाग करणारी विद्यार्थीनी, नेमलेला विषय कशाप्रकारे घरमालकाला समजावते तसेच घरमालकाला कशाप्रकारे शास्त्रवचनांच्या आधारे तर्क करायला मदत करते यावर प्रशाला पर्यवेक्षक अधिक लक्ष देतील. नेमणूक मिळालेल्या विद्यार्थीनीला वाचता येणे आवश्यक आहे. प्रशाला पर्यवेक्षक एक मदतनीस नेमून देतील, पण आणखी एक मदतनीस देखील घेता येऊ शकेल. दृश्य रचनेला नव्हे तर बायबलचा प्रभावीपणे उपयोग करण्याला प्राधान्य दिले जावे.
नेमणूक क्रमांक ४: ५ मिनिटे. या नेमणुकीचा विषय सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाच्या आधारावर असेल. नेमणूक क्र. ४ एखाद्या बांधवाला किंवा भगिनीला दिली जाऊ शकते. हा भाग बांधवाला नेमून दिल्यास त्यांनी तो भाषणाच्या पद्धतीनेच सादर करावा. भगिनीला नेमून दिल्यास तिने नेमणूक क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावा.
बायबल वाचन आराखडा: मंडळीतील सर्वांना साप्ताहिक बायबल वाचन आराखड्याचे अनुसरण करण्याचे उत्तेजन दिले जाते. दर दिवशी एक पान वाचल्यास तुम्ही साप्ताहिक बायबल वाचनासाठी नेमलेले अध्याय आठवड्याभरात वाचू शकता.
चना: सल्ला, वेळ, लेखी उजळणी आणि नेमणुकांची तयारी, यांविषयी अतिरिक्त माहिती व मार्गदर्शनाकरता कृपया ऑक्टोबर १९९६ ची आमची राज्य सेवा पृष्ठ ३ पाहा.
आराखडा
जाने. ७ बायबल वाचन: उपदेशक १-६
गीत क्र. २ (१५)
क्र. १: तुम्हाला आनंदी भवितव्य मिळवता येईल! (kl पृ. ६-११)
क्र. २: उपदेशक ४:१-१६
क्र. ३: निर्मिती—देवाचे अद्भुत कार्य! (my अध्याय १)
क्र. ४: वाढदिवसाच्या मेजवानीत खून (gt अध्याय ५१)
जाने. १४ बायबल वाचन: उपदेशक ७-१२
गीत क्र. ५ (४६)
क्र. १: देवाविषयीचे ज्ञान प्रकटविणारे पुस्तक-भाग १ (kl पृ. १२-१७ परि. १-१५)
क्र. २: उपदेशक ८:१-१७
क्र. ३: आपल्या पृथ्वीच्या बाबतीत देवाचा मूळ उद्देश काय होता? (my अध्याय २)
क्र. ४: येशू अद्भुतरित्या हजारोंना जेवू घालतो (gt अध्याय ५२)
जाने. २१ बायबल वाचन: गीतरत्न १-८
गीत क्र. ५ (४६)
क्र. १: देवाविषयीचे ज्ञान प्रकटविणारे पुस्तक-भाग २ (kl पृ. १७-२२ परि. १६-२३)
क्र. २: गीतरत्न ५:१-१६
क्र. ३: यहोवा पहिला विवाह लावतो (my अध्याय ३)
क्र. ४: हवासा वाटणारा असामान्य मानवी शासनकर्ता (gt अध्याय ५३)
जाने. २८ बायबल वाचन: यशया १-६
गीत क्र. ६ (४५)
क्र. १: खरा देव कोण आहे? (kl पृ. २३-३१)
क्र. २: यशया २:१-१७
क्र. ३: आपण देवाच्या आज्ञांचे नेहमीच पालन का केले पाहिजे? (my अध्याय ४)
क्र. ४: “स्वर्गातून येणारी खरी भाकर” (gt अध्याय ५४)
फेब्रु. ४ बायबल वाचन: यशया ७-११
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: आपल्याला यहोवाच्या संघटनेची गरज आहे (w०० १/१ पृ. ३०-१)
क्र. २: यशया ८:१-२२
क्र. ३: देवाच्या मार्गदर्शनाचा जाणीवपूर्वक अव्हेर केल्याचा परिणाम (my अध्याय ५)
क्र. ४: अनेक शिष्य येशूला सोडून जातात (gt अध्याय ५५)
फेब्रु. ११ बायबल वाचन: यशया १२-१९
गीत क्र. ९ (३७)
क्र. १: तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे? (w०० १/१५ पृ. २०-२)
क्र. २: यशया १७:१-१४
क्र. ३: ईर्ष्या बाळगू नका (my अध्याय ६)
क्र. ४: मनुष्य कशाने अशुद्ध होतो? (gt अध्याय ५६)
फेब्रु. १८ बायबल वाचन: यशया २०-२६
गीत क्र. ११ (८५)
क्र. १: यहोवाच्या जवळ या (w०० १/१५ पृ. २३-६)
क्र. २: यशया २२:१-१९
क्र. ३: यहोवाबरोबर चालत राहणे (my अध्याय ७)
क्र. ४: पीडितांबद्दल सहानुभूती (gt अध्याय ५७)
फेब्रु. २५ बायबल वाचन: यशया २७-३१
गीत क्र. २१ (१९१)
क्र. १: छळणाऱ्याचे डोळे उघडतात (w०० १/१५ पृ. २७-९)
क्र. २: यशया २९:१-१४
क्र. ३: हिंसक लोकांबद्दल तुमचाही दृष्टिकोन देवासारखा आहे का? (my अध्याय ८)
क्र. ४: भाकऱ्या व खमीर (gt अध्याय ५८)
मार्च ४ बायबल वाचन: यशया ३२-३७
गीत क्र. १६ (१४३)
क्र. १: सातत्याने प्रयत्न करण्याद्वारे यशस्वी व्हा (w०० २/१ पृ. ४-६)
क्र. २: यशया ३३:१-१६
क्र. ३: देवाच्या निर्देशनांचे जळवून अवलंब करण्याचे प्रतिफळ (my अध्याय ९)
क्र. ४: येशू खरोखर कोण आहे? (gt अध्याय ५९)
मार्च ११ बायबल वाचन: यशया ३८-४२
गीत क्र. २१ (१९१)
क्र. १: एका आईचा सुज्ञ सल्ला (w०० २/१ पृ. ३०-१)
क्र. २: यशया ४२:१-१६
क्र. ३: जीवन वाचवण्यासाठी आज्ञाधारकपणा आवश्यक (my अध्याय १०)
क्र. ४: ख्रिस्ताच्या राज्यवैभवाचे आगाऊ दर्शन (gt अध्याय ६०)
मार्च १८ बायबल वाचन: यशया ४३-४७
गीत क्र. २९ (२२२)
क्र. १: धोक्याच्या क्षेत्रापासून सुरक्षित अंतर राखा (w०० २/१५ पृ. ४-७)
क्र. २: यशया ४४:६-२०
क्र. ३: देव मानवजातीची काळजी घेतो याची हमी (my अध्याय ११)
क्र. ४: भूतग्रस्त मुलगा बरा होतो (gt अध्याय ६१)
मार्च २५ बायबल वाचन: यशया ४८-५२
गीत क्र. ६ (४५)
क्र. १: प्रार्थनेचे सामर्थ्य (w०० ३/१ पृ. ३-४)
क्र. २: यशया ४९:१-१३
क्र. ३: देवाचा अधिकार न जुमानता दाखवलेली मानवी शक्ती आणि क्षमता त्याला नाराज करते (my अध्याय १२)
क्र. ४: नम्रतेचा धडा (gt अध्याय ६२)
एप्रि. १ बायबल वाचन: यशया ५३-५९
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: यहोवाचा शोध घेण्याकरता आपले अंतःकरण तयार करणे (w०० ३/१ पृ. २९-३१)
क्र. २: यशया ५४:१-१७
क्र. ३: पूर्ण अंतःकरणाने नियुक्ती स्वीकारणे (my अध्याय १३)
क्र. ४: सुधारण्यासाठी अधिक सल्ला (gt अध्याय ६३)
एप्रि. ८ बायबल वाचन: यशया ६०-६
गीत क्र. ८ (५३)
क्र. १: येशू ख्रिस्त—देवाबद्दलच्या ज्ञानाची गुरूकिल्ली (kl पृ. ३२-४२)
क्र. २: यशया ६१:१-११
क्र. ३: जीवनात यश प्राप्त करण्यासाठी मजबूत विश्वास आवश्यक (my अध्याय १४)
क्र. ४: क्षमेविषयी धडा (gt अध्याय ६४)
एप्रि. १५ बायबल वाचन: यिर्मया १-४
गीत क्र. ९ (३७)
क्र. १: देव कोणाच्या भक्तीचा स्वीकार करतो? (kl पृ. ४३-५२)
क्र. २: यिर्मया २:४-१९
क्र. ३: जुनी व्यवस्था खऱ्या मोलाचे काहीएक देऊ शकत नाही (my अध्याय १५)
क्र. ४: यरुशलेमला गुप्त प्रवास (gt अध्याय ६५)
एप्रि. २२ बायबल वाचन: यिर्मया ५-८
गीत क्र. २८ (२२४)
क्र. १: मानवजातीला साह्यकर्त्याची गरज (w०० ३/१५ पृ. ३-४)
क्र. २: यिर्मया ७:१-२०
क्र. ३: वैवाहिक सोबत्याची निवड करण्यासाठी ईश्वरी मार्गदर्शनाचे अनुसरण करा (my अध्याय १६)
क्र. ४: मंडपाच्या सणाच्या वेळी (gt अध्याय ६६)
एप्रि. २९ लेखी उजळणी. बायबल वाचन: यिर्मया ९-१३
गीत क्र. ५ (४६)
मे ६ बायबल वाचन: यिर्मया १४-१८
गीत क्र. २८ (२२४)
क्र. १: कशाप्रकारे येशू ख्रिस्त आपली मदत करू शकतो (w०० ३/१५ पृ. ५-९)
क्र. २: यिर्मया १७:१-१८
क्र. ३: आपले निर्णय आपण पवित्र गोष्टींची कदर करतो की नाही ते प्रकट करतात (my अध्याय १७)
क्र. ४: त्याला धरण्यात त्यांना अपयश येते (gt अध्याय ६७)
मे १३ बायबल वाचन: यिर्मया १९-२३
गीत क्र. ७ (५१)
क्र. १: शांतिमय संबंधांना पोषक असणारा गुण—विनयशीलता (w०० ३/१५ पृ. २१-४)
क्र. २: यिर्मया १९:१-१५
क्र. ३: ‘केवळ प्रभूमध्ये लग्न करा’ (my अध्याय १८)
क्र. ४: सातव्या दिवशी अधिक शिक्षण देणे (gt अध्याय ६८)
मे २० बायबल वाचन: यिर्मया २४-२८
गीत क्र. २६ (२१२)
क्र. १: सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य (w०० ३/१५ पृ. २५-८)
क्र. २: यिर्मया २५:१-१४
क्र. ३: मजबूत आध्यात्मिक कुटुंबाची उभारणी करणे (my अध्याय १९)
क्र. ४: पितृत्वाचा प्रश्न (gt अध्याय ६९)
मे २७ बायबल वाचन: यिर्मया २९-३१
गीत क्र. २१ (१९१)
क्र. १: आज देवाचा आत्मा कसा कार्य करतो? (w०० ४/१ पृ. ८-११)
क्र. २: यिर्मया ३०:१-१६
क्र. ३: वाईट संगतीमुळे संकट येऊ शकते (my अध्याय २०)
क्र. ४: जन्मांध माणसाला बरे करणे (gt अध्याय ७०)
जून ३ बायबल वाचन: यिर्मया ३२-३५
गीत क्र. ११ (८५)
क्र. १: यहोवाचे सामर्थ्य आपल्याला सांत्वन देते (w०० ४/१५ पृ. ४-७)
क्र. २: यिर्मया ३४:१-१६
क्र. ३: द्वेषामुळे पापी कृत्ये घडतात (my अध्याय २१)
क्र. ४: परुश्यांचा मूढ विश्वास (gt अध्याय ७१)
जून १० बायबल वाचन: यिर्मया ३६-४०
गीत क्र. १३ (१२४)
क्र. १: हिंसक लोकांबद्दल तुमचाही दृष्टिकोन देवासारखा आहे का? (w०० ४/१५ पृ. २६-९)
क्र. २: यिर्मया ३७:१-१७
क्र. ३: निराश न होता जीवनातील संकटे स्वीकारा (my अध्याय २२)
क्र. ४: येशू ७० जणांना पाठवतो (gt अध्याय ७२)
जून १७ बायबल वाचन: यिर्मया ४१-४५
गीत क्र. ३ (३२)
क्र. १: “आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर” (w०० ५/१५ पृ. २०-४)
क्र. २: यिर्मया ४१:१-१५
क्र. ३: आपल्या क्षमतांची महिमा यहोवाला द्या (my अध्याय २३)
क्र. ४: शेजारधर्माला जागणारा शोमरोनी (gt अध्याय ७३)
जून २४ बायबल वाचन: यिर्मया ४६-४९
गीत क्र. २ (१५)
क्र. १: परिपूर्ण जीवन निव्वळ स्वप्न नव्हे! (w०० ६/१५ पृ. ५-७)
क्र. २: यिर्मया ४९:१-१३
क्र. ३: प्रेमाचा द्वेषावर विजय (my अध्याय २४)
क्र. ४: मार्थाला सल्ला व प्रार्थनेविषयी सूचना (gt अध्याय ७४)
जुलै १ बायबल वाचन: यिर्मया ५०-५२
गीत क्र. २४ (१८५)
क्र. १: आपण वृद्ध होतो व मरतो ते का? (kl पृ. ५३-६१)
क्र. २: यिर्मया ५०:१-१६
क्र. ३: पश्चात्तापी पापी व्यक्तीला देवाची दया प्राप्त होऊ शकते (my अध्याय २५)
क्र. ४: धन्यतेचा स्त्रोत (gt अध्याय ७५)
जुलै ८ बायबल वाचन: विलापगीत १-२
गीत क्र. ६ (४५)
क्र. १: मानवजातीचे रक्षण करण्यासाठी देवाने काय केले (kl पृ. ६२-६९)
क्र. २: विलापगीत १:१-१४
क्र. ३: अतुट सत्वनिष्ठा दाखवल्याने यहोवा संतुष्ट होतो (my अध्याय २६)
क्र. ४: एका परुशाबरोबर भोजन (gt अध्याय ७६)
जुलै १५ बायबल वाचन: विलापगीत ३-५
गीत क्र. २९ (२२२)
क्र. १: देव दुःखाला अनुमती का देतो? (kl पृ. ७०-७९)
क्र. २: विलापगीत ३:१-३०
क्र. ३: देव आपल्या विश्वासू कृत्यांकडे लक्ष देतो (my अध्याय २७)
क्र. ४: वारशाचा प्रश्न (gt अध्याय ७७)
जुलै २२ बायबल वाचन: यहेज्केल १-६
गीत क्र. २४ (१८५)
क्र. १: आपल्या मृत प्रियजनांचे काय होते? (kl पृ. ८०-८९)
क्र. २: यहेज्केल ४:१-१७
क्र. ३: यहोवा—महान मुक्तिदाता आणि आपल्या उद्देशांचा पूर्तीकर्ता (my अध्याय २८)
क्र. ४: सज्ज राहा! (gt अध्याय ७८)
जुलै २९ बायबल वाचन: यहेज्केल ७-१२
गीत क्र. २७ (२२१)
क्र. १: उत्तम आदर्शांतून लाभ मिळवा (w०० ७/१ पृ. १९-२१)
क्र. २: यहेज्केल १०:१-१९
क्र. ३: देवाला निष्ठावान राहा आणि बांधवांवर प्रेम करा (my अध्याय २९)
क्र. ४: एक राष्ट्र गमावले, पण सर्वस्व नव्हे (gt अध्याय ७९)
ऑग. ५ बायबल वाचन: यहेज्केल १३-१६
गीत क्र. ७ (५१)
क्र. १: अनैतिक जगातही निष्कलंक राहणे शक्य आहे (w०० ७/१५ पृ. २८-३१)
क्र. २: यहेज्केल १३:१-१६
क्र. ३: यहोवाच्या प्रशिक्षणाबद्दल कदर बाळगा (my अध्याय ३०)
क्र. ४: मेंढवाडे आणि मेंढपाळ (gt अध्याय ८०)
ऑग. १२ बायबल वाचन: यहेज्केल १७-२०
गीत क्र. १३ (१२४)
क्र. १: अधिकाऱ्यांचा हक्क का स्वीकारावा? (w०० ८/१ पृ. ४-७)
क्र. २: यहेज्केल १७:१-१८
क्र. ३: धैर्याने यहोवाच्या नावाचे समर्थन करा (my अध्याय ३१)
क्र. ४: येशूला ठार मारण्याचे आणखी प्रयत्न (gt अध्याय ८१)
ऑग. १९ बायबल वाचन: यहेज्केल २१-२३
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: तुम्ही मतभेद कसे हाताळता? (w०० ८/१५ पृ. २३-५)
क्र. २: यहेज्केल २२:१-१६
क्र. ३: आपल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी यहोवा कधीही अपयशी ठरत नाही (my अध्याय ३२)
क्र. ४: येशू पुन्हा यरुशलेमाकडे निघतो (gt अध्याय ८२)
ऑग. २६ लेखी उजळणी. बायबल वाचन: यहेज्केल २४-२८
गीत क्र. १५ (१२७)
सप्टें. २ बायबल वाचन: यहेज्केल २९-३२
गीत क्र. ५ (४६)
क्र. १: आत्म-त्यागी का असावे? (w०० ९/१५ पृ. २१-४)
क्र. २: यहेज्केल ३०:१-१९
क्र. ३: ‘यहोवा आपल्या लोकांच्या वतीने लढतो’ (my अध्याय ३३)
क्र. ४: परुशाचा पाहुणचार (gt अध्याय ८३)
सप्टें. ९ बायबल वाचन: यहेज्केल ३३-३६
गीत क्र. ६ (४५)
क्र. १: देवासोबत जवळचा नातेसंबंध निश्चितच शक्य आहे (w०० १०/१५ पृ. ४-७)
क्र. २: यहेज्केल ३३:१-१६
क्र. ३: ‘दास वर्गाकडून’ येणाऱ्या आध्यात्मिक अन्नाला क्षुल्लक समजू नका (my अध्याय ३४)
क्र. ४: शिष्यत्वाची जबाबदारी (gt अध्याय ८४)
सप्टें. १६ बायबल वाचन: यहेज्केल ३७-४०
गीत क्र. ९ (३७)
क्र. १: तुमच्या मते यशाची व्याख्या काय आहे? (w०० ११/१ पृ. १८-२१)
क्र. २: यहेज्केल ३९:१-१६
क्र. ३: देवाच्या नियमशास्त्रात असलेल्या तत्त्वांकडे लक्ष देणे (my अध्याय ३५)
क्र. ४: हरवलेल्याचा शोध घेणे (gt अध्याय ८५)
सप्टें. २३ बायबल वाचन: यहेज्केल ४१-४५
गीत क्र. १२ (११३)
क्र. १: स्वेच्छेने देवाची सेवा करणे (w०० ११/१५ पृ. २१-३)
क्र. २: यहेज्केल ४२:१-२०
क्र. ३: यहोवा मूर्तिपूजा खपवून घेत नाही (my अध्याय ३६)
क्र. ४: हरवलेल्या मुलाची गोष्ट (gt अध्याय ८६)
सप्टें. ३० बायबल वाचन: यहेज्केल ४६-४८
गीत क्र. ११ (८५)
क्र. १: देवाचे राज्य आधिपत्य गाजवते (kl पृ. ९०-९७)
क्र. २: यहेज्केल ४६:१-१५
क्र. ३: तुमच्या मूल्यवान गोष्टींनी यहोवाचा गौरव करा (my अध्याय ३७)
क्र. ४: व्यवहारबुद्धीने भविष्याची तरतूद करा (gt अध्याय ८७)
ऑक्टो. ७ बायबल वाचन: दानीएल १-४
गीत क्र. २१ (१९१)
क्र. १: हा शेवटला काळ आहे! (kl पृ. ९८-१०७)
क्र. २: दानीएल १:१-१७
क्र. ३: आशावादी राहा आणि इतरांचा आत्मविश्वास वाढवा (my अध्याय ३८)
क्र. ४: श्रीमंत मनुष्य व लाजर (gt अध्याय ८८)
ऑक्टो. १४ बायबल वाचन: दानीएल ५-८
गीत क्र. १२ (११३)
क्र. १: ‘बुद्धिमान’ लोक सांगतात म्हणून नेहमीच विश्वास ठेवावा का? (w०० १२/१ पृ. २९-३१)
क्र. २: दानीएल ५:१-१६
क्र. ३: पुढाकार घेणाऱ्यांशी निष्ठावान राहा (my अध्याय ३९)
क्र. ४: यहूदीयामधील करुणेची कामगिरी (gt अध्याय ८९)
ऑक्टो. २१ बायबल वाचन: दानीएल ९-१२
गीत क्र. ४ (४३)
क्र. १: दुरात्म्यांच्या समूहाचा प्रतिकार करा (kl पृ. १०८-११७)
क्र. २: दानीएल १०:१-२१
क्र. ३: लीनता धारण करा आणि संकट टाळा (my अध्याय ४०)
क्र. ४: पुनरुत्थानाची आशा (gt अध्याय ९०)
ऑक्टो. २८ बायबल वाचन: होशेय १-१४
गीत क्र. ९ (३७)
क्र. १: ईश्वरी जीवन जगणे का आनंद देते-भाग १ (kl पृ. ११८-१२३ परि. १-१३)
क्र. २: होशेय ४:१-१९
क्र. ३: खंडणीवर विश्वास प्रदर्शित करा (my अध्याय ४१)
क्र. ४: लाजराचे पुनरुत्थान होते (gt अध्याय ९१)
नोव्हें. ४ बायबल वाचन: योएल १-३
गीत क्र. २९ (२२२)
क्र. १: ईश्वरी जीवन जगणे का आनंद देते-भाग २ (kl पृ. १२३-१२९ परि. १४-२३
क्र. २: योएल १:१-२०
क्र. ३: लोभामुळे चुकीचे कार्य घडू शकते (my अध्याय ४२)
क्र. ४: येशूच्या यरुशलेमच्या शेवटल्या प्रवासात दहा कुष्ठरोगी बरे होतात (gt अध्याय ९२)
नोव्हें. ११ बायबल वाचन: आमोस १-९
गीत क्र. ७ (५१)
क्र. १: तुम्ही कोणाच्या अधिकाराला ओळखले पाहिजे? (kl पृ. १३०-१३९)
क्र. २: आमोस १:१-१५
क्र. ३: ईश्वरशासित व्यवस्थेचा लीनतेने आदर करा (my अध्याय ४३)
क्र. ४: मनुष्याचा पुत्र प्रकट केला जातो तेव्हा (gt अध्याय ९३)
नोव्हें. १८ बायबल वाचन: ओबद्या १–योना ४
गीत क्र. १४ (११७)
क्र. १: देवाला सन्मान देणारे कुटुंब उभारणे-भाग १ (kl पृ. १४०-१४४ परि. १-१४)
क्र. २: ओबद्या १:१-१६
क्र. ३: विश्वास क्रियेवाचून निर्जीव आहे (my अध्याय ४४)
क्र. ४: प्रार्थनेची व नम्रतेची गरज (gt अध्याय ९४)
नोव्हें. २५ बायबल वाचन: मीखा १-७
गीत क्र. १९ (१६४)
क्र. १: देवाला सन्मान देणारे कुटुंब उभारणे-भाग २ (kl पृ. १४५-१४९ परि. १५-२३)
क्र. २: मीखा १:१-१६
क्र. ३: यहोवाच्या अभिवचनांविषयी कधीही शंका बाळगू नका (my अध्याय ४५)
क्र. ४: घटस्फोटाबद्दल व मुलांविषयी प्रेम दाखवण्याबद्दल धडे (gt अध्याय ९५)
डिसें. २ बायबल वाचन: नहूम १–हबक्कूक ३
गीत क्र. २२ (१३०)
क्र. १: तुम्हाला देवाजवळ कसे येता येईल (kl पृ. १५०-१५९)
क्र. २: नहूम ३:१-१९
क्र. ३: विजय हा केवळ यहोवाचाच आहे (my अध्याय ४६)
क्र. ४: येशू व श्रीमंत तरुण अधिकारी (gt अध्याय ९६)
डिसें. ९ बायबल वाचन: सफन्या १–हाग्गय २
गीत क्र. २३ (२००)
क्र. १: देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता मिळवा (kl पृ. १६०-१६९)
क्र. २: सफन्या २:१-१५
क्र. ३: लोभ आणि चोरी यांमुळे गंभीर परिणाम भोगावे लागतात (my अध्याय ४७)
क्र. ४: द्राक्षमळ्यातील कामकरी (gt अध्याय ९७)
डिसें. १६ बायबल वाचन: जखऱ्या १-८
गीत क्र. २२ (१३०)
क्र. १: देवाची सेवा सदासर्वकाळ करणे हे तुमचे ध्येय बनवा (kl पृ. १७०-१८०)
क्र. २: जखऱ्या ६:१-१५
क्र. ३: शांती स्थापित करणाऱ्यांना यहोवा आशीर्वादित करतो (my अध्याय ४८)
क्र. ४: येशूचा मृत्यू जवळ येत असता शिष्य वाद घालतात (gt अध्याय ९८)
डिसें. २३ बायबल वाचन: जखऱ्या ९-१४
गीत क्र. १७ (१८७)
क्र. १: जेव्हा देवाच्या ज्ञानाने पृथ्वी पूर्ण भरते (kl पृ. १८१-१९१)
क्र. २: जखऱ्या ९:१-१७
क्र. ३: प्रार्थनेच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका (my अध्याय ४९)
क्र. ४: येशू यरीहोमध्ये शिकवतो (gt अध्याय ९९)
डिसें. ३० लेखी उजळणी. बायबल वाचन: मलाखी १-४
गीत क्र. २० (९३)