वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०१ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • उद्देश साध्य करणाऱ्‍या क्षेत्र सेवेच्या सभा
    आपली राज्य सेवा—२०१५
  • क्षेत्र सेवाकार्याच्या सभांचा पूर्ण फायदा घ्या
    आमची राज्य सेवा—२००६
  • क्षेत्र सेवेच्या सभा
    आमची राज्य सेवा—२००९
  • क्षेत्र सेवेच्या सभेत दैनिक वचनाची चर्चा करण्याची गरज नाही
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ९/०१ पृ. ३

प्रश्‍न पेटी

◼ क्षेत्र सेवेसाठी असलेल्या सभेत, कोणत्या विषयावर चर्चा करता येऊ शकते?

क्षेत्र सेवेवर आपले लक्ष केंद्रित करणे, हा क्षेत्र सेवेसाठी असलेल्या सभेचा मुख्य उद्देश असतो. यास्तव, ही सभा संचालित करणाऱ्‍या बांधवाने, सर्वांना उत्तेजन मिळेल अशी विशिष्ट व व्यावहारिक माहिती देण्यासाठी चांगल्याप्रकारे तयारी करून ती सादर करायला तयार असले पाहिजे. त्या दिवसाचे वचन थेट प्रचार कार्याशी संबंधित असेल तर ते वाचून त्यावर संक्षिप्त चर्चा करणे उचित ठरेल. परंतु, ही सभा मुख्यतः प्रचार कार्यावरच केंद्रित असावी. आणि तिच्यामुळे साक्षकार्याला जाणाऱ्‍या सर्वांना, त्या दिवशी आपली सेवा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज होण्यास मदत मिळावी.—२ तीम. ४:५.

चालू महिन्यात सेवेमध्ये कोणते प्रकाशन सादर करायचे आहे व ते कसे सादर करता येईल याविषयी सर्वांना जागरूक करण्यासाठी आमची राज्य सेवा यांतील लागू करण्याजोग्या मुद्यांवर चर्चा करता येईल. मासिक दिन असतो तेव्हा, “मासिके कशी सादर कराल?” या प्रस्तावनांतील एका प्रस्तावनेचे प्रात्यक्षिक दाखवू शकता. इतर मोहिमांसाठी, रिझनींग पुस्तकातील स्थानीय क्षेत्रात लागू होतील अशा एक-दोन प्रस्तावनांचा देखील उल्लेख करता येऊ शकतो. सेवेच्या एखाद्या पैलूवर, जसे की बायबलमधून एखादे वचन कसे दाखवायचे, आपले संभाषण मध्येच थांबवू इच्छिणाऱ्‍यांशी कसे बोलायचे, बायबल अभ्यास कसा सादर करायचा किंवा आवड दाखवणाऱ्‍यांची पुन्हा भेट कशी घ्यायची यांसारख्या पैलूंवर चर्चा करता येऊ शकते अथवा प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकते.

क्षेत्र सेवेसाठी असलेली ही सभा १० ते १५ मिनिटांपेक्षा अधिक असू नये. यावेळेतच, जोड्या लावणे, कोणत्या भागात सेवा करायची आहे ते सांगणे व शेवटची प्रार्थना हे सर्वकाही झाले पाहिजे. सभेनंतर, उपस्थित असलेल्या सर्वांना, ते कोणाबरोबर आणि कोणत्या भागात काम करणार आहेत हे माहीत असले पाहिजे. प्रचारकांच्या प्रत्येक जोडीला, ते नेमके कोणत्या भागात कार्य करणार आहेत हे टेरिटरी मॅप कार्डवर (S-12) दाखवण्यात यावे जेणेकरून वेळ न दवडता त्या भागात ते प्रचाराला जाऊ शकतील. यामुळे, प्रचार कार्य होणार असलेल्या भागात एक मोठा घोळका जाणार नाही आणि सर्वांदेखत जोड्या लावण्याचे काम होणार नाही. ही सभा कमी वेळेत उरकली जात असल्यामुळे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. मंडळीच्या सभेनंतर अर्थात टेहळणी बुरूज अभ्यासानंतर क्षेत्र सेवेची ही सभा असेल तर ती संक्षिप्त असावी. तेव्हा दैनंदिन वचनावर चर्च करण्याची गरज नाही कारण, मंडळीच्या सभेत शास्त्रवचनांवर आधीच चर्चा झालेली असते.

सेवेसाठी असलेली ही सभा चालवण्यासाठी योग्य बांधवांना आधीच नेमण्यात यावे. विशिष्ट दिवशी पुढाकार घेण्यासाठी कोणी नसते तेव्हा, वडीलजन बाप्तिस्माप्राप्त भगिनींना ही नेमणूक देऊ शकतात. ही भगिनी, खाली बसूनच, दैनिक वचनाची तसेच क्षेत्र सेवेत लागू होणाऱ्‍या इतर मुद्यांची संक्षिप्त चर्चा करण्यास सुरवात करू शकते. तिने डोक्यावर पदर घेतलेला असेल.

क्षेत्र सेवेच्या सभा आपल्याला, क्षेत्र सेवेत भाग घेण्यास प्रोत्साहन देतात. या सभेचा संचालक जशी तयारी करेल तसा आपल्या सर्वांना फायदा होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा