घोषणा
◼ साहित्य सादरता सप्टेंबर: माहितीपत्रक: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार आणि जीवन अस्तित्वात कसे आले—उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी). ऑक्टोबर: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. आवड दाखवणाऱ्या लोकांकडे मॅग्झीन रुट सुरू करण्यासाठी पुनर्भेट करा. मॅग्झीन रुट जेथे सुरू करणे शक्यच नाही फक्त तेथेच वर्गणी दिली जाऊ शकते. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. लोकांकडे आधीपासूनच ही प्रकाशने असल्यास, देवाच्या शोधात मानवजात (इंग्रजी), किंवा इतर कोणतेही जुने प्रकाशन सादर करता येऊ शकते. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक तुम्ही देऊ शकता.
◼ बहिष्कृत केलेले किंवा मंडळीपासून स्वतःहून विलग झालेले पुन्हा एकदा मंडळीत येऊ इच्छित असतील तर त्याबाबतीत, वडिलांना आठवण करून दिली जाते की त्यांनी टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९२ पृष्ठे १७-१९ वरील सूचनांचा अवलंब करावा.
◼ ज्या मंडळीच्या ट्रस्टची सरकारात नोंद आहे त्यांनी, ही ट्रस्ट निष्क्रिय होऊ नये म्हणून वेळोवेळी सभा भरवल्या पाहिजेत व सभेत चर्चिलेल्या मुद्द्यांची नोंद ठेवावी.
◼ प्रचारकांना व पायनियरांना अशी विनंती केली जाते, की त्यांनी व्यक्तिगत वर्गणीची मागणी करण्याऐवजी मंडळीतून टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांची आपली व्यक्तिगत प्रत घ्यावी. यामुळे संस्थेचे काम आणि खर्च वाचेल.
◼ एप्रिल १०, २००१ तारखेच्या सर्व मंडळ्यांना पाठवलेल्या पत्रात रक्ताविना उपचार—वैद्यकशास्त्र आव्हान स्वीकारते (इंग्रजी) या नवीन व्हिडीओचे अनावरण केल्याचे सांगितले होते. यामध्ये प्रस्तुत केलेला कार्यक्रम खासकरून जनतेसाठी तयार करण्यात आला आहे. अशाप्रक्रारे, संभाषण सुरू केल्याने आणि हा कार्यक्रम सत्यात नसलेले साथीदार किंवा नातेवाईक, शिक्षक, सहकर्मचारी, सहविद्यार्थी, शेजारी आणि बायबल विद्यार्थी यांच्यासोबत पाहिल्याने त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात. साक्षीदार नसलेल्यांसोबत हा कार्यक्रम पाहिल्यावर त्यांना जे काही प्रश्न असतील किंवा त्यावर त्यांना काय बोलायचे असल्यास ही पुनःभेट किंवा बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी चांगली संधी असू शकते.
◼ कोलकाता (कलकत्ता) येथे होणाऱ्या “देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनाच्या तारखेत काही फेरबदल करण्यात आला आहे. नोव्हेंबर ९-११, २००१ ही नवीन तारीख आहे. परंतु जुलै २००१ च्या आमची राज्य सेवा यात सांगितल्याप्रमाणे सभागृहाचा तोच पत्ता आहे.
◼ प्रांतीय अधिवेशन संपल्यावर, बॅज कार्ड होल्डर चांगल्या स्थितीत असतील तर ते फेकून देऊ नका. दर वर्षी नवीन होल्डरची मागणी करण्याऐवजी तेच होल्डर तुम्ही वापरू शकता.
◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा? —हिंदी व नेपाळी
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे —बंगाली
“पहा! मी सर्व नवे करतो” —हिंदी, मराठी, नेपाळी व तामीळ
आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? —तेलगू
देव खरोखरी आपली काळजी करतो का? —हिंदी, मराठी, मल्याळम, तामीळ व तेलगू
जीवनाचा काय उद्देश आहे—तो तुम्हाला कसा शोधता येईल? —हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, तामीळ व तेलगू
तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा —मल्याळम व तामीळ
कुरूक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव —तेलगू
परादीसकडे जाणारा मार्ग कसा शोधता येईल (मुसलमानांकरता) —गुजराती, हिंदी, मल्याळम, तामीळ व तेलगू
◼ वर उल्लेखलेल्या प्रकाशनांसाठी तुम्ही लिटरेचर रिक्वेस्ट (S-14) पाठवण्याआधी याची खात्री करा की, याच प्रकाशनांची तुम्ही पूर्वी पाठवलेली ऑर्डर तुम्हाला पाठवण्यात आली आहे.