सेवा सभा आराखडा
ऑगस्ट १३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. ऑगस्ट २७ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील सेवा सभेत, द न्यू वर्ल्ड सोसायटी इन ॲक्शन या व्हिडिओची चर्चा केली जाणार असल्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ पाहण्याचे उत्तेजन द्या.
१७ मि: एप्रिल सेवा अहवाल. सेवा पर्यवेक्षकांचे भाषण व मुलाखती. संपूर्ण देशातील आणि स्थानीय मंडळीतील एप्रिल महिन्याच्या अहवालावर भर द्या. या महिन्यात सेवेमध्ये भाग घेण्याकरता ज्यादा प्रयत्न केलेल्या विविध प्रचारकांची मुलाखत घ्या. पूर्ण सहभाग घेतल्याने त्यांना मिळालेल्या आनंदाचा अनुभव त्यांना विचारा व सेवेमध्ये व्यस्त राहण्याकरता ते काय करत आहेत हेही विचारा.—मार्च २००१ आमची राज्य सेवा यातील पुरवणी, परिच्छेद २८-३० पाहा.
१८ मि: “तुम्हाला आणखी भाग घ्यायची इच्छा आहे का?”a तुमच्या क्षेत्रात वेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांना साक्ष देण्यासाठी तुम्ही सेवेमध्ये अधिक भाग कसा घेऊ शकता यावर काही सूचना द्या. टेहळणी बुरूज जून १५, १९९७, पृष्ठे २६-९ यावर संक्षिप्त विवरण द्या.
गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
८ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: “तुम्ही जणू ‘तमाशा’ असे झाला आहात!”b यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याविषयी किंवा वर्तनाविषयी लोकांनी काढलेल्या प्रशंसोद्गाराच्या एकदोन स्थानीय घटना सांगा.—टेहळणी बुरूज मार्च १५, १९९८, पृष्ठे १० आणि जानेवारी १५, १९९९, पृष्ठे ३२ पाहा.
२२ मि: “शिष्टाचार—देवाच्या लोकांचा खास गुण.” परिच्छेद १-५ वर वडील पाच मिनिटांचे भाषण देतील. मग ते, आणखी एक वडील व सेवा सेवक यांच्याबरोबर उरलेल्या लेखाची स्टेजवर चर्चा करतील. आपल्या सभांपासून लक्ष विचलित करू शकणाऱ्या तसेच आपल्याला कमी लाभ मिळेल अशा अविचारीपणा दाखवणाऱ्या काही सवयींवर आपण मात कशी करू शकतो यावर ते सर्व चर्चा करतात. आपण इतरांच्या हिताचा विचार करतो तेव्हा एकमेकांबरोबरची आपली संगती खरोखरच उत्तेजनकारक कशी होऊ शकते यावर ते जोर देतात.—फिलिप्पै. २:४.
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१० मि: स्थानीय घोषणा. ऑगस्टचा क्षेत्र सेवा अहवाल टाकण्यास सर्व प्रचारकांना आठवण करून द्या. सप्टेंबर महिन्यादरम्यान सेवेमध्ये क्रिएशन पुस्तक कशाप्रकारे सादर करता येऊ शकते यावर एक अथवा दोन सूचना द्या.—आमची राज्य सेवा जून १९९५, पृष्ठ ४ पाहा.
१५ मि: “करमणुकीला योग्य जागी ठेवा.” एक पुस्तक अभ्यास संचालक अभ्यासानंतर एका जोडप्याबरोबर चर्चा करतात. ते अगदी प्रेमळपणे त्यांना सांगतात, की अलीकडे त्यांनी त्यांना क्षेत्र सेवेला किंवा सप्ताहाच्या अंती असलेल्या सभांना आलेले पाहिले नाही. जोडपे संचालकांना सांगतात, की सुटीवर गेल्यामुळे आणि इतर कामांमुळे त्यांना क्षेत्र सेवेत किंवा सभांना येता आले नाही. वडील मग या जोडप्याबरोबर लेखातील मुख्य मुद्द्यांची उजळणी करतात व त्यांना हे पाहायला मदत करतात की आध्यात्मिक गोष्टींना नेहमी प्राधान्य देण्याची गरज आहे. पतीपत्नी नंतर वडिलांनी दिलेल्या या प्रेमळ आठवणीबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतात. व येथून पुढे ते आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य देतील असे म्हणतात.—टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००० पृष्ठे १९-२०.
२० मि: “द न्यू वर्ल्ड सोसायटी इन ॲक्शनची ऐतिहासिक उजळणी.” श्रोत्यांबरोबर चर्चा व मुलाखती. दिलेल्या प्रश्नांची चर्चा केल्यानंतर, मूळ फिल्म पाहिलेल्या किंवा १९५० च्या दशकातील आंतरराष्ट्रीय अधिवेशनांना उपस्थित राहिलेल्यांची मुलाखत घ्या. या घटनांच्या संबंधाने त्यांना काय काय आठवते, त्यांच्या आध्यात्मिकतेवर याचा कसा परिणाम झाला व हीच यहोवाची संघटना आहे याबद्दल त्यांना का खात्री वाटते हे त्यांना व्यक्त करू द्या. ऑक्टोबर महिन्यात आपण युनायटेड बाय डिव्हाइन टीचिंग या व्हिडिओची उजळणी करणार आहोत.
गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर ३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
८ मि: स्थानीय घोषणा.
१७ मि: “ख्रिस्ती सहवास किती महत्त्वाचा आहे?”c टेहळणी बुरूज जानेवारी १५, १९९६, पृष्ठ २२ वरील “मंडळीकरवी” या पोटमथळ्याखालील माहितीचाही उपयोग करा.
२० मि: जेव्हा कोणी म्हणतो. चर्चा आणि प्रात्यक्षिके. सेवेत, आपण अपेक्षा करत नाही तेव्हा लोक काही बोलतात किंवा प्रश्न विचारतात तेव्हा, आपण विषय बदलण्याऐवजी किंवा संभाषण थांबवण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याबाबतीत रिझनींग पुस्तक आपल्याला मदत करू शकते. लोक सहसा काय बोलतात ते दाखवून द्या आणि रिझनींग पुस्तकातील माहितीद्वारे आपण या लोकांना उत्तर कशाप्रकारे देऊ शकतो याचे प्रचारकांना प्रात्यक्षिक दाखवायला सांगा. उदाहरणार्थ, ‘मी देव वगैरे काही मानत नाही.’ (पृष्ठे १५०-१) ‘समाज सुधारण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न का करत नाही?’ (पृष्ठे २०७-८) ‘आपण कोणत्या चर्चचे आहोत हे महत्त्वाचे नाही.’ (पृष्ठ ३३२) सेवेमध्ये अनपेक्षितपणे असे प्रसंग येतात तेव्हा रिझनींग पुस्तकातील या भागाचा उपयोग करण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.