ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत मे ७ ते ऑगस्ट २०, २००१ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा:
१. नहेम्या २:४ मधील प्रार्थना ही अगदी असहाय स्थितीत शेवटल्या मिनिटाला केलेली प्रार्थना होती. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८६ ३/१ पृ. २५ परि. ८.]
२. एक्लीसिया या ग्रीक शब्दाचे “मंडळी” असे भाषांतर करण्यात आले आहे; या शब्दात एकोप्याची आणि परस्परांना पाठबळ देण्याची भावना गोवलेली आहे. [w-MR९९ ५/१५ पृ. २५ परि. ४.]
३. येशू या पृथ्वीवर खासकरून देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी आला होता; याच राज्याकरवी त्याच्या पित्याच्या नावाचे दोषनिवारण व मानवजातीच्या सर्व दुःखांचे निरसन होणार आहे. [gt-MR २४]
४. ईयोब त्याच्या दिवसांतील फक्त एकच असा मनुष्य होता जो यहोवा देवाशी विश्वासू राहिला. (ईयो. १:८) [साप्ताहिक बायबल वाचन; w९२ ८/१ पृ. ३१ परि. ३-४.]
५. शौल किंवा नंतर जो पौल झाला तो तंबू बनवून आपले पोट भरत असे; यावरून असे दिसते की तो एका गरीब कुटुंबातला होता. (प्रे. कृत्ये १८:२, ३) [w-MR९९ ५/१५ पृ. ३० परि. २-पृ. ३१ परि. १.]
६. दावीदाने गंभीर पाप केले होते तरीसुद्धा त्याच्या पश्चात्तापी व चांगल्या गुणांमुळे, तो “मला जिवेभावे धरून राहिला” असे यहोवा त्याच्याविषयी म्हणू शकला. (१ राजे १४:८) [w-MR९९ ६/१५ पृ. ११ परि. ४.]
७. आपण दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी कसलीही कसर सोडू नये; असे करणे कठीण असले तरीही. परंतु आपण दिलेले एखादे वचन शास्त्रवचनानुसार नसले तर आपण ते पूर्ण करू नये. (स्तो. १५:४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९१ ८/१ पृ. ३० परि. ६.]
८. स्तोत्र २२:१ या वचनावरून असे सूचित होते, की दबावाखाली दावीदाने काही काळापुरता त्याचा विश्वास गमावला होता. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८६ ९/१ पृ. २९ परि. ७.]
९. एखादा ख्रिस्ती वैफल्य, निराशा किंवा कायदेशीर अथवा आर्थिक अडचणी यांमुळे “पडला” तरी, यहोवाच्या आत्म्याच्या आणि त्याच्या प्रेमळ उपासकांच्या साहाय्यामुळे तो आध्यात्मिकरीत्या “सपशेल” पडणार नाही. (स्तो. ३७:२३, २४) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८६ ११/१ पृ. ३० परि. १४.]
१०. येशू “भांडणार नाही व ओरडणार नाही, व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही” या वचनाचा असा अर्थ होतो की मोठा गलबला करून किंवा उच्च स्वरात तो प्रचार करणार नाही. (मत्त. १२:१९) [gt-MR ३३]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. एज्रा आणि त्याला मदत करणाऱ्यांनी नियमशास्त्राचे ‘स्पष्टीकरण’ कसे दिले? (नहे. ८:८) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८६ ३/१ पृ. २६ परि. १२.]
१२. ‘परमेश्वराविषयीचा आनंद’ केव्हा मिळतो? (नहे. ८:१०) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८६ ३/१ पृ. २७ परि. १.]
१३. “जे स्वसंतोषाने यरुशलेमेत राहण्यास कबूल झाले” त्या सर्व लोकांना आशीर्वाद का मिळाले? (नहे. ११:२) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८६ ३/१ पृ. २७ परि. ३.]
१४. एस्तेरने तिचा नेमका हेतू राजाला कळविण्यास उशीर का लावला? (एस्ते. ५:६-८) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८६ ४/१ पृ. २६ परि. ७.]
१५. सत्यात नसलेल्या व्यक्तीशी विवाह करण्याविषयी बायबल काय सल्ला देते? शास्त्रवचने सांगा. [fy-MR पृ. १२९ परि. ३.]
१६. अलीफजच्या सल्ल्यामुळे ईयोबाला उत्तेजन मिळण्याऐवजी तो निरुत्साहित का झाला? (ईयो. २१:३४; २२:२, ३) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९५ २/१५ पृ. २७ परि. ५-६ पाहा.]
१७. विवाहात आलेल्या समस्या कशा आणि केव्हा सोडवल्या पाहिजेत? [fy-MR पृ. १५४ परि. ४ पाहा.]
१८. स्तोत्र २:१ नुसार राष्ट्रे कोणत्या “व्यर्थ योजना [बडबड]” करत आहेत? [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८६ ९/१ पृ. २८ परि. ५ पाहा.]
१९. शोमरोनी लोक आणि कुशी अधिकारी यांना फिलिप्पाने दिलेल्या साक्षीवरून आपण त्याच्या निःपक्षपातीपणाचा कोणता व्यावहारिक धडा शिकतो? (प्रे. कृत्ये ८:६-१३, २६-३९) [w-MR९९ ७/१५ पृ. २५ परि. २.]
२०. ईयोब ज्याला समस्यांपासून मुक्त व सुरक्षित ठिकाण समजत होता त्या कबरेतूनही देव त्याला बाहेर बोलवू शकतो ही पक्की खात्री त्याने कोणत्या उदाहरणातून व्यक्त केली? (ईयो. १४:७, १३-१५) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR०० ५/१५ पृ. २७ परि. ७-पृ. २८ परि. १.]
पुढील वाक्ये पूर्ण करा:
२१. एस्तेर ८:१७ (सुबोध भाषांतर) म्हणते, की पुष्कळ लोक ‘आपण यहुदी आहोत’ असे म्हणू लागले. तसेच आजही “दुसरी मेंढरे” असलेल्या ______________________ लोकांनी ______________________ यांची बाजू घेतली आहे. (प्रकटी. ७:९; योहा. १०:१६; जख. ८:२३) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८६ ४/१ पृ. २७ परि. ९.]
२२. प्रेषितांची कृत्ये १:७ वचनात सूचित केले आहे, की यहोवाचे ______________________ लक्ष असते. तरीसुद्धा लेखा घेण्याचा त्याचा दिवस ______________________ एका अनपेक्षित वेळी येणार आहे. (२ पेत्र ३:१०) [w-MR९९ ६/१ पृ. ५ परि. २-३.]
२३. मत्तय ९:१६, १७ मधील दाखल्यांद्वारे येशू ____________________ शिष्यांनी, ______________________ यांसारख्या ______________________ जुन्या चालीरिती अनुसरण्याची त्याच्या अनुयायांकडून अपेक्षा करू नये हे समजण्यास त्यांची मदत करत होता. [gt-MR २८]
२४. भरवसा, विश्वास आणि एकमेकांबद्दलचा समजूतदारपणा यांनीच हितकारक दळणवळण शक्य होते. हे गुण तेव्हा पाहायला मिळतात जेव्हा विवाह हा ______________________ नातेसंबंध आहे असे समजले जाते आणि तो नातेसंबंध टिकवून ठेवायचा असतो तेव्हा प्रामाणिक ______________________ केला जातो. [w-MR९९ ७/१५ पृ. २१ परि. ३.]
२५. सकारात्मक साथीदारांचा प्रभाव आपल्याला नैतिक व आध्यात्मिक अपेक्षांनुसार ______________________ व यहोवाची ______________________ सेवा करण्यास मदत करू शकतो. [पाहा w-MR९९ ८/१ पृ. २४ परि. ३.]
पुढील वाक्यांतील बरोबर उत्तर निवडा:
२६. मर्दखय “राजद्वारी बसला होता” यावरून हे सूचित होते की तो (राजाचा अंगरक्षक होता; राजा अहश्वेरोशचा एक अधिकारी होता; राजाची भेट घेण्याकरता थांबला होता.) (एस्ते. २:१९, २०) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८६ ४/१ पृ. २५ परि. ९ पाहा.]
२७. ईयोब १९:२५-२७ या वचनात ईयोबाने आपण ‘देवाला पाहू’ असा विश्वास प्रकट केला. याचा अर्थ असा होतो, की (त्याला दृष्टान्त पाहण्याचा सुहक्क मिळणार होता; स्वर्गीय जीवनासाठी त्याला पुनरुत्थित केले जाणार होते; यहोवाविषयीचे सत्य पाहण्यासाठी त्याचे मनःचक्षू उघडले जाणार होते.) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९४ ११/१५ पृ. १९ परि. १७.]
२८. पालकांना आपल्या मुलांमध्ये (अविचारीपणा; मूर्खता; बालिशपणा) दिसल्यास त्यांना त्यात आश्चर्य वाटू नये. (नीति. २२:१५) [fy-MR पृ. १४९ परि. २०.]
२९. पती-पत्नी असहमत होतात तेव्हा प्रत्येकाने (ऐकावयास तत्पर; बोलावयास तत्पर; रागास तत्पर) असावे. (याको. १:१९) [fy-MR पृ. १५६ परि. ९.]
३०. मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा यांमुळे वैवाहिक सोबती त्यांचे वैवाहिक बंधन मजबूत करू शकतात व विवाहास मोडणाऱ्या (वृद्धापकाळाच्या; आजारपणाच्या; सैतानाच्या) हल्ल्यांना उलथून पाडू शकतात. [fy-MR पृ. १६७ परि. १३.]
पुढील वचने खाली दिलेल्या वाक्यांशी जुळवा:
नहे. ३:५; स्तो. १२:२; १९:७; ७२:१३; लूक ४:१६-२१.
३१. कष्टाचे काम आपल्या प्रतिष्ठेला शोभत नाही असा गर्विष्ठपणे विचार न करता ते काम आनंदाने करण्यास आपण इच्छुक असले पाहिजे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८६ ३/१ पृ. २५ परि. १२ व पृ. २६ परि. ७.]
३२. येशू ख्रिस्त पृथ्वीवर सेवा करत असतानाच्या दिवसांत यहुदी सभास्थान सूचना देण्याचे, प्रार्थना करण्याचे, शास्त्रवचनांचे पठण, वाचन व खुलासा करण्याचे ठिकाण होते. [gt-MR २१]
३३. येशू त्याच्या राज्य शासनादरम्यान, दयाळू राजा या नात्याने, सर्व पीडितांना मदत करण्याची त्याची इच्छा पूर्ण करील. [gt-MR २५]
३४. आपल्याला देवाची मैत्री हवी असेल तर आपण अगदी मनापासून प्रामाणिक व निष्कपट असले पाहिजे. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९१ ८/१ पृ. २८ परि. ७.]
३५. यहोवाच्या नियमशास्त्रांचे पालन केल्याने आपल्या मनाचे पुनरुज्जीवन होते, आपल्या जीवनाचे कल्याण होते. [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR०० १०/१ पृ. १३ परि. ४.]