सेवा सभा आराखडा
चना: येणाऱ्या महिन्यात दर आठवडी, आमची राज्य सेवा यात एका सेवा सभेची योजना केली जाईल. “देवाच्या वचनाचे शिक्षक” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून मंडळ्यांना काही फेरबदल करावे लागतील. अधिवेशनाला उपस्थित राहण्याआधीच्या सेवा सभेत १५ मिनिटांसाठी, या महिन्याच्या पुरवणीत दिलेल्या, स्थानिकरित्या लागू होणाऱ्या स्पष्ट सूचना पुन्हा सगळ्यांच्या लक्षात आणून द्याव्यात. डिसेंबर महिन्यात एक पूर्ण सेवा सभेत अधिवेशनातील भाषणांची उजळणी केली जाईल. याची तयारी म्हणून आपल्यातील प्रत्येक जण अधिवेशनात अर्थपूर्ण टिपणी घेऊ शकतो. शिवाय, स्वतःच्या जीवनात आणि क्षेत्र सेवेत आपण लागू करू इच्छितो ते मुद्दे देखील लिहून घेऊ शकतो. अशाप्रकारे मग, अधिवेशनानंतर या मुद्यांचा कसा अवलंब केला हे सांगण्यास आपण तयार होऊ. मिळालेल्या उत्तम सूचनांचा आपल्याला कसा फायदा झाला हे ऐकून सर्वांना उत्तेजन मिळू शकेल.
जुलै ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २१ (१९१)
८ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. सेवा सभेत फेरबदल करण्याबद्दल वरील सूचना पाहा आणि डिसेंबर महिन्यातील एका सेवा सभेत प्रांतीय अधिवेशनातील ठळक भाषणांची उजळणी करण्यासाठी काय योजना करण्यात आली आहे त्याची चर्चा करा.
१७ मि: युवकांनो—तुमच्या करिअरच्या खर्चाचा अंदाज घ्या. प्रापंचिक नोकरीविषयी व्यावहारिक अनुभव असलेल्या एका वडिलांकडे एक पिता आणि त्यांचा किशोरवयीन मुलगा अथवा मुलगी चर्चा करतात. करिअर निवडण्यासंबंधी तीन आठवड्यांआधी सेवा सभेत झालेल्या भागावर चर्चा केल्यानंतर हा किशोरवयीन पायनियर सेवा सुरू करण्याचा गंभीरपणे विचार करत आहे परंतु आपल्या आर्थिक गरजा कशा पूर्ण करता येतील हे त्याला/तिला सुचत नाही. संतुलित दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे, या गोष्टीवर वडील जोर देतात. (टेहळणी बुरूज सप्टेंबर १, १९९९, पृष्ठ ११ परिच्छेद १३) स्वतःचा खर्च भागवता यावा म्हणून कोणत्या न कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण घेणे सुज्ञपणाचे आहे. पुष्कळ लोकांनी फक्त, कमीतकमी वेळ व पैसा लागणारी मूलभूत कौशल्ये शिकून घेतली आहेत. (टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९६ पृष्ठ १४; तरुणांचे प्रश्न, पृष्ठ १७८) वडील, पिता आणि किशोरवयीन सावध राहा! एप्रिल ८, १९९६ पृष्ठे ९-११ वरील लेखाची उजळणी करतात व एखादे सोयीस्कर काम मिळाल्यावर किंवा एखादा लहानसा धंदा सुरू केल्यावर कोणत्या व्यावहारिक सूचनांचा अवलंब करता येईल याची उजळणी करतात.
२० मि: “अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेवा करू शकाल का?”a दूरच्या किंवा क्वचित कार्य केल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्थानिक प्रचारकांना आलेले अनुभव सांगा.—आमची सेवा पुस्तक, पृष्ठे ११२-१३.
गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ९ (३७)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१५ मि: सर्व राष्ट्रांसाठी सुवार्ता. श्रोत्यांबरोबर चर्चा आणि प्रात्यक्षिक. या देशात अनेक भाषा बोलल्या जातात. वेगळी भाषा बोलणाऱ्या लोकांना आपण सर्व लोकांसाठी सुवार्ता या पुस्तिकेचा उपयोग करून कशाप्रकारे साक्ष देऊ शकतो ते दाखवा. या पुस्तिकेच्या पृष्ठ २ वरील “या पुस्तिकेचा उपयोग” या शीर्षकाखालील माहितीचा सारांश द्या आणि तुमच्या मंडळीत चालणाऱ्या भाषेत पुस्तिकेत दिलेला संदेश वाचून दाखवा. घरोघरचे कार्य करताना, दुसरी भाषा बोलणारी व्यक्ती समोर येते तेव्हा आपण काय करू शकतो त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. तुमच्या क्षेत्रात हे कसे करण्यात आले त्याचे काही अनुभव असतील ते सांगा.—आमची राज्य सेवा फेब्रुवारी १९९८ मधील पुरवणी, परिच्छेद ७, ८.
२० मि: “कचरू नका!”b वेळ असल्यास टेहळणी बुरूज डिसेंबर १५, १९९९, पृष्ठ २५ वरील अनुभव सांगा.
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
५ मि: स्थानीय घोषणा.
२० मि: युवकांनो—तुमच्या शिक्षणाची योजना करताना समजदारी दाखवा. एक वडील काही पालक आणि त्यांच्या किशोरवयीन मुलांसोबत अतिरिक्त शिक्षणाबाबत चर्चा करतात. वडील, टेहळणी बुरूज सप्टेंबर १, १९९९ पृष्ठे १६, १७ वरील परिच्छेद ११-१३ यांची चर्चा करतात. पूर्ण वेळेच्या सेवेला प्राधान्य देण्याच्या कारणांवर ते जोर देतात. (टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९९६ पृष्ठे १८, १९, परिच्छेद १३-१५) वडील, पालक आणि किशोरवयीन सर्व मिळून सावध राहा! मार्च ८, १९९८ पृष्ठे २०-१ वरील सल्ल्याची उजळणी करतात आणि अतिरिक्त शिक्षणाच्या लाभांचा आणि तोट्यांचा विचार करण्याकरता समजदारी हवी यावर तसेच, सेवेमध्ये आवेशाने भाग घेण्यासोबतच स्वतःचा आर्थिक भार उचलण्याकरता जितकी आवश्यकता तितकेच शिक्षण पुरेसे आहे यावर जोर देतात. राज्याला प्रथम स्थान देण्याविषयी येशूने दिलेल्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे हे सर्वजण कबूल करतात.—मत्त. ६:३३.
२० मि: “यशयाच्या भविष्यवाणीचा अभ्यास करण्यासाठी तयार व्हा!”c यशयाच्या पुस्तकाचा अभ्यास केल्याने आपल्याला फायदा कसा मिळू शकेल यावर संक्षिप्तपणे विवेचन मांडा. (यशयाची भविष्यवाणी १, [इंग्रजी] अध्याय १, परिच्छेद १०-१२ पाहा) मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला नियमितरीत्या उपस्थित राहण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
५ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना जुलै महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या.
१० मि: स्थानीय गरजा.
१४ मि: “अधिवेशने—आनंद करण्याचा समय!” वडिलांचे भाषण. बायबलच्या काळात यहोवाचे लोक मोठ्या संख्येने एकत्र का यायचे आणि आजही अशाप्रकारे एकत्र येण्याने काय लाभ होतो ते सांगा. या प्रसंगांदरम्यान आपण एकमेकांच्या सहवासाचा लाभ घेऊ शकतो ज्यामुळे आपल्याला बळकटी मिळते शिवाय महत्त्वपूर्ण आध्यात्मिक अन्न देखील मिळते. प्रांतीय अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
१६ मि: “‘शिस्तवार व व्यवस्थितपणे’ संघटित.”d अधिवेशन यशस्वी करण्यासाठी कोणकोणत्या मोठ्या योजना कराव्या लागतात त्यांपैकी काहींचे वर्णन करून सांगा. आपल्या लाभासाठी जे काही केले जाते त्याला पूर्ण सहकार्य देण्याच्या महत्त्वावर जोर द्या. योग्य आदर कसा दाखवता येतो आणि विनाकारण उद्भवणाऱ्या समस्या कशाप्रकारे टाळता येतात त्याच्या काही मार्गांची उजळणी करा.
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४६)
१० मि: स्थानीय घोषणा. कामाला जात असताना प्रवासात, सुटीला गेल्यावर किंवा साक्षीदार नसलेल्या नातेवाईकांना भेटायला गेल्यावर अनौपचारिक साक्ष दिल्याचे अनुभव श्रोत्यांना विचारा.
१७ मि: ‘ऐकून ज्ञान वाढवा.’ भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. अधिवेशनांमध्ये पुरवले जाणारे शिक्षण आपल्याला लागणाऱ्या महत्त्वपूर्ण आध्यात्मिक अन्नासारखे का आहे ते सांगा. असा कार्यक्रम तयार करण्यात बांधवांनी जो वेळ खर्च केला, जे परिश्रम घेतले त्यावर विवेचन मांडा. स्वतःला आणि इतरांना होता होईल तितका लाभ मिळावा याची खात्री करण्यासाठी प्रत्येक जण काय करीत आहे याबद्दल श्रोत्यांना विचारा. प्रत्येक सत्राची सुरवात होण्याआधी आपापल्या जागेवर बसण्याच्या महत्त्वावर जोर द्या.
१८ मि: “चांगले करून प्रशंसा मिळवा!”e आपण एखाद्या मोठ्या अधिवेशनात येतो तेव्हा सर्वांचे लक्ष आपल्याकडे का जाते त्याचे कारण सांगा. लोकांकडून मिळणारी प्रशंसा राज्याची साक्ष देते परंतु काही लोकांकडून येणाऱ्या टीकात्मक बोलण्यामुळे इतर लोक राज्याकडे आकर्षित होणार नाहीत. इतरांबद्दल आपल्याला खरोखर काळजी आहे शिवाय आपल्यामध्ये इतरही ख्रिस्ती गुण आहेत हे दाखवण्यासाठी आपण कोणकोणत्या विशिष्ट गोष्टी करू शकतो ते सांगा.
गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.