वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०१ पृ. १
  • कचरू नका!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कचरू नका!
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • “शुभवृत्त विदित करणे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • घरोघरच्या सेवाकार्यात येणाऱ्‍या आव्हानांवर मात करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • यहोवा खरोखरच तुमची काळजी करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • घरोघरी, मार्गावरी
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ७/०१ पृ. १

कचरू नका!

१ घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी आपण तयार होतो तेव्हा, इतरांच्या दारावर जाऊन साक्ष देणे तर दूर राहिले, पण आपले स्वतःचे दार ओलांडून या कार्यासाठी बाहेर पडणेच आपल्याला कठीण वाटत असेल. आपण या कार्यासाठी योग्य नाही, असे आपल्याला वाटत असल्यामुळे कदाचित आपण ‘सर्व माणसांना’ सत्य सांगण्यास कचरत असू. (१ तीम. २:४) पण सुवार्तेचा प्रचार करण्यास आपण घाबरण्याचे कारण नाही. का बरे?

२ हा यहोवाचा संदेश आहे: यहोवाने बायबलमध्ये आपल्याला त्याचे विचार कळवले आहेत. आपण लोकांकडे जातो तेव्हा त्यांना आपले विचार नव्हे तर यहोवाचे विचार सांगत असतो. (रोम. १०:१३-१५) लोक राज्य संदेश ऐकत नाहीत तेव्हा, खरे तर ते यहोवाचा संदेश ऐकण्याचे नाकारत असतात. तरीपण आपण निराश होत नाही. आपल्याला याची पूर्ण खात्री आहे, की जगिक परिस्थितीत बदल व्हावा अशी इच्छा बाळगणारे व आपल्या आध्यात्मिक गरजांची जाणीव असणारे लोक हा संदेश ऐकून निश्‍चितच प्रतिसाद देतील.—यहे. ९:४; मत्त. ५:३, ६.

३ यहोवा लोकांना आकर्षित करतो: पूर्वी आपला संदेश न ऐकणारी व्यक्‍ती आता कदाचित, तिची परिस्थिती बदलल्यामुळे व तिचे अंतःकरण नरम झाल्यामुळे आपला संदेश ऐकायला तयार होईल. यहोवा कदाचित या व्यक्‍तीबद्दल सदिच्छा बाळगून तिला ‘आकर्षित करेल.’ (योहा. ६:४४, ६५) असे घडते तेव्हा, यहोवाने आपला उपयोग करून घ्यावा म्हणून आपण तयार असले पाहिजे व अशा लोकांना शोधण्याकरता देवदूतांकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचे पालन केले पाहिजे.—प्रकटी. १४:६.

४ देव आपल्याला त्याचा आत्मा देतो: पवित्र आत्मा आपल्याला “प्रभूविषयी [यहोवाविषयी] निर्भीडपणे” बोलण्याचे सामर्थ्य देतो. (प्रे. कृत्ये १४:१-३) सेवेमध्ये आपल्याला इतका शक्‍तिशाली पाठिंबा आहे, ही गोष्ट आठवणीत ठेवल्यास, शेजाऱ्‍यांना, सहकर्मचाऱ्‍यांना, वर्गमित्रांना, नातेवाईकांना किंवा सुशिक्षित अथवा श्रीमंत लोकांना सत्य सांगण्यास आपण कचरणार नाही.

५ येशू आपल्याला शिकवतो: येशू, विचारांना चालना देणारे प्रश्‍न विचारत असे, साधीसुधी उदाहरणे देत असे. शास्त्रवचनांतून तर्कवितर्क करून अगदी साध्यासुध्या शब्दांत, मनोवेधकरितीने आणि पूर्ण मनापासून तो लोकांना सत्य शिकवत असे. येशूने वापरलेल्या या पद्धती आजही सर्वात परिणामकारक आहेत. (१ करिंथ. ४:१७) आपण सर्व जण वेगवेगळ्या परिस्थितीत प्रचार करीत असलो तरी आपण ज्याचा प्रचार करतो तो शक्‍तिशाली राज्य संदेश मात्र एकच आहे.

६ या अद्‌भुत व खास मार्गाने लोकांना मदत करण्यासाठी यहोवा आपला उपयोग करून घेतो हा आपल्याकरता एक बहुमान आहे. तेव्हा, आपण मुळीच कचरू नये! उलट आपण धाडसी होऊ या आणि यहोवाला ‘आपल्यासाठी दार उघडू’ देऊ या जेणेकरून आपल्याला इतरांना सुवार्ता सांगता येईल.—कलस्सै. ४:२-४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा