सेवा सभा आराखडा
जून ११ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २० (९३)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. जून २५ ने सुरू होणाऱ्या सप्ताहादरम्यानच्या सेवा सभेत जेहोवाज विटनेसेस स्टॅण्ड फर्म अगेन्स्ट नात्सी असॉल्ट या व्हिडिओवर प्रश्नोत्तराने चर्चा केली जाईल; तेव्हा सर्वांना हा व्हिडिओ पाहण्याचे उत्तेजन द्या.
१५ मि: “‘चांगले ते करत राहा.’” वडीलांचे शास्त्रवचनांवर आधारित प्रोत्साहनदायक भाषण.
२० मि: “तुमच्या विद्यार्थ्याच्या हृदयावर सत्य बिंबवा.”a सत्य शिकत असलेल्या नवीन लोकांमध्ये यहोवा आणि येशू यांच्याबद्दल विश्वास आणि प्रेम कसे निर्माण करता येईल यावर व्यावहारिक सूचना द्या. जुलै १५, १९९९ टेहळणी बुरूज, पृष्ठ १४, परिच्छेद १८-२० मधील मुख्य मुद्द्यांचा समावेश करा.
गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून १८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २० (९३)
५ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.
१० मि: संभाषण थांबवणाऱ्यांशी चर्चा. श्रोत्यांबरोबर चर्चा करा. रिझनींग पुस्तकाच्या पृष्ठे १५-१६ वरील “कॉमेन्ट्स” सदराखालील माहितीची उजळणी करा. पृष्ठे १६-२० वरून, तुमच्या क्षेत्रात लोक सहसा विचारत असलेले प्रश्न निवडून त्यावर चर्चा करा. या प्रश्नांची आपण यशस्वीरीत्या उत्तरे कशी देऊ शकलो व त्यांना तसे का जमले ते श्रोत्यांमधील काहींना सांगण्यास सांगा.
१५ मि: युवकहो—सुज्ञपणे आपले करिअर निवडा. तीन भागांच्या सेवा सभेचा हा पहिला भाग आहे. या भागांमध्ये अतिरिक्त शिक्षणाशी संबंधित असलेल्या शास्त्रवचनीय तत्त्वांची उजळणी करण्यात येईल. काही ख्रिस्ती तरुण, उच्च शिक्षण घेण्याद्वारे जगिक करिअरच्या मागे लागले आहेत. यामुळे त्यांच्या आध्यात्मिकतेवर वाईट परिणाम होत आहे. आईवडील आणि त्यांचा किशोरवयीन मुलगा अथवा मुलगी यांच्यामधील चर्चेद्वारे हा भाग हाताळण्यात यावा. यात असे दाखवा, की तरुणीला अथवा तरुणाला भवितव्याविषयी गंभीर निर्णय घ्यावा लागत आहे. काहींना, आर्थिक लाभ, प्रतिष्ठा किंवा जीवनातील सुखचैन मिळवण्याची इच्छा असली तरी, बायबल याबाबतीत काय सल्ला देते याची कुटुंबातले सर्व मिळून चर्चा करतात. (तरुणांचे प्रश्न, पृष्ठे १७४-५; टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, १९९७, पृष्ठ २१ आणि सप्टेंबर १, १९९९, पृष्ठे १९-२१ परिच्छेद १-३ आणि ५-६ पाहा.) राज्याच्या कार्याच्या प्रगतीसाठी ईश्वरशासित ध्येय साध्य करण्यास त्याला किंवा तिला साहाय्य करू शकेल असे करिअर निवडणे सुज्ञपणाचे आहे हे तरुण/तरुणी कबूल करतो/करते.
१५ मि: “निराशेवर औषध आहे!” टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १, २००१, पृष्ठे २०-२३ वरील लेखावर आधारित वडिलांचे भाषण.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून २५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ७ (५१)
१५ मि: स्थानीय घोषणा. जुलै व ऑगस्टसाठी असलेल्या साहित्य सादरतेची उजळणी करा. मंडळीकडे उपलब्ध असलेल्या दोन माहितीपत्रकांवर विशेष जोर द्या. ही माहितीपत्रके सेवेत कशाप्रकारे सादर केली जाऊ शकतात त्याची चांगली तयारी केलेली प्रात्यक्षिके दाखवा. जुलै व ऑगस्ट १९९५ पासून १९९८ पर्यंतच्या आमची राज्य सेवा अंकांच्या शेवटल्या पानांवर सुचवलेल्या सादरता पाहा.
३० मि: “माझे मत ठाम आहे! मी बदलणार नाही! कधीच बदलणार नाही!” स्टॅण्ड फर्म व्हिडिओवर, परिच्छेद २ मधील प्रश्नांच्या आधारे श्रोत्यांबरोबर चर्चा. मग, परिच्छेद ३ व ४ वर चर्चा करा. सावध राहा! नोव्हेंबर २२, १९९९, पृष्ठ ३१ वरील अनुभवाने या भागाचा समारोप करा. ऑगस्ट महिन्यात आपण द न्यू वर्ल्ड सोसायटी इन ॲक्शन या व्हिडिओची उजळणी करण्याची अपेक्षा करू शकतो.
गीत क्र. १८ (१६२) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१३ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना जून महिन्याचा आपला क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. “तुमच्या व्यक्तिगत लायब्ररीत सर्व वार्षिकपुस्तके आहेत का?” या पेटीची उजळणी करा. १९९७ पासून २००० पर्यंतच्या वार्षिकपुस्तकांतील काही अनुभवांची संक्षिप्त विवरणे देऊन हे दाखवा की ती खरोखरच किती मौल्यवान आहेत. ज्यांच्या व्यक्तिगत लायब्ररीत वार्षिकपुस्तके नाहीत त्यांनी, साठा उपलब्ध आहे तोपर्यंत ऑर्डर द्यावी असे सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मि: स्थानीय गरजा.
१७ मि: “तुमच्या क्षेत्रातील कर्णबधिर लोकांकडे दुर्लक्ष करू नका.” भारतातील सर्व मंडळ्यांना, ऑक्टोबर १५, १९९८ तारखेच्या पत्रात, “दुसरी भाषा बोलणाऱ्या लोकांना शोधणे” या भागाची उजळणी करा. सावध राहा! एप्रिल २२, २००१, पृष्ठे १९-२३ वरील अनुभव संक्षिप्तपणे सांगा.
गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीप]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.