वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०१ पृ. १
  • ‘चांगले ते करत राहा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘चांगले ते करत राहा’
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
  • आमच्या व्यक्‍तीगत परिश्रमांना अनुसरून कापणी करणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • युवकांनो—यहोवाचे हृदय आनंदित करा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • आनंदी परमेश्‍वरासोबत आनंदी व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ६/०१ पृ. १

‘चांगले ते करत राहा’

१ यहोवाचा सेवक बनण्याद्वारे तुम्ही खूप चांगले केले आहे. परंतु या कठीण दिवसांत ‘चांगले ते करीत राहणे’ खरोखरच आव्हानात्मक आहे. (गलती. ६:९) यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम करावे लागले तरी ते शक्य आहे. ते कसे?

२ येशूची मनोवृत्ती विकसित करा: तुम्ही तुमचे लक्ष राज्य आशेवर केंद्रित ठेवल्यास तुम्हीही येशूप्रमाणे सर्व परीक्षा सहन करू शकाल. (इब्री. १२:२, ३) यहोवा तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही यशस्वी व्हावे असे त्याला वाटते हा भरवसा तुम्ही बाळगा. (२ पेत्र ३:९) त्याच्यावर पूर्ण विश्‍वास ठेवा, तो तुम्हाला हरप्रसंगी मार्ग दाखवील अशी खात्री बाळगा. (१ करिंथ. १०:१३) प्रार्थनेत तत्पर राहा; यहोवाकडे सहनशक्‍ती मागा. (रोम. १२:१२) धीर बाळगल्याने यहोवाच्या नजरेत तुम्ही स्वीकारयोग्य होता या खातरीमुळे आनंदी व्हा. (रोम. ५:३-५) ‘ख्रिस्ताच्या ठायी असलेल्या वृत्तीने वागण्याचा’ प्रयत्न केल्यामुळे तुम्ही स्वतः समाधानी व्हाल आणि यहोवाचेही मन आनंदित कराल.—रोम. १५:५, सुबोध भाषांतर; नीति. २७:११.

३ योग्य तेच करीत राहा: चांगले ते करीत राहण्यास मदत व्हावी म्हणून यहोवाने आपल्या लोकांसाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा पूर्ण फायदा करून घ्या. देवाचे वचन वाचण्याची आणि विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी पुरवल्या जाणाऱ्‍या बायबल आधारित प्रकाशनांचा अभ्यास करण्याची स्वतःला चांगली सवय लावा. मंडळीच्या सर्व सभांची विश्‍वासूपणे पूर्वतयारी करा, या सभांना उपस्थित राहा आणि त्यांत भाग घ्या. ख्रिस्ती सभांआधी व नंतर आपल्या आध्यात्मिक बंधूभगिनींची प्रेमळपणे विचारपूस करा. क्षेत्र सेवेत अर्थपूर्ण भाग घेण्याकरता व सुवार्ता सादर करण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्याकरता, सेवेत तुम्हाला गाठता येतील अशी ध्येये ठेवा.

४ अशाप्रकारे तुम्ही चांगले ते करीत राहू शकाल व त्याचबरोबर या सर्व कार्यांद्वारे भरपूर आनंदही मिळवू शकाल. याबाबतीत, इटलीतील एका बांधवाने असे म्हटले: “संपूर्ण दिवस यहोवाची सेवा करून संध्याकाळी मी घरी येतो तेव्हा साहजिकच थकलेलो असतो; पण, तरीसुद्धा यामुळे मला एक प्रकारचा आनंद मिळतो. हा असा आनंद आहे जो कोणीही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. याबद्दल मी मनापासून यहोवाचे आभार मानतो.” चांगले ते करत राहिल्यास तुम्हालाही हा आनंद अनुभवता येईल!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा