तुम्ही तुमच्या राज्य सभागृहाचा आदर करता का?
१ “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” (स्तोत्र १३३:१) आपल्या राज्य सभागृहात होणाऱ्या सभांमुळे आपल्याला बांधवांबरोबर एकत्र येण्याची संधी मिळते. त्यामुळे आपण एकमेकांना प्रीती व सत्कर्मे करायला उत्तेजन देऊ शकतो.—इब्री. १०:२४, २५.
२ राज्य सभागृहाला आपल्या जीवनात नेहमी महत्त्व दिले पाहिजे हे आपण पाहिले. तेव्हा, या राज्य सभागृहाचा आपण खरोखरच आदर करतो का? राज्य सभागृह आपल्या क्षेत्रात खऱ्या उपासनेचे एक केंद्र आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल मनापासून आदर दाखवला पाहिजे. सभागृह स्वच्छ व नीटनेटका ठेवावा असे सर्वांना वाटले पाहिजे. कधीकधी पुस्तक अभ्यास गटाला सभागृहाची स्वच्छता करण्याची नेमणूक मिळते. या कार्यात भाग घेऊन आपण, सभेचे स्थान स्वच्छ व आकर्षक असण्याची आपल्याला कदर आहे हे दाखवतो.
३ सभागृहाची स्वच्छता करण्याची आपली पाळी असली किंवा नसली तरी आपण सर्वजण सभागृहाबद्दल कदर दाखवू शकतो. ती कशी? सभागृहाच्या बाहेर पायपूस असल्यास, आत जाताना त्यावर आपले पाय पुसले तर आपल्या चपलांना किंवा बुटांना चिकटलेली घाण आत जाणार नाही. असे आपण सर्व वेळी करू शकतो; परंतु हवामान जेव्हा चांगले नसते तेव्हा विशेषकरून केले पाहिजे. शौचालयात हात धुण्यासाठी वॉश बेसिन असेल तर, हात धुतल्यानंतर आपण वॉश बेसिनच्या आजूबाजूला उडलेले पाणी पुसू शकतो जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीला त्याचा वापर करायला बरे वाटेल. लिटरेचर व मॅग्झीन काऊंटरवर काम करणारे बांधव रिकाम्या खोक्यांचा लगेचच बंदोबस्त करून आपली कदर व्यक्त करू शकतात. कचरा टाकण्यासाठी असलेल्या कचरा पेटीचा उपयोग करण्याची सर्वांनी सवय करावी. आपल्याला कागदाचे तुकडे किंवा इतर काही कचरा फरशीवर पडलेला दिसला की आपण तो उचलून कचरा पेटीत टाकावा. दुसरा कोणीतरी उचलून टाकेल, अशी मनोवृत्ती बाळगू नका.
४ आपण संमेलन किंवा अधिवेशनाला जातो तेव्हाही ही गोष्ट लागू होते. संमेलनाचे ठिकाण हे शुद्ध उपासनेचे केंद्र असते. मग ते संमेलनगृह आपले असो किंवा इतर कोणाचे असो, आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. बाहेर जाताना, आपण जेथे बसलो होतो तेथील सीटवर अथवा सीटच्या खाली काही कचरा किंवा चिठ्या-चिटोऱ्या तर पडल्या नाहीत, याची खात्री करावी. आपल्या सर्वांमध्ये एकमेकांना मदत करण्याची मनोवृत्ती असली पाहिजे. स्वच्छता करण्याचे काम आपले नाही, करणारे करतील अशी मनोवृत्ती आपण बाळगू नये.
एकच राज्य सभागृह वापरताना
५ जागेची किंमत बरीच वाढल्यामुळे अनेक मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात. काही शहरात, पाच किंवा कधीकधी सहा मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात. अशा वेळी प्रत्येक मंडळीने राज्य सभागृह स्वच्छ ठेवण्याची आवड दाखवली पाहिजे. सभागृह कोणा मनुष्याचे नव्हे तर यहोवाच्या मालकीचे आहे आणि येथे त्याची उपासना केली जाते ही जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. तेव्हा, यहोवावर आणि सभागृह वापरणाऱ्या सर्व बांधवांवर आपले प्रेम असेल तरच राज्य सभागृहाबद्दल आपला आदर दिसू शकतो.
६ सहसा, राज्य सभागृहाची स्वच्छता आठवड्यातून एकदाच केली जाते. एकापेक्षा अधिक मंडळ्या एकच सभागृह वापरतात तेव्हा मात्र प्रत्येक सभेनंतर थोडीफार स्वच्छता करावी लागत असेल. जेणेकरून, दुसऱ्या मंडळीचे बांधव सभेला येतील तेव्हा त्यांना त्यांचा सभागृह स्वच्छ दिसेल. ही गोष्ट रविवारच्या दिवशी देखील लागू होते जेव्हा एका मंडळीनंतर लगेच दुसरी मंडळी तेथे सभेसाठी येते. एका मंडळीची सभा संपल्यानंतर बांधवांनी वेळेनुसार, दुसऱ्या मंडळीच्या बांधवांकरता सभागृह स्वच्छ केल्यास बरे होईल. एकाच दिवशी अनेक मंडळ्या एकच सभागृह वापरतात तेव्हा शेवटच्या मंडळीने जाताना सभागृह स्वच्छ आहे की नाही, सर्वकाही जागच्या जागी आहे की नाही हे पाहावे. सभागृह अस्ताव्यस्त सोडून जाऊ नये.
७ आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत आपण सर्व “एकचित्ताने व एकमताने जोडलेले” आहोत; राज्य सभागृहांबद्दल आदर दाखवण्याविषयी देखील आपण एकाच विचाराचे होऊ या.—१ करिंथ. १:१०.