सुलभ वर्गणी नूतनीकरण पद्धत
टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गणीदारांना पूर्वी, त्यांची वर्गणी संपत आल्याच्या दोन नोटीसा मिळायच्या. पहिली नोटीस म्हणजे, मंडळीद्वारे वर्गणीदारांना वाटप करण्यात येणारी पूर्वछापील मुदत समाप्ती वर्गणी पावती. वर्गणीचे नूतनीकरण करण्याचा हा फॉर्म आहे.
दुसरी नोटीस म्हणजे, वर्गणीदारांना थेट पाठवलेल्या मासिकात घालून दिलेला वर्गणी नूतनीकरण फॉर्म. परंतु सुलभ साहित्य वितरण व्यवस्था सुरू झाल्यापासून वर्गणीदारांना हा फॉर्म पाठवण्याचे बंद करण्यात आले. पण, याला अपवाद म्हणजे ज्यांना ब्रेल लिपीत मासिके मिळतात त्यांना मात्र नूतनीकरण नोटीसा पुढेही पाठवल्या जातील.
प्रचारक आणि पायनियरांना उत्तेजन दिले जाते की त्यांनी मासिकाची आपली व्यक्तिगत प्रत, संस्थेकडून व्यक्तिगत वर्गणीद्वारे मागण्याऐवजी त्यांच्या मंडळीकडून घ्यावी. यामुळे संस्थेचे काम आणि खर्चही वाचेल.—भारतातील सर्व मंडळ्यांना ऑक्टोबर १५, १९९९ तारखेच्या पत्रात पृष्ठ २ वरील “टेहळणी बुरूज व सावध राहा! वर्गण्यांचे काय?” या मथळ्याखालील माहिती पाहावी.
क्षेत्रात मिळालेल्या वर्गण्यांच्या बाबतीत, मंडळीद्वारे दिली जाणारी पूर्वछापील मुदत समाप्ती वर्गणी पावती ही नोटीस देण्याची मुख्य पद्धत असेल. मंडळीला या पावत्या मिळाल्याबरोबर, ज्या प्रचारकांना त्या वर्गण्या मिळाल्या होत्या त्यांना त्या लवकरात लवकर देण्यात याव्यात. वर्गणीदारांना त्यांच्या मासिकातून कसलीही पावती येथून पुढे पाठवली जाणार नसल्यामुळे आपण या आस्थेवाईक लोकांना लवकरात लवकर भेटावे. या लोकांना मासिके वाचण्यास खरोखरच आवडतात का व वर्गणी पुढे चालू ठेवल्यास काही फायदा होईल का हे आपण परिस्थिती पाहून ठरवावे. व्यक्तीला आवड असल्यास, वर्गणी पाठवण्याचा पोस्टाचा खर्च वाचवण्यासाठी, वर्गणी करणाऱ्या व्यक्तीला आपण दर महिन्याला प्रत्यक्ष जाऊन मासिक देऊ शकू का हे पाहावे. यामुळे आपला मॅग्झीन रूट तयार होऊ शकेल आणि पुन्हा वर्गणी सुरू करण्याऐवजी दर महिन्याला त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून आपण तिची आवड आणखी वाढवू शकतो. पण जेथे ही गोष्ट शक्य होत नसेल तेथे वर्गणीचे नूतनीकरण करणे उत्तम असेल. नूतनीकरण करताना पूर्वछापील मुदत समाप्ती वर्गणी पावतीच पुन्हा पाठवल्यास उत्तम; त्यामुळे नूतनीकरणाचे काम लवकर होते. नूतनीकरण वर्गण्या नेहमी मंडळीद्वारेच संस्थेला पाठवल्या जाव्यात.—आमची राज्य सेवा नोव्हेंबर १९८८, पृष्ठ ४ आणि फेब्रुवारी १९८६, पृष्ठ ४ पाहा.
ज्या क्षेत्रात सहजरीत्या जाता येत नाही तेथे किंवा दूरवरच्या क्षेत्रात राहणाऱ्या वर्गणीदारांना मंडळीच मुदत समाप्त वर्गणी पावती पोस्टाने पाठवू शकते.
ही समयोचित मासिके या अंधकारमय जगात आध्यात्मिक प्रकाश प्रज्वलित करीत राहतील. आम्हाला याची खात्री आहे, की तुम्ही सर्वजण या नवीन योजनेला सहकार्य द्याल जेणेकरून टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गणीदारांचा एकही अंक चुकणार नाही.