वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०१ पृ. १
  • ‘देवाचे वचन समर्थ आहे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘देवाचे वचन समर्थ आहे’
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • “देवाचे वचन जिवंत व प्रभावशाली” आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • मन वळवण्याच्या कलेचा उपयोग करून शिकवा
    आमची राज्य सेवा—२०१०
  • बायबलचा प्रभावीपणे उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२००४
  • तुम्ही देवाच्या वचनाचे पुरस्कर्ते आहात का?
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ५/०१ पृ. १

‘देवाचे वचन समर्थ आहे’

१ “देवाचे वचन जिवंत आणि समर्थ” आहे, असे प्रेषित पौलाने लिहिले. (इब्री. ४:१२, पं.र.भा.) प्रेषित पौलाला येथे काय म्हणायचे होते? त्याला हे सांगायचे होते, की बायबलमध्ये असलेल्या देवाच्या संदेशाचा लोकांवर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. बायबलमध्ये असलेल्या सूज्ञ संदेशात एखाद्याच्या जीवनात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे. ज्याच्या जीवनात हा बदल होतो त्या मनुष्याचे यामुळे कल्याण होते. बायबलमधील सांत्वनदायक व आशादायक संदेशामुळे जीवन-दाता यहोवा देव याच्याकडे लोक आकर्षित होतात. शिवाय यामुळे प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना चिरकालिक जीवनाकडे जाणाऱ्‍या मार्गावर येण्यास मदत होते. परंतु हे सर्व प्रभाव आपल्याला पाहायचे असतील तर आपण इतरांना साक्ष देताना बायबलचा उपयोग केला पाहिजे.

२ मिळेल त्या संधीला वचन वाचा: असे दिसते, की बहुतेक प्रचारकांना प्रचार कार्यात बायबलचा उपयोग करण्याची सवय नाही. अशा प्रचारकांमध्ये तुम्ही देखील आहात का? आजकाल लोकांना खूप वेळ संभाषण करत बसण्यासाठी सवड नसल्यामुळे कदाचित तुम्हाला, फक्‍त प्रकाशन सादर करण्याची अथवा बायबल न उघडताच एखादे वचन तोंडी सांगण्याची सवय लागली असावी. परंतु आम्ही सर्व प्रचारकांना हे उत्तेजन देतो, की त्यांनी सुवार्ता सांगताना बायबल उघडून निदान एक तरी वचन वाचून दाखवावे. यामुळे समोरच्या व्यक्‍तीला हे समजेल की आपला संदेश खरोखर देवाच्या वचनातला आहे.

३ फार कमी लोक बायबल वाचत असले तरी, सहसा लोकांना बायबलबद्दल आदर असतो. त्यामुळे घाईगडबडीत असलेले लोकसुद्धा देवाच्या वचनातील संदेश ऐकण्यासाठी एकदोन मिनिटे तरी देतीलच. एखादे वचन प्रेमळपणे वाचून, समजावून सांगितले जाते तेव्हा यहोवाच्या वचनाच्या सामर्थ्याचा समोरच्या व्यक्‍तीवर चांगला प्रभाव पडू शकतो. परंतु सुरवातीची प्रस्तावना दिल्यानंतर बायबलमधील वचन वाचण्याआधी तुम्ही काय म्हणू शकता?

४ नियतकालिक कार्य करताना असे करून पाहा: एक प्रवासी पर्यवेक्षक नियतकालिक कार्य करताना शास्त्रवचनांचा प्रभावीपणे उपयोग करतात. ते आपल्या खिशात एक लहान आकाराचे बायबल नेहमी ठेवतात. समोरच्या व्यक्‍तीला नियतकालिके दाखवल्यावर व त्यातील एखाद्या लेखाचे संक्षिप्त वर्णन केल्यावर ते आपल्या खिशातून बायबल काढतात आणि त्यातून लेखाशी संबंधित असलेले एखादे वचन वाचून दाखवतात. “या प्रोत्साहनदायक अभिवचनाबद्दल तुम्हाला काय वाटते?” असा प्रश्‍न विचारून तुम्ही देखील एखादे निवडक वचन वाचून दाखवू शकता.

५ तुम्ही ज्यांना सुवार्ता सांगता त्या प्रत्येक व्यक्‍तीला बायबलमधून एक किंवा दोन वचने वाचून दाखवण्याचे ध्येय ठेवा. बायबलच्या प्रेरणादायक सामर्थ्यामुळे अधिकाधिक लोकांसाठी देवाकडे आकर्षित होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.—योहा. ६:४४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा