वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०१ पृ. १
  • कापणीच्या कामात पूर्ण भाग घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कापणीच्या कामात पूर्ण भाग घ्या
  • आमची राज्य सेवा—२००१
  • मिळती जुळती माहिती
  • शेते कापणीसाठी तयार झाली आहेत
    आमची राज्य सेवा—२०१०
  • कापणीच्या कामकऱ्‍यांनो आनंदी व्हा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • कापणीच्या कार्यात तत्पर राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • कापणीच्या कामासाठी तातडीने कामकरी हवेत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००१
km ५/०१ पृ. १

कापणीच्या कामात पूर्ण भाग घ्या

१ लोकांना गोळा करण्याच्या कामाविषयी यहोवाचे प्राचीन काळातील संदेष्टे तसेच स्वतः येशू ख्रिस्त देखील बोलला होता. (यश. ५६:८; यहे. ३४:११; योहा. १०:१६) राज्याच्या सुवार्तेचा प्रचार संपूर्ण जगभरात जसजसा केला जातो तसतसे हे गोळा करण्याचे काम उरकले जात आहे. (मत्त. २४:१४) देवाची सेवा करणाऱ्‍या आणि न करणाऱ्‍या लोकांमधील फरक आज अगदी स्पष्टपणे दिसत आहे. (मला. ३:१८) या सर्व गोष्टींचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?

२ व्यक्‍तिगत जबाबदारी: ख्रिस्ती सेवेत अग्रेसर असलेल्या पौलाच्या उदाहरणावरून आपण पुष्कळ काही शिकू शकतो. सुवार्ता ऐकून बचावाची संधी प्रत्येकाला मिळावी म्हणून लोकांना प्रचार करण्याची जबाबदारी त्याला जणू एखाद्या कर्तव्यासारखी वाटत होती. त्यामुळे हे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याने निरंतर परिश्रम घेतले. (रोम. १:१४-१७) आज मानवजातीच्या डोक्यावर संकटाची टांगती तलवार पाहून, आपल्याला नेमण्यात आलेल्या क्षेत्रातील लोकांना प्रचार करण्याची अधिक मोठी जबाबदारी आपल्यावर येत नाही का?—१ करिंथ. ९:१६.

३ तातडीचे पाऊल: आपल्या प्रचार कार्याची तुलना आपण शोध व बचाव मोहिमेशी करू शकतो. लोकांचा शोध घेऊन उशीर होण्याआधी त्यांना सुरक्षित स्थानी येण्यास मदत करण्याची आवश्‍यकता आहे. आपल्याकडे फार कमी वेळ आहे. परंतु अनेक लोकांचे जीव धोक्यात आहेत! म्हणून तर येशूने आपल्या शिष्यांस, “पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना” करण्यास आर्जवले.—मत्त. ९:३८.

४ जीवन वाचवण्याचे हे कार्य करण्याची तातडीने गरज आहे हे ओळखून अनेक राज्य सेवकांनी या कार्यातील आपला सहभाग वाढवला आहे. हिरोहिसा नावाचा एक किशोरवयीन, आपली आई व आपल्या चार धाकट्या भावंडांबरोबर राहत होता. पहाटे तीन वाजता उठून पेपर टाकण्याचे काम करून तो कुटुंबाला आर्थिकरीत्या हातभार लावत असे. पण, हिरोहिसाला सेवेमध्ये अधिक सहभाग घेण्याची तीव्र इच्छा होती. म्हणून त्याने सामान्य पायनियरींग सुरू केली. पुन्हा कधी न केल्या जाणाऱ्‍या या कार्यात पूर्ण भाग घेण्यासाठी तुमच्याजवळ काही मार्ग आहेत का?

५ “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.” (१ करिंथ. ७:२९) तेव्हा, पृथ्वीवर पूर्ण केल्या जाणाऱ्‍या सर्वात महत्त्वपूर्ण कार्यात—राज्य सुवार्तेच्या प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात आपल्याकडून जमेल तितका सहभाग घेण्याचा आपण प्रयत्न करू या. येशूने या सेवेची तुलना कापणीच्या कामाशी केली. (मत्त. ९:३५-३८) कापणीच्या कामात पूर्ण सहभाग घेऊन आपण जे परिश्रम करू त्याचे आपल्याला प्रतिफळ जरूर मिळेल. ते प्रतिफळ म्हणजे, आपण निदान एका व्यक्‍तीला तरी, प्रकटीकरण ७:९, १० या वचनांत वर्णन केलेल्या उपासकांच्या मोठ्या लोकसमुदायाचे भाग बनण्यास मदत करू शकू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा