सुटसुटीत सादरता सर्वोत्तम सादरता
१ लहान मुले जेव्हा राज्य संदेश सांगतात तेव्हा लोकांना तो जास्त का आवडतो? एक कारण म्हणजे, ते अगदी साध्या शब्दांत तो सांगतात. काही प्रचारकांना कदाचित वाटत असेल, की प्रभावशालीपणे साक्ष देण्यासाठी मोठमोठे शब्द वापरून आपण आपला संदेश सादर केला पाहिजे. परंतु, अनुभवावरून हेच दिसून येते, की साधी आणि स्पष्ट सादरताच सर्वात प्रभावशाली ठरते.
२ येशूने देवाच्या राज्याचा संदेश साध्या व सरळ शब्दांत दिला आणि त्याच्या शिष्यांनाही असेच करण्याचे प्रशिक्षण दिले. (मत्त. ४:१७; १०:५-७; लूक १०:१, ९) श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करण्याकरता व त्यांच्या हृदयापर्यंत पोहंचण्याकरता त्याने सुटसुटीत प्रस्तावना, प्रश्न आणि उदाहरणांचा उपयोग केला. (योहा. ४:७-१४) आपणही त्याचे अनुकरण करू शकतो व सर्वांना समजतील अशा सादरता देऊ शकतो.
३ आपल्याला ‘राज्याच्या सुवार्तेची’ घोषणा करायची आहे. (मत्त. २४:१४) तुमचा मुख्य विषय ‘राज्य’ असेल तर तुम्ही साधी व सोपी सादरता करू शकाल. लोकांना ज्या विषयांची काळजी वाटते ते विषय त्यांच्याशी बोला. स्त्रियांना सहसा राजकीय घडामोडीऐवजी आपल्या कुटुंबाची जास्त काळजी वाटत असते. पित्याला त्याच्या नोकरीची व कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता असते. तरुणांना त्यांच्या भविष्याची आणि वृद्धांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी लागलेली असते. बाहेरच्या जगात काय चालले आहे त्याऐवजी लोकांना त्यांच्या परिसरात काय चालले आहे याची जास्त चिंता वाटते. समान आस्थेचे विषय बोलून झाल्यावर त्यांचे लक्ष देवाच्या राज्य शासनाकडे वळवा. हे राज्य आज्ञाधारक मानवजातीसाठी कोणकोणते आशीर्वाद आणणार आहे ते त्यांना सांगा. साध्या, निवडक शब्दांबरोबर एखादे शास्त्रवचन दाखवल्यास समोरची व्यक्ती निश्चितच तुमच्या बोलण्याकडे लक्ष देईल.
४ तुम्ही तुमचे संभाषण अशाप्रकारे सुरू करू शकता:
▪ “मानवजात असंख्य असाध्य रोगांनी ग्रासली आहे, याजशी तुम्ही सहमत असालच. परंतु देवाने फार लवकर सर्व प्रकारच्या आजारांपासून, शिवाय मृत्यूपासूनही मानवजातीची सुटका करण्याचे वचन दिले आहे, हे तुम्हाला माहीत होते का?” समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया पाहा आणि मग प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.
५ स्पष्ट व साध्या सादरतांद्वारे तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लोकांच्या मनांपर्यंत व हृदयांपर्यंत पोहंचू शकता. यहोवाचे ज्ञान घेण्यास त्यांना साहाय्य करून सार्वकालिक जीवनाची आशा बाळगण्यास तुम्ही त्यांना मदत करू शकता.—योहा. १७:३.