प्रश्न पेटी
◼ मंडळीत नवीन पुस्तक अभ्यास गट बनवणे केव्हा उचित असेल?
प्रत्येक पुस्तक अभ्यास गटात (यात राज्य सभागृहात होणाऱ्या गटाचा देखील समावेश होतो) जास्तीत जास्त पंधरा सदस्य असावेत, यापेक्षा कमी असल्यास हरकत नाही. त्याहून जास्त लोक असतील तर एक नवीन पुस्तक अभ्यास गट सुरू करण्याविषयी विचार करता येईल. असे करण्यामागचे कारण काय?
मंडळीचा पुस्तक अभ्यास गट लहान असतो तेव्हा पुस्तक अभ्यास संचालक आपल्या गटातील प्रत्येक व्यक्तीकडे जातीने लक्ष देऊ शकतात. शिवाय, लहान गटात प्रत्येकाला आपला विश्वास प्रदर्शित करण्याची अनेकदा संधी मिळते. (इब्री. १०:२३; १३:१५) मंडळीच्या क्षेत्रात, अनेक ठिकाणी असे लहान लहान गट असल्यामुळे सर्वांना या अभ्यासाला आणि क्षेत्र सेवेच्या सभांना उपस्थित राहणे जास्त सोयीस्कर होते. ज्या मंडळ्यांनी पुस्तक अभ्यास गटांची संख्या वाढवली त्यांच्या असे निदर्शनास आले, की यामुळे मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला उपस्थित राहणाऱ्या बांधवांची एकूण संख्या देखील वाढली आहे.
कधीकधी काही खास परिस्थितीमुळे एखादा नवीन गट, (मग तो खूपच लहान असला तरी) बनवण्याची गरज पडते. जसे की काही दूरदूरच्या क्षेत्रात किंवा जेव्हा एखाद्या गटात गर्दी होते किंवा बसायला जागा नसते तेव्हा नवीन गट बनवण्याची गरज पडते. वयस्कर बंधूभगिनींसाठी, रात्रपाळी करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांचे पती सत्यात नाही अशा भगिनींसाठी आवश्यक असल्यास दिवसाही पुस्तक अभ्यास ठेवता येईल.
प्रत्येक अभ्यास गटात अनेक आध्यात्मिकरीत्या अनुभवी व सक्रिय प्रचारक तसेच योग्यता असलेला एक संचालक व वाचक देखील असावा. मंडळीतील बांधवांनी या योग्यतेप्रत पोहंचण्याचा प्रयत्न करावा.
मंडळीच्या पुस्तक अभ्यास गटाचा आकार माफक आहे, गटातील प्रत्येकाची आध्यात्मिकरीत्या चांगली काळजी घेतली जात आहे व सर्वांना सोयीचे पडेल अशाच ठिकाणी पुस्तक अभ्यास संचालित केला जातो या सर्व गोष्टींची खात्री करून वडील जन मंडळीची वृद्धी होण्यास बढावा देऊ शकतात. व्यावहारिक असेल तेव्हा नवीन गट बनवावा जेणेकरून सर्वांना या अद्वितीय आध्यात्मिक योजनेचा पूर्ण फायदा घेता येईल. तुमच्या घरात पुस्तक अभ्यास व्हावा अशी तुम्ही तयारी दाखवू शकाल का? अनेकांनी असे केले आहे व यामुळे त्यांना अनेक आध्यात्मिक आशीर्वाद मिळाले आहेत.