वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०१ पृ. ५-६
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—२००१
आमची राज्य सेवा—२००१
km ४/०१ पृ. ५-६

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत जानेवारी १ ते एप्रिल २३, २००१ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा:

१. केवळ भावनाविवश होऊन आपण गंभीर अपराधाकडे कानाडोळा करू नये; तरी आपल्याविरुद्ध पाप केलेल्या पश्‍चात्तापी व्यक्‍तीला दयाळुपणाने क्षमा करण्यामध्ये आपण योसेफाचे अनुकरण करू शकतो. (उत्प. ४२:२१; ४५:४, ५) [w-MR९९ १/१ पृ. ३१ परि. २-३.]

२. एकच विश्‍वास हा वैवाहिक दांपत्याच्या एकतेचे एकमेव कारण आहे. [fy-MR पृ. २१, २२ परि. १४.]

३. ख्रिस्ताधीन असलेले देवाचे राज्य संपूर्ण पृथ्वीवर पसरून त्यावर शासन करील ही भविष्यवाणी हबक्कूकच्या पुस्तकात केली आहे. [br78-MR पृ. १६ परि. ३.]

४. स्वर्गातले राज्य सोडून स्वर्गदूतांपेक्षा कमी दर्जाच्या मानवी रूपात पृथ्वीवर येण्याची अनोखी नेमणूक स्वीकारून येशूने नम्रता दर्शवली. (फिलिप्पै. २:५-८; इब्री. २:७) [w-MR९९ २/१ पृ. ६ परि. ३.]

५. शिशकने यहुदावर स्वारी करून “परमेश्‍वराच्या मंदिरातील व राजवाड्यातील सर्व भांडार लुटून नेले” याला पुरातनवस्तूशास्त्राचा पुरावा आहे. (२ इति. १२:९) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८९ ३/१ पृ. ३१ परि. ४.]

६. येशूचा बाप्तिस्मा होताना “आकाश उघडले” याचा अर्थ स्वर्गातील त्याच्या मानवपूर्व अस्तित्वाची आठवण त्याला झाली. (मत्त. ३:१६) [gt-MR १२.]

७. देवाची सेवा करताना आपण प्रतिफळाचा मुळीच विचार करू नये. [w-MR९९ ४/१५ पृ. १६ परि. १ पाहा.]

८. स्तोत्र १०३:२ [NW] येथे यहोवाची “कार्ये” म्हणताना दावीदाच्या मनात यहोवाची शारीरिक सृष्टी होती. [w-MR९९ ५/१५ पृ. २१ परि. ५-६.]

९. आध्यात्मिक महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा केवळ कौटुंबिक अभ्यासातच करावी असे नाही. [fy-MR पृ. ७० परि. १४.]

१०. चांगला कुटुंबप्रमुख होण्यासाठी पत्नी पतीला मदत करू शकत नाही. [fy-MR पृ. ३४, ३५ परि. १७, १८.]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. वैवाहिक जीवनासाठी बायबलमध्ये सर्वोत्तम सल्ला आहे असे मानणे उचित का आहे? [fy-MR पृ. १० परि. १८.]

१२. योसेफ आणि मरीया यांचा विवाह झाला नव्हता तर मग त्याने तिला ‘सोडण्याचा विचार केला’ असे कसे म्हटले आहे? (मत्त. १:१८, १९) [gt-MR ४.]

१३. यहुदी राजा उज्जीया याच्या उदाहरणावरून चांगल्या गुणांविषयी कोणता धडा शिकायला मिळतो? (२ इति. २६:१५-२१) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९९ १२/१ पृ. २६ परि. १-२ पाहा.]

१४. एखादी परंपरा सुरू करण्याऐवजी, येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुऊन कोणता प्रभावकारी धडा शिकवला? (योहा. १३:४, ५) [w-MR९९ ३/१ पृ. ३१ परि. १.]

१५. यशयाच्या काळातल्या लोकांसाठी १ इतिहास १४:८-१७ मधील वृत्तान्त रोचक का होता आणि आज ख्रिस्ती धर्मजगतासाठी तो महत्त्वाचा का आहे? (यश. २८:२१) [साप्ताहिक बायबल वाचन; w९१ (इंग्रजी) ६/१ पृ. २१ परि. २-३.]

१६. पुष्कळ इस्राएली लोकांना बआल उपासनेतल्या कोणत्या गोष्टी आवडत होत्या? [w-MR९९ ४/१ पृ. २९ परि. ३-६.]

१७. जेरूसलेमच्या पाण्याचा पुरवठा जपून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हिज्कीयाने खोदलेल्या भुयारावरून आपल्याला कोणता व्यावहारिक धडा शिकायला मिळतो? (२ इति. ३२:३, ४) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९६ ८/१५ पृ. ६ परि. १-२ पाहा.]

१८. देवाची सेवा करण्यासाठी आणि खोट्या उपासनेविरुद्ध उभे राहण्यासाठी योशियाच्या उदाहरणावरून आजचे तरुण कसे उत्तेजन प्राप्त करू शकतात? (२ इति. ३४:३, ८, ३३) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९० ८/१ पृ. ५ परि. २ पाहा.]

१९. बॅबिलोन येथील सगळे यहुदी अविश्‍वासू होते का आणि यातून आपल्याला कोणता व्यावहारिक धडा शिकायला मिळतो? (एज्रा १:३-६) [साप्ताहिक बायबल वाचन; w८६ (इंग्रजी) १/१५ पृ. ८ परि. ४, ७ पाहा.]

२०. दुसरे इतिहास ५:१३, १४ च्या वृत्तान्तात यहोवा आपल्या लोकांचे मधुर गुणगान ऐकत होता आणि त्यांच्यावर संतुष्ट झाला हे कशावरून कळून येते? [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR९४ ५/१ पृ. १० परि. ७.]

शब्द किंवा वाक्यांश घालून पुढील वाक्ये पूर्ण करा:

२१. कोणा सह-ख्रिश्‍चनाला सूचना किंवा सल्ला देताना, आपण जे बोलत आहोत ते माणसांच्या ______________________ किंवा _____________________ नव्हे तर देवाच्या ______________________ आधारित आहे याची खात्री करावी. (कलस्सै. २:८) [w-MR९९ १/१५ पृ. २२ परि. १.]

२२. यहोवाचे साक्षीदार आस्थेवाईक लोकांच्या ________________ जाऊन विनामूल्य _________________ चालवतात. [br78-MR पृ. २८ परि. १.]

२३. ज्याप्रमाणे काट्यांमुळे बीज वाढत नाही त्याप्रमाणे अनियंत्रित ________________ आणि _________________ याची फसवी शक्‍ती आध्यात्मिक वाढीला अडथळा आणू शकते. (मत्त. १३:१९, २२) [w-MR९९ ३/१५ पृ. २२ परि. ५.]

२४. सैतान, कदाचित ऐहिक ऐश्‍वर्य, ___________________ व __________________ यांच्या मोहविणाऱ्‍या संधी आपल्यासमोर ठेवून आपल्याला ___________________ प्रयत्न करील. [gt-MR १३.]

२५. शलमोनासारखे न फसण्यासाठी खऱ्‍या ख्रिश्‍चनाने आपल्या सेवाकार्यातील सर्व __________________ वा _____________________ यांचा त्याग करावा व “यहोवा आपला देव यावर पूर्ण अंतःकरणाने प्रीती” करा या _________________________ सूचनेचा अवलंब करावा. (मत्त. २२:२७; १ इति. २८:९) [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८७ ८/१ पृ. १२ परि. १७-१८ पाहा.]

पुढील वाक्यांतील बरोबर उत्तर निवडा:

२६. दुसरे राजे १७:५, ६ येथील वृत्तान्तावरून दिसून येते की, (तिग्लथ पिल्सर; शलमनेस्सर ५; एसर-हद्दोन) याने इस्राएलाच्या दहा वंशीय राज्यावर स्वारी केली आणि शोमरोनाला तीन वर्षांपर्यंत वेढा घातला जे शेवटी सा.यु.पू. (७४०; ६०७; ५३७) मध्ये अश्‍शुऱ्‍यांच्या हाती पडले. [साप्ताहिक बायबल वाचन; w-MR८९ ८/१ पृ. २९ परि. १ पाहा.]

२७. बायबल सुमारे (३५००; २०००; १०००) वर्षांपूर्वी लिहून पूर्ण झाले असले तरी त्याचा सल्ला खरोखर अद्ययावत आहे. [fy-MR पृ. १२ परि. २३.]

२८. निर्गम ४:११ मध्ये सांगितल्यानुसार, ‘मुके, बहिरे, डोळस किंवा आंधळे’ हे यहोवा देवाने केले आहेत अर्थात (तो लोकांमधील व्यंगत्वांसाठी जबाबदार आहे; तो वेगवेगळ्या लोकांना खास हक्क देतो; त्याने मानवांमधील या व्यंगत्वांना अनुमती दिली आहे). [w-MR९९ ५/१ पृ. २८ परि. २.]

२९. ख्रिस्ती पालक (दयाळुपणाची; खंबीरपणाची; कठोरतेची) गरज ओळखून त्यांच्या मुलांना शिस्त लावताना इफिसकर ६:४ मधील शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात. [fy-MR पृ. ६० परि. २१.]

३०. ख्रिस्ती धर्मजगताच्या प्रमुख शिकवणुकी पवित्र शास्त्राच्या शिकवणींवर नव्हे तर प्राचीन (वस्तुस्थिती; दंतकथा; परंपरा) यांच्यावर आधारलेल्या आहेत. [pr-MR पृ. १७ परि. ४.]

पुढील वचने खाली दिलेल्या वाक्यांशी जुळवा:

प्रे. कृत्ये १७:१०, ११; नीति. २५:११; रोम. १२:२; योहा. २:१५-१७; मत्त. १३:५५, ५६

३१. आपल्या विचारसरणीत बदल घडवून देवाच्या वचनाचे सत्य मनात भरण्यासाठी मनस्वी प्रयत्न करण्याची गरज आहे. [w-MR९९ ४/१ पृ. २२ परि. २.]

३२. सल्ला देताना अचूक शब्दांची निवड करणे आवश्‍यक आहे. [w-MR९९ १/१५ पृ. २३ परि. १.]

३३. पवित्र शास्त्रीय सत्य म्हणून शिकवल्या जाणाऱ्‍या शिकवणींचा मुद्दा येतो तेव्हा, बिरुयातील लोकांनी जो मार्ग अनुसरला त्याच मार्गाला यहोवाचे साक्षीदार ठामपणे मान्यता देतात. [br78-MR पृ. ३ परि. ४.]

३४. येशूला कमीत कमी सहा लहान भाऊ-बहिणी होत्या. [gt-MR ९.]

३५. शिष्य येशूला मंदिरातून व्यापाऱ्‍यांना आणि सराफांना घालवून देताना पाहतात तेव्हा त्यांना देवाच्या पुत्रासंबंधीची भविष्यवाणी आठवते. [gt-MR १६.]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा