सेवेत “गढून” जा
१ करिंथमध्ये असताना प्रेषित पौल तंबू बनवण्याचे काम करत होता असे जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याला प्रचार करण्यात जास्त वेळ घालवता आला नसावा असा कदाचित आपण निष्कर्ष काढू. परंतु, प्रेषितांची कृत्ये १८:५ म्हणते: “येशू हाच ख्रिस्त आहे, अशी यहूद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता.” (तिरपे वळण आमचे.) पण प्रचार कार्यात तो इतका गढून का गेला होता? करिंथमध्ये तर अनेक लोकांनी सत्याचा स्वीकार केला होता तरीसुद्धा प्रभूने त्याला खात्रीने सांगितले होते, की त्या शहरातील अनेक लोक शिष्य होणार होते. (प्रे. कृत्ये १८:८-११) सेवेमध्ये गढून जाण्यासाठी तुमच्याकडेही असेच कारण आहे का? होय. आणखी पुष्कळ लोक आहेत ज्यांना सत्य शिकवणे बाकी आहे.
२ एप्रिलमध्ये सेवेत अधिक वेळ घालवा: अर्थात, प्रत्येक महिन्यात सुवार्तेचा प्रचार करण्यात व्यस्त राहण्याचे तुमचे कदाचित ध्येय असेल. परंतु वर्षाच्या काही महिन्यांत आपल्याला सेवेत आणखीनच “गढून” जाण्याची संधी मिळते. या महिन्यांमध्ये एप्रिल महिन्याचा समावेश होतो; कारण सहसा याच महिन्यात स्मारक विधी असतो. या उन्हाळ्यात तुम्हाला साहाय्यक पायनियरींग किंवा सेवेत जास्त भाग घेता आला का? असे करत असलेल्या अनेक प्रचारकांना भरपूर आशीर्वाद मिळाले आहेत. (२ करिंथ. ९:६) तुम्हाला शक्य ते सर्व तुम्ही करत असाल तर यहोवा तुमच्या पूर्ण मनाने केलेल्या सेवेवर संतुष्ट राहील हे आठवणीत असू द्या. (लूक २१:२-४) तुमची परिस्थिती काहीही असो, एप्रिल महिन्यात सेवेमध्ये “गढून” जाण्याचे ध्येय ठेवा. आणि महिन्याच्या शेवटी तुमचा क्षेत्र सेवेचा अहवाल द्यायला विसरू नका! यहोवाच्या इतर लोकांच्या प्रयत्नांबरोबर तुमचेही प्रयत्न तेव्हा गणले जातील.
३ स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या नवीन लोकांना भेट द्या: गेल्या वर्षी, भारतात ४९,१२० लोक स्मारक विधीला उपस्थित होते. या वर्षाची एकूण उपस्थिती लवकरच कळेल. तरीपण, अहवालांवरून तर असे सूचित होते, की ‘कापणीचे’ खरोखरच भरपूर काम अद्याप बाकी आहे. (मत्त. ९:३७, ३८) तेव्हा, स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या आस्थेवाईक लोकांना होता होईल तितक्या लवकर भेट द्या आणि त्यांना आध्यात्मिकरीत्या साहाय्य करा. दिरंगाई केल्यास, ‘दुष्ट येऊन त्यांच्या अंतःकरणात पेरलेले सत्याचे बीज हिरावून घेऊ शकतो.’ (मत्त. १३:१९) लवकरात लवकर दिलेल्या भेटीवरून हे सिद्ध होईल की तुम्ही खरोखरच सेवेत “गढून” गेला आहात.
४ अक्रियाक झालेल्यांना मदत करीत राहा: फेब्रुवारी महिन्यापासून अक्रियाक झालेल्यांना मदत करण्याचा खास प्रयत्न सुरू झाला आहे. ज्या अक्रियाक लोकांकडे वडिलांनी मेंढपाळकत्वाच्या भेटी दिल्या नाहीत त्यांना एप्रिल महिना संपायच्या आत भेट देण्याची वडिलांनी योजना करावी. त्या व्यक्तीची काय समस्या आहे व तिला पुन्हा एकदा यहोवाची सेवा करण्यास क्रियाशील कसे बनवता येईल यावर वडील विचार करतील. या प्रेमळ साहाय्यावरून हे सिद्ध होईल, की मेंढपाळ या नात्याने “देवाच्या कळपाचे पालन” करण्याची वडिलांची जबाबदारी ते गांभिर्याने पूर्ण करीत आहेत. (१ पेत्र ५:२; प्रे. कृत्ये २०:२८) अक्रियाक झालेल्यांवर परिणाम करू शकणाऱ्या समस्यांपैकी कोणत्याही पाच समस्यांचा उल्लेख करताना वडील जन सप्टेंबर १५, १९९३ च्या टेहळणी बुरूज (इंग्रजी) पृष्ठे २२-३ वरील सर्वोत्तम सल्ल्यांचा उपयोग करू शकतात. काही अक्रियाक लोकांना एप्रिल महिन्यात पुन्हा सक्रिय होण्यास मदत केल्यास उत्तम ठरेल.
५ अधिकाधिक लोकांना बाप्तिस्मारहित प्रचारक होण्यास मदत करा: तुमची मुले सुवार्तेचे प्रचारक बनले आहेत का? तुम्ही ज्यांच्याबरोबर बायबल अभ्यास करता ते प्रचारक बनले आहेत का? वडिलांनी त्यांना पात्र ठरवले असेल तर एप्रिल महिना त्यांच्यासाठी प्रचारक म्हणून आपली सेवा सुरू करण्यासाठी उत्तम महिना आहे. एखाद्या व्यक्तीने अपेक्षा माहितीपत्रकातून व त्यानंतर ज्ञान पुस्तकातून अभ्यास घेतला असेल व तो प्रगती करीत असेल तर त्याचा बायबल अभ्यास पुढेही चालू ठेवता येऊ शकतो. देवाचे वचन, खरी शांती ही इंग्रजीतील पुस्तके किंवा मराठीतील उपासनेतील ऐक्य यांपैकी कोणत्याही एका पुस्तकातून त्याचा बायबल अभ्यास पुढे चालू ठेवता येऊ शकतो. कारण या बायबल विद्यार्थ्याने सत्याविषयी आणखी समज प्राप्त करावी, बाप्तिस्मारहित प्रचारक बनावे व नंतर समर्पण करून यहोवाचा बाप्तिस्माप्राप्त प्रचारक बनावे म्हणून त्याला मदत करण्याचा आपला उद्देश आहे.—इफिस. ३:१७-१९; १ तीम. १:१२; १ पेत्र ३:२१.
६ तुमच्या बायबल विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही चिकाटीने व प्रेमळपणे घेत असलेल्या आवडीमुळे कालांतराने त्यांना सत्याचा स्वीकार करण्यास मदत होऊ शकते. एका साक्षीदार बांधवाची एका वयस्कर जोडप्याशी गाठ पडली. या जोडप्याने बायबल अभ्यास करण्याची आनंदाने तयारी दर्शवली. पण सलग तीन आठवड्यांपर्यंत हे जोडपे अभ्यास पुढे ढकलत राहिले. सरतेशेवटी अभ्यास सुरू झाला. मग, एक आठवडा सोडून दुसऱ्या आठवडी त्यांनी अभ्यास रद्द केला. परंतु, त्या पत्नीने मात्र बाप्तिस्मा घेण्याइतपत प्रगती केली. साक्षीदार बांधव म्हणतो: “तिचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले; तिला पाहून आम्हा पती-पत्नीच्या डोळ्यांत देखील आनंदाश्रू आले.” सुवार्तेच्या प्रचारात “गढून” गेल्याने खरोखरच खूप आनंद मिळतो!
७ आपण शेवटच्या काळाच्या अगदी शेवटच्या दिवसात जगत आहोत हे बायबल भविष्यवाणींवरून व जगात घडणाऱ्या घटनांवरून सूचित होते. त्यामुळे देवाच्या सर्व लोकांनी इतरांना सुवार्ता सांगण्याच्या कामात पूर्णपणे “गढून” जाण्याचा हाच समय आहे. ‘प्रभूमध्ये आपण करत असलेले श्रम व्यर्थ जाणार नाहीत,’ असे प्रेषित पौल आपल्याला आश्वासन देतो.—१ करिंथ. १५:५८.