घोषणा
▪ साहित्य सादरता एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके. ज्या लोकांना आपण पुनर्भेटी देतो ते आस्थेवाईक असल्यास त्यांना नियतकालिकांची वर्गणी सादर करता येऊ शकते. सर्व काळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा बायबल कथांचं माझं पुस्तक ही पुस्तके सादर करू शकता. जून: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यावर जास्त लक्ष द्या. जुलै: पुढे सुचवलेल्या कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकांचा उपयोग करता येऊ शकतो: देव खरोखरी आपली काळजी करतो का?, भूतलावर जीवनाचा आनंद लुटा!, “पहा! मी सर्व नवे करितो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, द डिव्हाईन नेम दॅट विल एन्ड्योर फॉर एव्हर, नंदनवन आणविणारे सरकार, वॉट हॅपन्स टू अस वेन वी डाय?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, व तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा? जेथे उचित आहे तेथे, सर्व लोकांसाठी एक पुस्तक (इंग्रजी), आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रियली एक्झिस्ट?, आणि विल देअर एवर बी अ वर्ल्ड विदाऊट वॉर? ही माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात.
▪ संस्थेला सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या आणि सचिवांच्या पत्त्यांचा आणि टेलिफोन नंबरचा अद्ययावत अहवाल ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा, यांत काही बदल झाल्यास, सचिवांनी प्रिसायडींग ओव्हरसियर/सेक्रटरी चेन्ज ऑफ ॲड्रेस (S-29) फॉर्म भरून लगेच संस्थेला पाठवावा. एसटीडी कोडमध्ये काही बदल असल्यास तेही फॉर्मवर कळवावे.
▪ मंडळीच्या सचिवांनी नेहमी ॲप्लिकेशन फॉर रेग्युलर पायनियर सर्व्हिस (S-205) आणि ॲप्लिकेशन फॉर ऑक्झिलरी पायनियर सर्व्हिस (S-205b) या दोन्ही फॉर्म्सचा पुरेसा साठा ठेवावा. हे फॉर्म हवे असतील तर लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) भरून ते मागवावेत. मंडळीकडे वर्षभराचा साठा असावा. सर्व फॉर्म पूर्णपणे भरले आहेत हे पाहण्यासाठी सर्व रेग्युलर पायनियर ॲप्लिकेशन फॉर्म्स तपासून पाहावेत. फॉर्म भरलेल्या बंधूला अथवा भगिनीला त्यांच्या बाप्तिस्म्याची तारीख आठवत नसेल तर त्यांनी अंदाजपंची ती लिहावी आणि स्वतःजवळही त्याचा रेकॉर्ड ठेवावा.
▪ तुम्ही सुटीसाठी परदेशी जाता व तेथील सभांना, विभागीय संमेलनाला किंवा प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची योजना केली असेल तर तारखा, वेळ आणि ठिकाणे यांजबद्दल तुम्हाला हवी असलेली माहिती त्या देशांतील कामकाज पाहणाऱ्या शाखा दफ्तराला विचारावी. नवीन इयरबुकच्या शेवटल्या पानावर शाखा दफ्तरांचे पत्ते दिलेले आहेत.
▪ तात्पुरत्या काळासाठी उपलब्ध नसलेल्या प्रकाशनांची मंडळ्यांनी ऑर्डर दिली असल्यास, ती ऑर्डर पॅकींग लिस्टवर पेन्डिंग आयटम म्हणून दाखवण्यात येते. जेव्हा ही प्रकाशने पुन्हा उपलब्ध होतील तेव्हा सर्व पेन्डिंग आयटम आपोआप भरले जातील. त्यामुळे, पेन्डिंग म्हणून प्रकाशने येतात तेव्हा त्यांची पुन्हा ऑर्डर करू नये. याच साहित्याची अर्थात स्पेशल रिक्वेस्ट आयटम्सची पुन्हा गरज भासल्यास, लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म यासोबत (S-14) एक संक्षिप्त टिपणी जोडा. त्यात नमूद करा ही मागणी आधीच ऑर्डर केलेल्या व पेन्डिंग लिस्टवर असलेल्या साहित्याच्या व्यतिरिक्त करण्यात आलेली आहे. असे स्पष्टीकरण नसल्यास ऑर्डर पुढे पाठवल्या जाणार नाहीत.
▪ एकाच राज्य सभागृहाचा वापर करणाऱ्या मंडळ्यांनी आपापल्या मंडळीकडूनच साहित्याचा साठा प्राप्त करावा.
▪ तुमच्या मंडळीने साहित्य किंवा नियतकालिके पाठवण्याच्या पत्त्यात बदल करण्याची विनंती केली असल्यास, बदललेल्या पत्त्यावर साहित्य येईपर्यंत जुन्या पत्त्यावर येत असलेले साहित्य प्राप्त करण्याची खातरी करा. टेलिफोन करून किंवा फॅक्सद्वारे संस्थेला ते कळवले असले तरी असे करणे आवश्यक आहे.
▪ कृपया सूचना मिळेपर्यंत पुढील साहित्याची संस्थेकडे मागणी करू नये: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स बायबलच्या डिलक्स आवृत्त्या, इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांतील बायबल, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांचे खंड आणि व्हिडिओ कॅसेट्स. कृपया मासिकांचे अंक जपून ठेवा आणि वर्षाच्या शेवटी व्यक्तिगत तसेच मंडळीच्या लायब्ररीच्या वापरासाठी त्यांची बांधणी करून घ्यावी. मंडळीच्या लायब्ररीत ठेवलेल्या व्हिडिओ कॅसेट्स केव्हाही वापरता येऊ शकतात. प्रचारकांना विनंती करण्यात येते, की त्यांनी प्रांतीय भाषेतील बायबल स्थानिक दुकानांतून विकत घ्यावेत.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
बायबलच्या मूलभूत शिकवणुकी —पंजाबी