घोषणा
▪ साहित्य सादरता डिसेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन. जानेवारी: माहितीपत्रके: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार व यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत. तसेच, १९२ पानी जुनी पुस्तके देखील सादर केली जाऊ शकतात. फेब्रुवारी: लाईफ हाऊ डिड इट गेट हियर? बाय एवोल्युशन ऑर बाय क्रिएशन?, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!, किंवा मंडळीत १९२ पानी जुन्या पुस्तकांचा स्टॉक असेल तर त्यापैकी कोणतेही पुस्तक देता येऊ शकते. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी खास प्रयत्न केला जाईल.
▪ मंडळ्यांनी त्यांच्या डिसेंबर साहित्य मागणीसोबत २००० सालाचे वॉचटावर आणि अवेक! खंड मागावेत. हे खंड फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील. ते येईपर्यंत आणि पाठवले जाईपर्यंत मंडळीच्या पॅकिंग लिस्टमध्ये ते “पेंडिंग” असे दाखवले जातील. हे खंड खास मागणी साहित्यात मोडतात.
▪ डिसेंबर २२-२४, २००० दरम्यान शिमोगा येथे भरवल्या जाणाऱ्या “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” प्रांतीय अधिवेशनाच्या सभागृहाचा नवीन पत्ता: श्री आदिचंचनागिरी समुदाय भवन, कुवेम्पु मार्ग, शरावथी नगर, शिमोगा ५७७ २०१ कर्नाटक.
▪ सन २००१ स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिका किंग्डम न्यूज क्र. ३६ पत्रिकांसोबत पाठवण्यात आल्या आहेत. स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिकांचा अधिक साठा हव्या असल्यास लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) पाठवून ताबडतोब मागणी करावी. स्मारक विधीच्या आमंत्रण पत्रिका आसामी, इंग्रजी, ओरिया, कन्नड, गुजराती, तामीळ, तेलगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, मराठी, मल्याळम, मिझो आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या क्षेत्रासाठी लागतील त्याच भाषांमध्ये कृपया मागणी करा.
▪ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:
बायबल कथांचं माझं पुस्तक (लहान आकारात) —उर्दू
सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य —उर्दू
द गाईडन्स ऑफ गॉड—आवर वे टू पॅरडाईस —उर्दू
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
इज देअर अ क्रिएटर हू केअर्स अबाऊट यू? —इंग्रजी
सिंग प्रेझेझ टू जेहोवा (लहान गीतपुस्तक) —इंग्रजी
वॉट हॅपन्स टू अस वेन वी डाय? —इंग्रजी
जगावर खरोखर कोण अधिपत्य गाजवतो? (पत्रिका क्र. २२) —उर्दू