ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत सप्टेंबर ४ ते डिसेंबर १८, २००० पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा:
१. अबीशयला दावीदाने, शिमीचा वध करण्यापासून परावृत्त केले कारण शिमीने दावीदावर लावलेले सर्व आरोप खरे होते. (२ शमु. १६:५-१३) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९९ ५/१ पृ. ३२ परि. ३.]
२. शुद्ध, योग्य प्रशिक्षण दिलेल्या विवेकामुळे केवळ देवासोबत प्रेमपूर्ण, व्यक्तिगत नातेसंबंधच निर्माण होत नाही, तर असा हा विवेक आपल्या तारणासाठी देखील आवश्यक आहे. (इब्री. १०:२२; १ पेत्र १:१५, १६) [w ९८ ९/१ पृ. ४ परि. ४]
३. अयोग्य गोष्टी घडताना पाहिल्यावर त्यांबद्दल राग वाटणे बरोबर असले तरीसुद्धा, राग आपल्याला अडखळण्याचे एक कारण ठरण्याचा नेहमी धोका आहे. [w ९९ ८/१५ पृ. ८, ९]
४. येशूच्या हजार वर्षांच्या राजवटीची तुलना आपण शलमोनाच्या ४० वर्षांच्या शांतिमय व समृद्ध कारकीर्दीशी करू शकतो. (१ राजे ४:२४, २५, २९) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९० ६/१ पृ. ६ परि. ५ पाहा.]
५. अबीयाला रीतसर मूठमाती मिळाली यावरून असे कळते की यराबामाच्या घराण्यात तो एकटाच यहोवाचा विश्वासू उपासक होता. (१ राजे १४:१०, १३) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९५ ४/१ पृ. १२ परि. ११.]
६. बाप्तिस्मा घेतल्यावर एक व्यक्ती देवाचा प्रौढ सेवक होते. [w ९८ १०/१ पृ. २८ परि. २]
७. यहोवाने एलियाला अद्भुत शक्ती दिली. त्याला त्याने देवदूतांसारखे धैर्य दिले आणि त्याच्या मनातून भीतीच काढून टाकली. (१ राजे १८:१७, १८, २१, ४०, ४६) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९८ १/१ पृ. ३१ परि. २ पाहा.]
८. मान्ना हे नैसर्गिकरीत्या आढळणारे खाद्य होते. [w ९९ ८/१५ पृ. २५]
९. एलीशा आणि नामानाच्या अहवालावरून आपण, सर्व राष्ट्रांतील प्रामाणिक स्त्री-पुरुषांना स्वीकारण्याची यहोवाची इच्छा पाहू शकतो. यावरून आपली ही खात्री पटते, की आज जगामध्ये सर्रासपणे दिसून येणारी धर्मांमधील वैरभावाची संकोचित मनोवृत्ती यहोवा दाखवत नाही किंवा त्याला ती पसंतही नाही. [साप्ताहिक बायबल वाचन; w ९९ ६/१५ पृ. २३ पाहा.]
१०. दुसरे राजे ११:१२ मध्ये राजाच्या हातात “आज्ञापट” देण्याचा जो उल्लेख आला आहे त्यावरून असे सूचित होते, की राजा देवाच्या नियमशास्त्राचा जो काही अर्थ सांगेल तो खरा अर्थ समजला जाई आणि त्याचे पालन करण्यात येत असे. [साप्ताहिक बायबल वाचन; w ९१ २/१ पृ. ३१ परि. ६ पाहा.]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. योग्य व्यवसाय निवडण्यास आईवडील आपल्या मुलांना मार्गदर्शन देत असतात तेव्हा १ योहान २:१५-१७ च्या अनुषंगाने ते त्यांना कोणत्या गोष्टी टाळण्यास सांगू शकतात? [w ९८ ७/१५ पृ. ५ परि. २]
१२. “तरवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला,” असे २ शमुवेल १८:८ मध्ये म्हटले आहे. त्याचा काय अर्थ होतो? [साप्ताहिक बायबल वाचन; w ८८ ३/१ पृ. ३१ परि. २.]
१३. गल्याथचे नातलग, रेफाईम यांची आज कोणासोबत तुलना करता येते व हे लोक काय करायचा प्रयत्न करत आहेत? (२ शमु. २१:१५-२२) [साप्ताहिक बायबल वाचन; w ८९ ६/१ पृ. २० परि. ८ पाहा.]
१४. साथीदारांचा दबाव म्हणजे काय? [w ९९ ८/१ पृ. २२]
१५. शब्बाथाचे उल्लंघन केल्यामुळे ज्याला ठार मारण्यात आले त्या मनुष्याच्या उदाहरणावरून आपण कोणते महत्त्वपूर्ण तत्त्व शिकू शकतो? (गण. १५:३५) [w ९८ ९/१ पृ. २० परि. २]
१६. ‘शलमोनाचे शहाणपण’ ऐकण्यासाठी लांबचा प्रवास करून आलेल्या शबाच्या राणीचे आपण अनुकरण कसे करू शकतो? (१ राजे १०:१-९) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९९ ७/१ पृ. ३१ परि. १-२ पाहा.]
१७. पहिले राजे १७:३, ४, ७-९, १७-२४ नुसार, एलियाने कोणत्या तीन मार्गांनी यहोवावरील आपला विश्वास प्रदर्शित केला? [साप्ताहिक बायबल वाचन; w ९२ ४/१ पृ. १९ परि. ५ पाहा.]
१८. नाबोथाने अहाबाला आपला द्राक्षमळा विकण्यास नकार दिला त्याचा अर्थ नाबोथ हट्टी होता असा का होत नाही? (१ राजे २१:२, ३) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९७ ८/१ पृ. १३ परि. १८ पाहा.]
१९. दुसरे राजे ६:१६ या वचनाने आज देवाच्या सेवकांना उत्तेजन कसे दिले आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; w ९८ ६/१५ पृ. १८ परि. ५ पाहा.]
२०. खरे ख्रिस्ती सिमनीपासून सावध कसे राहू शकतात? [w ९८ ११/१५ पृ. २८ परि. ५]
शब्द किंवा वाक्यांश घालून पुढील वाक्ये पूर्ण करा:
२१. खऱ्या ख्रिश्चनाने _________________________ हार मानून _________________________ न आवडणाऱ्या प्रथांमध्ये कधीही सहभागी होऊ नये. (नीति. २९:२५; मत्त. १०:२८) [w ९८ ७/१५ पृ. २० परि. ५]
२२. राजा अग्रिप्पाबरोबर बोलताना पौलाने _________________________ वापर केला. त्याने अशा मुद्द्यांवर जोर दिला ज्यांवर त्याचे आणि अग्रिप्पाचे _________________________. (प्रे. कृत्ये २६:२, ३, २६, २७) [w ९८ ९/१ पृ. ३१ परि. ३]
२३. देव _________________________ असल्यामुळे तो व्यक्ती नाही असे काहींना वाटेल पण आपण _________________________ जितका नियमित आणि अधिक करू तितकाच यहोवा देव आपल्याला खरा वाटेल, आपण त्याला जणू पाहत आहोत असे वाटेल. (इब्री. ११:२७) [w ९८ ९/१५ पृ. २१ परि. ३-४]
२४. सीरियाचा सेनापती _________________________ याच्या उदाहरणावरून आपण पाहू शकतो, की थोडीशी _________________________ दाखवल्यावर खूप फायदे प्राप्त होतात. [साप्ताहिक बायबल वाचन; w ९९ २/१ पृ. ३ परि. ६–पृ. ४ परि. १ पाहा.]
२५. यहोनादाबाने राजा येहूला जशी पूर्ण अंतःकरणाने साथ दिली तशीच _________________________ लोक महान येहू _________________________ आणि पृथ्वीवरील त्याचे प्रतिनिधीत्व करणारे _________________________ यांचा अधिकार ओळखतात व त्यांना सहकार्य देतात. (२ राजे १०:१५, १६) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९८ १/१ पृ. १३ परि. ५-६ पाहा.]
पुढील वाक्यांतील बरोबर उत्तर निवडा:
२६. ‘इस्राएलची गणती’ करण्याचे पाप करायला दाविदाला प्रवृत्त करणारा (सैतान; यहोवा; यवाब) होता. (२ शमु. २४:१) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९२ ७/१५ पृ. ५ परि. २ पाहा.]
२७. जेरुसलेममध्ये बांधलेल्या यहोवाच्या मंदिराच्या समर्पण प्रसंगी सर्व लोकांपुढे शलमोनाने केलेल्या प्रार्थनेतून त्याने (नम्रता; बुद्धी; मंदिर पूर्ण केल्याची बढाई) दाखवली. (१ राजे ८:२७) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९९ १/१५ पृ. १७ परि. ७ पाहा.]
२८. शलमोनाने जेरुसलेममध्ये मंदिर आणि त्याचे घर ज्या २० वर्षांच्या दरम्यान बांधले त्या काळाची तुलना वर्ष (१९१९; १९२३; १९३१) मध्ये सुरू होऊन वर्ष (१९३८; १९४२; १९५०) मध्ये समाप्त झालेल्या सैद्धांतिक व संघटनात्मक फेरफारांशी करता येते. (१ राजे ९:१०) [साप्ताहिक बायबल वाचन; w ९२ (इंग्रजी) ३/१ पृ. २० वरील चौकोन पाहा.]
२९. दुसरे राजे २:११ येथे ‘स्वर्ग’ हा जो वाक्यांश वापरला आहे तो (देवाचे आध्यात्मिक वास्तव्य; भौतिक विश्व; पक्षी जेथे विहार करतात आणि जेथे हवा वाहते ते पृथ्वीभोवती असणारे वातावरण) याला सूचित करतो. [साप्ताहिक बायबल वाचन; w ९७ ९/१५ पृ. १५ वरील चौकोन पाहा.]
३०. (महान हेरोद; कैसर औगुस्त; तिबिर्य कैसर) याने नावनिशीच्या बाबतीत काढलेल्या हुकूमामुळे येशूचा जन्म नासरेथमध्ये होण्याऐवजी बेथलेहेम येथे झाला. [w ९८ १२/१५ पृ. ७ चौकोन]
पुढील वचने खाली दिलेल्या वाक्यांशी जुळवा:
स्तोत्र १५:४; इब्री. १०:२४, २५; २ राजे. ३:११; कलस्सै. ३:१३; गलती. ६:१०
३१. सकारात्मक साथीदार प्रभाव हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे ज्यासाठी यहोवा आपल्या लोकांना नियमितरीत्या एकत्र येण्यास सांगतो. [w ९९ ८/१ पृ. २३]
३२. इतरांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या हितकारक, सकारात्मक कार्यामुळे सहानुभूती आणि भरवसा वाढतो व सहजपणे क्रोधात परिणीत होणारे गैरसमज दूर होतात. [w ९९ ८/१५ पृ. ९]
३३. यहोवाच्या दयेबद्दल कृतज्ञता दाखवल्याने एखादी व्यक्ती स्वतःवर ताबा ठेवण्यास आणि चुका विसरण्यास प्रवृत्त होईल. [w ९८ ११/१ पृ. ६ परि. ३]
३४. खास सेवेत असलेल्या यहोवाच्या विश्वासू सेवकांना आदरातिथ्य दाखवणे आणि नम्रपणे त्यांची सेवा करणे हा एक सुहक्कच आहे. [साप्ताहिक बायबल वाचन; w ९७ ११/१ पृ. ३१ परि. १ पाहा.]
३५. यहोवाची भीती बाळगणारा मनुष्य, कर्ज फेडण्याबाबत दिलेला शब्द पाळण्यासाठी त्याच्या परीने प्रयत्न करतो; असे करणे कठीण असले तरीसुद्धा तो दिलेल्या शब्दापासून मागे हटत नाही. [w ९८ ११/१५ पृ. २७ परि. १]