सेवा सभा आराखडा
डिसेंबर ११ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. मंडळीकडे सर्वश्रेष्ठ मनुष्य किंवा थोर शिक्षक ही पुस्तके असल्यास, सुटीदरम्यानच्या सेवाकार्यात त्यांचा चांगला उपयोग कसा करता येईल हे दाखवा. सेवा सभेतील डिसेंबर २५ च्या आठवडी होणाऱ्या चर्चेसाठी सर्वांना द बायबल—ॲक्यूरेट हिस्ट्री, रिलाइअबल प्रॉफसी हा व्हिडिओ पाहायला सांगा. ज्यांच्याकडे हा व्हिडिओ आहे ते, ज्यांच्याकडे नाही त्यांना पाहायला देऊ शकतात किंवा एकत्र मिळून सगळेजण तो पाहू शकतात.
१५ मि: “यहोवाचे भय सतत बाळगा.”a फेब्रुवारी ८, १९९८ सावध राहा! नियतकालिकाच्या पृष्ठ २६ वर देवाचे भय बाळगण्याविषयी दिलेली माहितीसुद्धा सामील करा. यहोवाचे भय बाळगण्याचे फायदे कोणते आहेत हे दाखवून द्या.
२० मि: “समवयस्कांचा दबाव आणि सुवार्ता सांगण्याचा विशेषाधिकार.” भाषण आणि मुलाखती. समवयस्कांचा दबाव असतानाही सुवार्ता सांगण्याच्या कार्यात सक्रिय राहिलेल्या लोकांना आपले अनुभव सांगायला आमंत्रण द्या.
गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर १८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१५ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. डिसेंबर २५ आणि जानेवारी १ साठी केलेल्या खास क्षेत्र सेवा व्यवस्थेविषयी सांगा. पुढील प्रश्नाचे उत्तर द्या: गैर-ख्रिस्ती उगम असलेले सणवार धार्मिक निमित्ताने साजरे केले जात नसले तर त्यांच्यामध्ये सहभाग घ्यायला काही हरकत आहे का?—पाहा रिझनिंग पुस्तक, पृष्ठे १७८-८०.
१२ मि: “सन २००१ करता ईश्वरशासित सेवा प्रशाला.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. आपले साप्ताहिक बायबल वाचन करीत राहावे आणि प्रशालेत मिळणाऱ्या नेमणुका प्रामाणिकपणे पार पाडाव्यात म्हणून सर्वांना उत्तेजन द्या.
१८ मि: “तुम्ही धैर्याने सुवार्तेची घोषणा करता का?”b या लेखामधील शास्त्रवचनांबद्दल श्रोत्यांना आपले विचार मांडायला सांगा. आपली सेवा, पृष्ठ ८६ च्या आधारे आपण अधिक धैर्यवान कसे होऊ शकतो आणि क्षेत्र सेवेत अधिक प्रभावशाली कसे ठरू शकतो ते दाखवा.
गीत क्र. १३ (१२४) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ३ (३२)
१० मि: स्थानीय घोषणा. श्रोतेगणांपैकी एखाद्याला साक्षकार्यात अलीकडे आलेला अनुभव सांगण्यास आमंत्रण द्या. जानेवारीच्या साहित्य सादरतेची उजळणी करा.
१० मि: “नवीन विभागीय संमेलनाचा कार्यक्रम.” प्रश्नोत्तरे. येत्या विभागीय संमेलनाची तारीख सांगा आणि सर्वांना दोन्ही दिवशी उपस्थित राहायला उत्तेजन द्या. बायबल विद्यार्थ्यांना आमंत्रण देण्यासाठी खास प्रयत्न करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. कदाचित संमेलनाला उपस्थित राहिल्याने त्यांना मंडळीसोबत नियमितपणे सहवास ठेवावासा वाटेल.
२५ मि: “द बायबल—ॲक्यूरेट हिस्ट्री, रिलाइअबल प्रॉफसी या व्हिडिओतून शिकणे.” श्रोत्यांशी चर्चा. या व्हिडिओद्वारे इतरांना कसे प्रेरित केले जाऊ शकते त्याविषयी काही सल्ले द्या. (१९९९ इयरबुक, पृष्ठे ५१-२) या मालिकेतील दुसरा व्हिडिओ, द बायबल—मॅनकाईन्ड्स ओलडेस्ट मॉडर्न बुक याची उजळणी फेब्रुवारीत केली जाईल.
गीत क्र. २६ (२१२) व समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
१० मि: स्थानीय घोषणा. नवीन वर्षासाठी तुमच्या मंडळीच्या सभांची वेळ बदलणार असल्यास नवीन वेळेप्रमाणे सभांना नियमितपणे उपस्थित राहायला प्रत्येकाला उत्तेजन द्या. वेळेत काही बदल झाले असल्यास, बायबल विद्यार्थ्यांना आणि इतर आस्थेवाईक लोकांना कळवा आणि नवीन वेळ दाखवणाऱ्या हस्तपत्रिकांचा उपयोग करा. देशाच्या आणि स्थानीय मंडळीच्या ऑगस्ट सेवा अहवालाविषयी टिपणी करा. डिसेंबरचा क्षेत्र सेवा अहवाल देण्यासाठी प्रचारकांना आठवण करून द्या.
१० मि: “नवीन खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम.” भाषण. पुढील खास संमेलन दिवसाची तारीख कळवण्यात आली असल्यास ती सांगा आणि संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला सर्वांना उत्तेजन द्या. नवीन आस्थेवाईक लोकांना आणि बायबल विद्यार्थ्यांना आमंत्रण द्यायला प्रचारकांना प्रोत्साहन द्या.
२५ मि: पुनर्भेटींसाठी कशी तयारी करावी. एक पिता आपल्या कुटुंबासोबत सेवाकार्यात अधिक प्रभावशाली होण्याविषयी चर्चा करतात. आस्थेवाईक लोक भेटतात तेव्हा त्यांना पुनर्भेट देणे आवश्यक आहे यासंबंधी ते शास्त्रवचनातून कारणे दाखवतात. जुलै १, १९९९, टेहळणी बुरूज, पृष्ठ २२, परिच्छेद १८ मध्ये दिलेल्या सूचनांचा उपयोग करून ते सगळेजण पुनर्भेटी देण्यासाठी तयारी करतात. कुटुंबातील सगळेजण मान्य करतात की, ते अशा लोकांना भेटले ज्यांना पुनर्भेट देण्याची गरज आहे. मग प्रत्येकजण पहिल्या भेटीत काय अनुभव आला ते सांगतो. आणि बाकीचे, पुनर्भेटीसाठी उपयोगी पडणारा एखादा विचार किंवा एखादे शास्त्रवचन सुचवतात. ते अपेक्षा माहितीपत्रकातून काही मुद्दे काढतात ज्यांचा प्रभावकारी पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर पालक त्यांच्या एका मुलाला पुनर्भेटीच्या वेळी कसे बोलणार त्याचा सराव करायला सांगतात. मग, पुढील आठवडी पुनर्भेटी नेमक्या केव्हा द्यायच्या ते ठरवले जाते.
गीत क्र. १८ (१६२) व समाप्तीची प्रार्थना.
[तळटीप]
a प्रस्तावना एक मिनिटाच्या आत संपवून प्रश्नोत्तरांनी चर्चा करावी.
b प्रस्तावना एक मिनिटाच्या आत संपवून प्रश्नोत्तरांनी चर्चा करावी.