घोषणा
▪ साहित्य सादरता नोव्हेंबर: किंगडम न्यूज क्र. ३६ चे वितरण. ज्या मंडळ्यांचे आपल्या क्षेत्रातील सर्व घरांमध्ये किंगडम न्यूज देऊन झाले आहे त्या अपेक्षा माहितीपत्रक किंवा ज्ञान पुस्तक देऊ शकतात. लोकांकडे आधीपासूनच ही प्रकाशने असल्यास अनंतकाल जगा किंवा क्रिएशन पुस्तक देऊ शकता. डिसेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन. जानेवारी: माहितीपत्रके: विसाव्या शतकातील यहोवाचे साक्षीदार व यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत. तसेच, १९२ पानी जुनी पुस्तके देखील सादर केली जाऊ शकतात. फेब्रुवारी: लाईफ हाऊ डिड इट गेट हियर? बाय एवोल्युशन ऑर बाय क्रिएशन?, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!, किंवा मंडळीत १९२ पानी जुन्या पुस्तकांचा स्टॉक असेल तर त्यापैकी कोणतेही पुस्तक देता येऊ शकते.
▪ किंगडम न्यूज क्र. ३६ विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे. ज्या मंडळ्यांना याच्या जादा प्रती हव्या आहेत त्यांनी आपली ऑर्डर लवकरात लवकर पाठवावी. किंगडम न्यूज क्र. ३६ ची वितरण मोहीम संपल्यानंतरही ज्या मंडळ्यांकडे त्यांचा स्टॉक बाकी असेल त्या मंडळ्या त्यांच्या प्रचारकांना इतर ट्रॅक्ट दिले जातात त्याचप्रमाणे (घरोघरच्या कार्यात आणि इतरत्र) हेही ट्रॅक्ट देण्याचे उत्तेजन देऊ शकतात. योग्य असल्यास, ज्या घराला कुलूप असेल त्या घरात या ट्रॅक्टची एक प्रत दाराच्या फटीतून आत सरकवली जाऊ शकते. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत येणार नाही याची दक्षता घ्यावी. उरलेल्या सर्व ट्रॅक्टचे वितरण करण्यासाठी खास प्रयत्न करा. कारण त्यातील संदेश खूप महत्त्वाचा आहे.
▪ मंडळीच्या प्रिसायडिंग ओव्हरसियरने किंवा त्याने नेमलेल्या एखाद्या बांधवाने डिसेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
वॉट हॅपन्स टू अस व्हेन वी डाय? —उर्दू
▪ उपलब्ध असलेली नवीन व्हिडिओ कॅसेट:
यंग पिपल आस्क—हाऊ कॅन आय मेक रियल फ्रेन्ड्स? —इंग्रजी
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव —कन्नड, तामीळ व तेलगू
▪ उपलब्ध असलेल्या ऑडियो कॅसेट:
संगीत-ऑर्केस्ट्रा: किंग्डम मेलडीज, क्रमांक १ ते ८ (आठ कॅसेट)
(वरील ऑडियोकॅसेटचे ॲल्बम उपलब्ध नाहीत)