वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०० पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • अक्रियाशील झालेल्यांना विसरू नका
    आमची राज्य सेवा—२००७
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९८
  • “माझ्याकडे परत या”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • लवकरात लवकर परतण्यास त्यांना साहाय्य करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ११/०० पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ दीर्घकाळापासून निष्क्रिय असलेल्या व्यक्‍तीला पुन्हा एकदा सुवार्तेचा प्रचारक होण्यास मदत कशी दिली जाऊ शकते?

एखादी निष्क्रिय व्यक्‍ती यहोवाची सेवा पुन्हा करण्याची इच्छा व्यक्‍त करते, ही आनंदाची गोष्ट आहे. (लूक १५:४-६) विरोध किंवा जीवनांतील दबाव यांमुळे कदाचित त्या व्यक्‍तीने व्यक्‍तिगत अभ्यास करण्याचे, सभांना आणि क्षेत्र सेवेला जाण्याचे हळूहळू सोडून दिले असेल. मग अशा व्यक्‍तीला पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रगती करायला आपण साहाय्य कसे देऊ शकू?

आपल्यापैकी सर्वांनी या निष्क्रिय व्यक्‍तीला हा दिलासा द्यायचा प्रयत्न केला पाहिजे की, तिच्या येण्याने आपल्याला खरोखरच आनंद झाला आहे. मंडळीतील वडील जनांनी लवकरात लवकर अशा व्यक्‍तीच्या विशिष्ट आध्यात्मिक गरजा ओळखण्याचा प्रयत्न करावा. (याको. ५:१४, १५) ही व्यक्‍ती दीर्घकाळापासून निष्क्रिय असल्यास, वडील जन या व्यक्‍तीला क्षेत्र सेवेत पुन्हा सक्रिय करण्यास मदत द्यायला एखाद्या अनुभवी प्रचारकाला नेमतील. पण समजा ही व्यक्‍ती सभांनाच खूप दिवस उपस्थित राहिलेली नाही तर कदाचित तिला आणखी साहाय्याची गरज भासेल. तिचा विश्‍वास, तिच्यामध्ये कृतज्ञतेची भावना वाढवण्याकरता तिला एखाद्या उचित प्रकाशनाचा व्यक्‍तिगत बायबल अभ्यास करायला सुचवले जाईल. अशा वेळी, सर्व्हिस ओव्हरसियर एखाद्या अनुभवी प्रचारकाला हा अभ्यास घ्यायला सांगतील. (इब्री. ५:१२-१४; पाहा आमची राज्य सेवा नोव्हेंबर १९९८ प्रश्‍न पेटी.) अशी मदत हवी असणारी कोणी व्यक्‍ती तुमच्या माहितीत असेल तर तुमच्या मंडळीतील सर्व्हिस ओव्हरसियरशी बोला.

दीर्घकाळापासून निष्क्रिय असलेल्या व्यक्‍तीला क्षेत्र सेवेत येण्यास सांगण्याआधी, दोन वडिलांनी त्या व्यक्‍तीची भेट घ्यावी आणि पाहावे की ती व्यक्‍ती क्षेत्र सेवेत जाण्यास पात्र आहे की नाही. एका नवीन व्यक्‍तीला सुवार्तेचा प्रचारक व्हायचे असते तेव्हा वडील जन तिच्याशी जी चर्चा करतात तीच पद्धत या व्यक्‍तीच्या बाबतीतही लागू होते. (टेहळणी बुरूज ऑगस्ट १, १९८८ पृष्ठ २० पाहा.) निष्क्रिय व्यक्‍तीला सुवार्तेची घोषणा करण्याची उत्कट इच्छा असली पाहिजे. आपली सेवा पुस्तकाच्या पृष्ठे ९८-९ वर दिलेल्या मुख्य अपेक्षाही त्याने पूर्ण केल्या पाहिजे.

चांगला आध्यात्मिक परिपाठ, सत्यात पुन्हा एकदा सक्रिय होऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीला यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध आणखी बळकट करण्यास, तो टिकवण्यास व सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालत राहण्यास मदत करील. (मत्त. ७:१४; इब्री. १०:२३-२५) “होईल तितका प्रयत्न” केल्याने व सहनशीलता उत्पन्‍न करणारे ख्रिस्ती गुण विकसित केल्याने ती व्यक्‍ती ख्रिस्ती शिष्य म्हणून पुन्हा “निष्क्रिय व निष्फळ” होणार नाही.—२ पेत्र १:५-८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा