शिक्षण, प्रेरणा, बल देणारी साधने
१ बायबल आणि यहोवाच्या साक्षीदारांबद्दलची माहिती देणारी ही प्रभावशाली साधने आहेत. यांमुळे अनेकांना सत्य स्वीकारण्याचा निर्णय घेण्याची प्रेरणा झाली आहे. शिवाय देवाच्या समर्पित लोकांचा विश्वास आणि समज देखील यांमुळे मजबूत झाली आहे. ही साधने कोणती? यहोवाच्या संस्थेने बनवलेले व्हिडिओ! तुम्ही संस्थेचे दाहीच्या दाही व्हिडिओ पाहिले आहेत का? अलीकडे पाहिले आहेत का? क्षेत्र सेवेत तुम्ही त्यांचा उपयोग करता का? या अद्भुत साधनांचा तुम्हाला जास्तीतजास्त फायदा कसा मिळवता येईल?
२ जुलै १, १९९९ च्या टेहळणी बुरूज अंकातील, “कुटुंब मिळून देवाच्या वचनाचा अभ्यास नियमितपणे करा” या लेखात अशी सूचना होती, की “संस्थेने प्रकाशित केलेला एखादा व्हिडिओ पाहण्यासाठी . . . तुम्ही काही वेळ बाजूला काढू शकता आणि मग पाहिलेल्या . . . गोष्टींवर नंतर चर्चा करू शकता.” या उत्तम सल्ल्याच्या अनुषंगाने, एकेक महिन्याआड सेवा सभेत वेगवेगळ्या व्हिडिओंची चर्चा केली जाईल. त्यामुळे आम्ही मंडळीतील सर्वांना असे उत्तेजन देतो, की सर्वांनी तो व्हिडिओ आधी घरी पाहून यावा कारण त्यावर सेवा सभेत चर्चा केली जाईल.
३ या महिन्यात आपण संस्थेने प्रकाशित केलेल्या सर्वात पहिल्या, म्हणजे जेहोवाज विटनेसस—दी ऑर्गनायझेशन बिहाइन्ड द नेम या व्हिडिओची चर्चा करणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ घरी पाहा आणि त्यावर आधारित पुढील प्रश्नांची तयारी करून या:
▪ यहोवाचे साक्षीदार कशासाठी सर्वात जास्त नावाजलेले आहेत?
▪ बेथेलमध्ये केले जाणारे प्रत्येक काम कोणत्या शास्त्रवचनाशी निगडीत आहे?
▪ प्रकाशनांमध्ये छापल्या जाण्याकरता कोणत्या दृश्याचे चित्रिकरण होत असताना तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिले?
▪ आपले साहित्य तयार केल्या जाण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत कोणता भाग पाहून तुम्ही सर्वात जास्त प्रभावित झाला?
▪ सन १९२० पासून १९९० पर्यंत, संस्थेने किती साहित्य तयार केले?
▪ देवाच्या लोकांपैकी बेथेल सेवेचे ध्येय खास करून कोणी ठेवले पाहिजे?—नीति. २०:२९.
▪ बेथेल परिवार सर्व यहोवाच्या साक्षीदारांसाठी कोणकोणत्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडतो?
▪ होता होईल तितक्या लोकांपर्यंत सुवार्ता पोहंचावी म्हणून बेथेलमध्ये केल्या जाणाऱ्या कामाविषयी तुमचे काय मत आहे?
▪ संस्थेच्या जगव्याप्त कार्यासाठी पैसा कोठून येतो?
▪ आपण कोणत्या कार्यात आवेशाने भाग घेऊन त्याला सहकार्य देऊ शकतो व याविषयी आपली कशी मनोवृत्ती असली पाहिजे?—योहान ४:३५; प्रे.कृत्ये १:८.
▪ “यहोवाचे साक्षीदार” या आपल्या नावामागील संस्थेबद्दल तुम्हाला काय वाटते?
▪ तुम्ही या व्हिडिओचा क्षेत्र सेवेत उपयोग कसा करू शकता?
डिसेंबर महिन्यात आपण द बायबल—ॲक्यूरेट हिस्ट्री, रिलायबल फ्रॉफसी या व्हिडिओची चर्चा करणार आहोत.