वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०० पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०००
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर ९ ने सुरू होणार सप्ताह
  • ऑक्टोबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
  • नोव्हेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०००
km १०/०० पृ. २

सेवा सभा आराखडा

ऑक्टोबर ९ ने सुरू होणार सप्ताह

गीत ९ (३७)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१५ मि: “मी नवीन ठिकाणी स्थलांतर करावे का?” वडिलांचे भाषण. दुसऱ्‍या ठिकाणी राहायला जाण्याचा विचार करण्यात समजुतदारपणा का दाखवला पाहिजे त्याचे स्पष्टीकरण द्या. नीतिसूत्रे २२:३ मधील सल्ल्याचे अनुकरण कसे करता येईल त्याची चर्चा करा. टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑगस्ट १५, १९८८ पृष्ठे २२ वरील सूचनांची उजळणी करा.

२० मि: सभांची चांगली तयारी करा. भाषण आणि चर्चा. आपण सभांची जितकी चांगली तयारी करू तितकाच आपल्याला सभांतून फायदा मिळवता येईल. टेहळणी बुरूज मार्च १, १९९८ पृष्ठे १५-१६, परि. ८-११ मधील व्यावहारिक सूचनांची उजळणी करा. श्रोत्यांना विचारा की सभांची चांगल्याप्रकारे तयारी करण्याकरता ते कशी मेहनत घेतात, वेळ कसा काढतात.

गीत २२ (१३०) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६ (१४३)

५ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

२० मि: “सुवार्तेविषयी आवड निर्माण करण्यासाठी चालू घटनांचा उल्लेख करा.” श्रोत्यांबरोबर चर्चा आणि प्रदर्शने. स्थानीय लोकांमध्ये आवड निर्माण करणाऱ्‍या अनेक चालू घटनांचा उल्लेख करा. या घटनांमुळे लोकांना भवितव्याबद्दल कोणती चिंता लागली आहे? रिझनींग पुस्तकाच्या पृष्ठ १०-११ वरील काही सुचनांचा उपयोग करून अशी एक सादरता तयार करा ज्याद्वारे बायबलवर आधारित चर्चा सुरू करता येईल. पूर्वतयारी केलेली दोन व्यावहारिक प्रात्यक्षिके दाखवा.

२० मि: आपण सर्व पायनियर आत्मा दाखवू शकतो. टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९९७ पृष्ठे २२-३ वर आधारित पुस्तक अभ्यास संचालक आणि त्यांचे सहाय्यक यांची चर्चा. मंडळीमध्ये पुष्कळ पायनियर असणे का फायद्याचे आहे, आणि मंडळीतले सर्वजण या दिशेने कसा हातभार लावू शकतात यावर विचार करा. पायनियरींग करत असलेल्यांना उत्तेजन देण्याचे कोणकोणते मार्ग आहेत व मंडळीतील सर्व जण सेवेबद्दल आवेश कसा दाखवू शकतात यावरही चर्चा करा.

गीत १२ (११३) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २० (९३)

५ मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “शिक्षण, प्रेरणा, बल देणारी साधने.” (फक्‍त १ आणि २ परिच्छेद.) भाषण. संस्थेने व्हिडिओ बनवायला कशी व का सुरवात केली याबद्दल संक्षिप्त माहिती सांगा. (प्रोक्लेमर्स पुस्तक, पृष्ठे ६००-६०१ पाहा.) ऑक्टोबर ३० च्या आठवड्यासाठी असलेल्या सेवा सभेत, जेहोवाज विटनेसस—दी ऑर्गनायझेशन बिहाईन्ड द नेम या व्हिडिओची चर्चा केली जाणार असल्यामुळे सर्वांना तो व्हिडिओ आधी पाहून यायचे उत्तेजन द्या. ज्यांच्याकडे ती व्हिडिओ कॅसेट आहे, त्यांच्याकडून इतर बांधव ती घेऊन पाहू शकतात किंवा मग एकत्र मिळून पाहू शकतात.

२५ मि: “नव्या युगात तुमचे काय भविष्य असेल?” सर्व्हिस ओव्हरसियरने या भागाची उत्साहीपणे चर्चा करावी. वडिलांना पाठवलेल्या जुलै ३, २००० या तारखेच्या संस्थेच्या पत्रातील घोषणा वाचून दाखवल्यावर उपस्थित असलेल्या सर्वांना ट्रॅक्टची एक प्रत द्या. मग आमची राज्य सेवा यातील लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा करा. क्षेत्रातील सर्व लोकांना ट्रॅक्ट वितरीत करण्यासाठी मंडळीने केलेल्या योजनेविषयी सांगा. नवीन लोकांना आणि मुलांना बाप्तिस्मारहित प्रचारक होण्यास मदत कशी करता येईल यावर चर्चा करा. एक संक्षिप्त प्रात्यकक्षिक दाखवा. मंडळीतील सर्व लहानथोरांना या मोहिमेत आवेशाने भाग घेण्यास आर्जवा.

गीत ८ (५३) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत २६ (२१२)

८ मि: स्थानीय घोषणा. सर्वांना ऑक्टोबर महिन्याचा रिपोर्ट देण्याची आठवण करा. ट्रॅक्टच्या मोहिमेदरम्यान शनिवारी-रविवारी ट्रॅक्टबरोबर टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके देण्यास मंडळीतील सर्वांना उत्तेजन द्या.

१२ मि: गायन—आपल्या उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग. एक पुस्तक अभ्यास संचालक, दोन प्रचारकांबरोबर राज्य गीत गाण्याविषयी बोलतात. हे दोन प्रचारक राज्य गीत इतक्या उत्साहाने गात नसल्याचे पुस्तक अभ्यास संचालकांच्या ध्यानात येते. टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, १९९७ पृष्ठे २७-८ वरील काही मुद्द्‌यांची ते त्यांच्याबरोबर चर्चा करतात. येणाऱ्‍या रविवारच्या टेहळणी बुरूज अभ्यासाच्या वेळी गायल्या जाणाऱ्‍या राज्य गीताच्या एक दोन ओळींचा टेहळणी बुरूज जुलै १, १९९९ पृष्ठ २०, परि. १२ मध्ये सुचवल्यानुसार ते चर्चा करतात. राज्य गीतांचे महत्त्व ओळखल्यामुळे आपण अगदी आवेशाने यहोवाची स्तुती करतो.

२५ मि: जेहोवाज विटनेसस—दी ऑर्गनायझेशन बिहाईन्ड द नेम. श्रोत्यांबरोबर चर्चा. “शिक्षण, प्रेरणा, बल देणारी साधने” या लेखातील परिच्छेद ३ मधील प्रश्‍नांची चर्चा करावी. आस्थेवाईक लोकांना संस्थेशी चांगल्याप्रकारे परिचित करण्यासाठी या व्हिडिओचा उपयोग कसा करता येईल त्याबद्दल सूचना द्या. एक दोन प्रात्यक्षिके दाखवा.—टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑक्टोबर १, १९९२ पृष्ठे ३०-१ पाहा.

गीत ७ (५१) व समाप्तीची प्रार्थना.

नोव्हेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ६ (४५)

५ मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: तुमचा काय विश्‍वास आहे? “कोण कोणत्या शिकवणुकींमुळे यहोवाचे साक्षीदार इतर धर्मांपासून वेगळे आहेत?” असा प्रश्‍न विचारलेल्या व्यक्‍तिला एक बांधव पुन्हा जाऊन भेटतो. टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९९८ पृष्ठ ६ वरील चौकोनातील मुद्द्‌यांची चर्चा करा. इतर धर्म, ही मूलभूत बायबल सत्ये नाकारून मानवाने बनवलेल्या शिकवणुकी कसे पाळतात ते सांगा.

१५ मि: स्थानीय गरजा.

१० मि: संभाषणांची सुरवात केल्याचे अनुभव. ऑक्टोबर १६ च्या सेवा सभा कार्यक्रमात असे सुचवण्यात आले होते, की आपण लोकांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी व त्यांच्याबरोबर संभाषण सुरू करण्यासाठी चालू घटनांचा उल्लेख करून सादरता तयार करू शकतो. या सुचना लागू केल्याने ज्यांना चांगले अनुभव आले आहेत अशा प्रचारकांना अनुभव सांगण्यास आमंत्रण द्या.

गीत २८ (२२४) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा