वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०० पृ. ८
  • “नव्या युगात—तुमचे भविष्य कसे असेल?”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “नव्या युगात—तुमचे भविष्य कसे असेल?”
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य वार्ता क्र. ३५ चे विस्तारित वितरण करा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • ऑक्टोबर १६ ते नोव्हेंबर १२ पर्यंत एक खास मोहीम!
    आमची राज्य सेवा—२००६
  • प्रभुच्या कामात अधिकाधिक करण्याजोगे आहे
    आमची राज्य सेवा—१९९५
  • एप्रिल दरम्यान “चांगल्या कामांत तत्पर” असा!
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km १०/०० पृ. ८

“नव्या युगात—तुमचे भविष्य कसे असेल?”

 १ पृथ्वीवरील सर्व लोकांच्या मनात हा प्रश्‍न घोंघावत आहे. मागील शतकांमध्ये मानवाने बरेच काही साध्य केले असले तरीसुद्धा अशा काही मूलभूत समस्या आहेत ज्यांच्यापासून तो स्वतःला अद्यापही वाचवू शकलेला नाही. (ईयो. १४:१; स्तोत्र ९०:१०) मग या समस्यांतून मानवाला सुटका कशी मिळू शकेल?

 २ या प्रश्‍नाचे उत्तर देण्याची उत्तम संधी आपल्या सर्वांना नोव्हेंबर महिन्यादरम्यान मिळणार आहे. ती कशी? किंग्डम न्यूझ क्र. ३६ या ट्रॅक्टचे वितरण करण्याद्वारे. “नव्या युगात तुमचे भविष्य कसे असेल?” हे या ट्रॅक्टचे शीर्षक आहे. नोव्हेंबर १, बुधवारपासून आपण या ट्रॅक्टचे वितरण करायला सुरू करणार आहोत. या मोहिमेदरम्यान, आपण आठवड्यांतील इतर दिवशी या ट्रॅक्टचे वितरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी आपण नियतकालिकांबरोबर हे ट्रॅक्ट देणार आहोत.

 ३ तुम्हीही यात पूर्ण सहभाग घ्याल का? मंडळीतील वडिलांनी, सेवा सेवकांनी आणि पायनियरांनी या मोहिमेदरम्यान विशेष पुढाकार घ्यावा. पुष्कळ प्रचारकांनी नोव्हेंबर महिन्यात सहाय्यक पायनियरींग करण्याकरता आपापल्या वैयक्‍तिक जबाबदाऱ्‍यांचे नियोजन केले आहे. इतरांनी त्या महिन्यादरम्यान सेवेत नेहमीपेक्षा जास्त सहभाग घेण्याचे ध्येय ठेवले आहे.

 ४ मंडळीचे पुस्तक अभ्यास संचालक आपल्या गटांतील सर्वांना या मोहिमेत पूर्ण सहभाग घेण्याचे उत्तेजन देऊ शकतात. मंडळीत कदाचित असे काही प्रचारक असतील जे प्रचार कार्याला जात नसतील. अशा लोकांना कोणती मदत देता येईल हे जाणून घेण्याकरता वडील जन त्यांना भेट देऊ शकतात. कदाचित ते अनुभवी प्रचारकांना प्रत्येक निष्क्रिय व्यक्‍तिबरोबर त्या महिन्यात सेवेला जाण्याची व्यवस्था करू शकतात. एका साध्यासोप्या सादरतेमुळे कदाचित या निष्क्रिय व्यक्‍तीचा उत्साह वाढू शकतो.

 ५ ज्यांचा ज्ञान पुस्तकाचा अभ्यास जवळजवळ संपत आला आहे व क्षेत्र सेवेत जाण्यास जे पात्र आहेत, अशा बायबल विद्यार्थ्यांसाठी देखील या महिन्यात सुरवात करण्याची एक उत्तम संधी आहे. शिवाय, मंडळीतील चिमुरड्यांनासुद्धा या कार्यात भाग घ्यायला आवडेल.

 ६ साधीसोपी सादरता देखील परिणामकारक ठरू शकते: तुम्ही म्हणू शकता:

▪ “मी आपल्या या [शहराचे किंवा गावाचे नाव सांगा] मधील प्रत्येक कुटुंबाला स्वेच्छेने हा महत्त्वपूर्ण संदेश देण्याकरता आलो आहे. आम्ही सर्वांना हे ट्रॅक्ट देत आहोत. कृपया हे वाचा.” ट्रॅक्टचे वितरण करायला जाताना तुम्ही तुमची नेहमीची प्रिचिंगची बॅग न नेलेली बरी.

 ७ क्षेत्र सेवेच्या सुनियोजित सभा: मंडळीतील वडिलांनी, क्षेत्र सेवेच्या सर्व योजना सर्वांसाठी सोयीस्कर व व्यावहारिक अशाच कराव्यात. सर्वांना घरोघरच्या व बिझनेस क्षेत्रात सेवाकार्य करता यावे म्हणून पुरेसे क्षेत्र आहे की नाही याची सर्व्हिस ओव्हरसियरने खासकरून खात्री करावी. शक्य असल्यास, दर दिवशी, शनिवारी-रविवारी आणि संध्याकाळच्या सेवेसाठी क्षेत्र सेवेसाठी सभा ठेवाव्यात. शाळेतील मुलांना, शिफ्ट ड्यूटी असलेल्यांना व इतरांनाही क्षेत्र सेवेत भाग घेता यावा म्हणून दुपारी उशिरा किंवा संध्याकाळी क्षेत्र सेवेचे आयोजन करता येण्यासारखे आहे.

 ८ घरात नसलेल्या लोकांना कसे भेटता येईल: होता होईल तितक्या लोकांशी बोलायचे आपले ध्येय आहे. क्षेत्र सेवा करताना तुम्हाला एखाद्या घराला कुलूप दिसल्यास, तुम्ही त्या घराचा पत्ता लिहून घेऊ शकता आणि मग कुठल्यातरी दुसऱ्‍या वेळी जाऊ शकता. या मोहिमेच्या अगदी शेवटल्या आठवड्यापर्यंतही तुम्ही, तेथे राहणाऱ्‍यांना भेटू शकला नाहीत तर ट्रॅक्टची एक प्रत दाराच्या फटीतून आत सरकवू शकता. येणाऱ्‍या जाणाऱ्‍यांना ट्रॅक्ट दिसणार नाही याची काळजी घ्यावी. पण लांबच्या क्षेत्रांमध्ये आणि मोहिमेदरम्यान पूर्ण करता येणार नाही अशा मोठ्या क्षेत्रांमध्ये गेल्यावर, जी घरे बंद असतात, अशा घरांमध्ये पहिल्या भेटीतच ट्रॅक्ट दाराच्या फटीतून आत सरकवण्याचा स्थानीय वडील मंडळीतील सर्वांना सल्ला देऊ शकतात.

 ९ कामाला लागू या! सर्व मंडळ्यांनी, मोहीम संपण्याआधी त्यांच्या क्षेत्रातील सर्वांना ट्रॅक्ट देण्याचा प्रयत्न करावा. तुमचे क्षेत्र खूपच मोठे असल्यास आणि जर हे सुरक्षित व व्यावहारिक असेल तर काही प्रचारक एकएकटे कार्य करू शकतात. यामुळे होता होईल तितक्या आस्थेवाईक लोकांपर्यंत पोहंचणे शक्य होईल. भेटलेल्या सर्व आस्थेवाईक लोकांचे पत्ते सांभाळून ठेवण्यास विसरू नका.

 १० मंडळीला ज्यादा नियतकालिके किती लागतील याचा वडिलांनी आधीच विचार करून मग त्यानुसार ऑर्डर करावी. ट्रॅक्टची ऑर्डर पाठवण्याची गरज नाही कारण प्रत्येक मंडळीला एक ठराविक कोटा पाठवण्यात येत आहे. खास, सामान्य व साहाय्यक पायनियरांना प्रत्येकी ३०० प्रती तर, प्रत्येक प्रचारकाला १०० प्रती मिळतील. तेव्हा, या खास कार्यात सहभाग घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? नजीकच्या भविष्याबद्दल देवाने काय अभिवचन दिले आहे त्याविषयी आपल्या शेजाऱ्‍यांना सांगणे हा एक सुहक्कच नव्हे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा