यहोवाच्या महत्कृत्यांकडे काळजीपूर्वक लक्ष द्या
१ “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या प्रांतीय अधिवेशनाला आपण सर्वजण उपस्थित राहिलो. हे तीन दिवस खरोखरच अतिशय उत्तम होते असे आपण म्हणू शकतो. या तिन्ही दिवशी आपण आपल्या दररोजच्या चिंता घरीच ठेवून यहोवाच्या महत्कृत्यांवर आपले लक्ष एकाग्र केले. देव आणि त्याचे वचन अर्थात बायबलवरील आपला विश्वास वाढवण्यासाठी, यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध आणखी पक्का करण्यासाठी आणि सेवेबद्दल आपला आवेश आणखी तीव्र करण्यासाठी या कार्यक्रमाची योजना करण्यात आली होती. शिकलेल्या गोष्टींतून आपण कोणता लाभ प्राप्त करत आहोत?—योहा. १३:१७.
२ कुटुंबे देवाच्या वचनाचे पालन करतात: “देवाच्या वचनाच्या आज्ञेत राहा” या परिसंवादाने आपल्याला, आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक स्थितीचे परीक्षण करण्यास मदत केली. सहसा मुलांना नवीन गोष्टी शिकायला आवडतात. म्हणून, कौटुंबिक बायबल अभ्यासाच्या पायावर आध्यात्मिकरीत्या मजबूत घराणे बांधण्याचे उत्तेजन सर्व ईश्वरीय पालकांना देण्यात आले. यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला यहोवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध जोडण्यास मदत होईल. आपल्या वागणुकीचा, विचारांचा यहोवाच्या भावनांवर कसा परिणाम होईल याच्याबद्दल विचार करण्यास आपल्या मुलांस शिकवा. यहोवाबद्दल आणि आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला प्रेम आहे हे तुम्ही तुमच्या कार्यातून स्पष्टपणे दाखवा. (स्तोत्र १०३:२) आध्यात्मिक ध्येये ठेवण्याचा व ती साध्य करण्याचा एकत्र मिळून प्रयत्न करा आणि यहोवाच्या सेवेत पूर्णपणे व्यस्त राहा.
३ यहोवाचे वचन आपल्या मार्गांवर प्रकाश पाडते: यशयाची भविष्यवाणी—सर्व मानवजातीकरीता प्रकाश १ (इंग्रजी), हे नवीन पुस्तक मिळाल्यामुळे आपण सर्वजण आनंदी आहोत. या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे तुमचे वाचन कोठवर झाले आहे? अभक्त राष्ट्रांवर भयंकर न्यायदंड येणार आहे व देवाच्या लोकांना राज्याचे अद्भुत आशीर्वाद मिळणार आहेत हे यशयाच्या पुस्तकात भाकीत केले आहे. (यश. ३४:२; ३५:१०) या पुस्तकामुळे, यहोवा आणि कार्य करण्याची त्याची पद्धत यावरील आपल्या विश्वासामुळे आपला भरवसा आणखी वाढतो.—यश. १२:२-५.
४ यशयाच्या भोवती इतकी दुष्टता असूनही तो यहोवाशी कसा एकनिष्ठ राहिला हे यशयाची भविष्यवाणी १, या पुस्तकाचे वाचन करताना सुरवातीलाच तुम्हाला कळून येईल. देवाचा संदेशवाहक होण्याचे निमंत्रण त्याला देण्यात आले तेव्हा तो म्हणाला: “हा मी आहे, मला पाठीव.” (यश. ६:८) यहोवाच्या कार्यासाठी त्याने दाखवलेल्या तयारीवरून आपल्यालाही सुवार्तेचा प्रचार करत राहण्याचे आणि ‘सर्व राष्ट्रांस साक्ष’ देण्याच्या कार्यात पूर्ण सहभाग घेण्याचे उत्तेजन मिळते.—मत्त. २४:१४.
५ यहोवाच्या महत्कृत्यांकडे लक्ष दिल्याने त्याची महती वाढेल. तेव्हा, देवाच्या वचनाचे आचरण करण्याचा सुहक्क जपून ठेवा!