वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०० पृ. ३
  • नवीन विभागीय संमेलनाचा कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९८
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९५
  • आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यास मदत करणारे विभागीय संमेलन
    आमची राज्य सेवा—२००९
  • नवीन विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km १२/०० पृ. ३

नवीन विभागीय संमेलनाचा कार्यक्रम

यहोवाच आपले प्रेम आणि एकनिष्ठ भक्‍ती मिळण्याच्या योग्यतेचा आहे हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु, हे जग आपल्याला पाशात पाडण्याचा, यहोवासोबतचा आपला घनिष्ठ नातेसंबंध तोडण्याचा प्रयत्न करते. (योहा. १७:१४) यहोवावरील आपले अतूट प्रेम कायम राखण्यासाठी आणि आपल्या आध्यात्मिकतेला घातक ठरणाऱ्‍या जगिक गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला बळकटी मिळावी म्हणून २००१ सेवा वर्षाच्या नवीन विभागीय संमेलनाची आयोजना केली आहे. या कार्यक्रमाचा विषय असेल, “देवावर प्रीती करा—जगातल्या गोष्टींवर नव्हे.”—१ योहा. २:१५-१७.

यहोवावरील आपले गाढ प्रेम आपल्याला त्याच्याविषयी साक्ष द्यायला प्रेरित करते. हे खरे असले तरीही, देवाच्या अनेक लोकांना क्षेत्र सेवेत भाग घेण्यास फार जड जाते. “देवावरील प्रेम आपल्याला प्रेरित करते” या भागामध्ये, काहींनी बुजरेपणावर आणि इतर अडचणींवर मात करून या कार्यात पूर्णपणे सहभाग कसा घेतला ते पाहा.

दिवसेंदिवस रसातळाला चाललेले जगाचे नीतिनियम आपल्यावर कसा प्रभाव पाडतात? एकेकाळी वाईट समजल्या जाणाऱ्‍या गोष्टी आजकाल सर्वमान्य झाल्या आहेत. “यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांनो वाईटाचा द्वेष करा” हे भाषण आणि “जगातील गोष्टी—त्यांच्याबद्दल आपला काय दृष्टिकोन आहे?” हा परिसंवाद, वाईट वासनांकडे पाठ फिरवण्याविषयीचा आपला निर्धार अधिक पक्का करील.

कार्यक्रमात ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभा यांचा एक आदर्श नमुना तसेच त्या आठवड्याच्या टेहळणी बुरूज अभ्यासाचा सारांश देखील सादर केला जाईल. “प्रीती आणि विश्‍वासाने जग कसे जिंकता येते” हे जाहीर भाषण, आपल्याला जगाच्या दबावांचा प्रतिकार करून येशूचे अनुकरण करण्यासाठी उत्तेजन देईल. (योहा. १६:३३) कार्यक्रमाला तुमचे बायबल विद्यार्थी उपस्थित राहतील याची जातीने खातरी करा. बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींनी लवकरात लवकर अध्यक्षीय पर्यवेक्षकांना कळवावे, म्हणजे आवश्‍यक योजना करता येतील.

यहोवाच्या समृद्ध आशीर्वादांचा लाभ घेण्यासाठी आपले प्रेम कशावर केंद्रीत असले पाहिजे हे या विभागीय संमेलनातून सांगितले जाईल. त्याचा कोणताही भाग चुकवू नका!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा