नवीन खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
फेब्रुवारी २००१ मध्ये सुरू होणाऱ्या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाचे शीर्षक आहे, “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.” (१ करिंथ. १४:२०) या संमेलनाला उपस्थित राहिल्याचा आपल्याला फायदा कसा होईल? आपण दुष्टाईने व्यापलेल्या जगात राहत आहोत. त्याचा प्रतिकार करण्यासाठी, आपण आपला आध्यात्मिक समजुतदारपणा वाढवला पाहिजे म्हणजे वाईटाला चांगल्याने आपल्याला जिंकता येईल. खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम आपल्याला अगदी हेच करायला मदत करील.
सुरवातीच्या कार्यक्रमात, “बायबलची समज प्राप्त करण्यामध्ये प्रौढ होण्यासाठी साहाय्यक” याची चर्चा विभागीय पर्यवेक्षक करतील. ख्रिस्ती विश्वासात दृढ कसे व्हावे त्याविषयी ते आपल्याला सांगतील. पाहुणे वक्ता, “आपल्या विचारशक्तीला योग्य मार्गदर्शन देऊन आध्यात्मिकतेचे रक्षण करा” या विषयावर भाषण देतील. या भाषणातून ते दाखवून देतील की गहन समज प्राप्त करण्यासाठी बायबलच्या तत्त्वांचा प्रत्यक्षात उपयोग करणे किंवा अंमल करणे किती महत्त्वाचे आहे.
तरुणांनीही समजशक्ती विकसित करणे आवश्यक आहे. याची चर्चा, “दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे का व्हावे” आणि “आता समजुतदारपणा प्राप्त करणारे युवक” या भागांमध्ये केली जाईल. तरुणांना जगाचे दुष्ट मार्ग जाणून घेण्याची उत्सुकता वाटू नये आणि संकट टाळण्यासाठी स्वतःला आध्यात्मिकरित्या दृढ बनवण्यासाठी ते काय करतात हे त्यांच्याकडून ऐका.
जीवनातला सर्वात मोठा आनंद आपल्याला कसा मिळेल? पाहुणे वक्ता याचे स्पष्टीकरण “समजुतदारपणाने बायबलची तत्त्वे लागू करून फायदा प्राप्त करा” या शेवटल्या भाषणात देतील. ते आपल्याला उदाहरणे देऊन समजावतील की, देवाच्या वचनातील गोष्टी अंमलात आणल्याने आपल्याला समस्यांना तोंड देण्यास, निर्णय घेण्यास आणि यहोवाच्या शिक्षणापासून खरोखर लाभ मिळवण्यास मदत मिळेल.
देवाला केलेल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून पाण्यात बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर आपली नावे अध्यक्षीय पर्यवेक्षकांना द्यावीत. खास संमेलन दिवसाची तारीख सांगितल्यावर लगेच आपल्या दिनदर्शिकेवर खूण करून या बोधपर कार्यक्रमातून फायदा प्राप्त करण्यासाठी निश्चित योजना करा. खास संमेलन दिवसाचे एकही भाषण चुकवू नका! हे खास संमेलन तुम्हाला या दुष्ट व्यवस्थेत तग धरून राहण्यास आणि यहोवाला विश्वासू राहण्यास बळकट करील.