वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०० पृ. ७
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९०
  • मुलांना सभांमधून अधिक लाभ मिळविण्यासाठी मदत द्या
    आमची राज्य सेवा—१९९०
  • बालपणापासून मुलांना वळण लावणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km ५/०० पृ. ७

प्रश्‍न पेटी

◼ सभा सुरू असताना आईवडिलांना त्यांच्या मुलांची काळजी घ्यायला अटेंडंट कशी मदत करू शकतात?

मुले स्वभावानेच उत्साही असतात, खूप वेळ स्वस्थ बसणे ही त्यांना शिक्षा वाटते. त्यामुळे सभा संपल्यानंतर साहजिकच मुलांचा कोंडलेला उत्साह बाहेर पडतो आणि ते किंगडम हॉलमध्ये किंवा बाहेर गाड्या पार्क करतात तिथे, किंवा रस्त्यावर इकडून तिकडे एकमेकांच्या मागे पळू लागतात. पण नीतिसूत्रांत मुलांविषयी जे सांगितले आहे ते अगदी खरे आहे: “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.”—नीति. २९:१५.

मुलांच्या अशा दंगामस्तीमुळे काही वयस्कर बंधू व भगिनींना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत, ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. यामुळे दुखापत झालेल्यांना तर त्रास झालाच पण त्यासोबत मुलांच्या आईवडिलांना आणि मंडळीलाही अनावश्‍यक खर्च करावा लागला. मुलांना किंगडम हॉलच्या आत किंवा बाहेर इकडून तिकडे धावण्याची किंवा खेळण्याची परवानगी दिली जाऊ नये. हे त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

उपासनेच्या ठिकाणाबद्दल योग्य आदर बाळगण्यास आपल्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी मुळात आईवडिलांची आहे असे बायबल म्हणते. (उप. ५:१अ) परंतु ख्रिस्ती सभा, संमेलन किंवा अधिवेशन यांत काही अटेंडंट्‌स नेमलेले असतात; सर्वकाही “शिस्तवार” आणि ‘व्यवस्थितपणे’ घडावे यासाठी त्यांना नेमले जाते. (१ करिंथ. १४:४०; कलस्सै. २:५) या अटेंडंट्‌सनी कार्यक्रम सुरू होण्याआधी, सुरू असताना व संपल्यानंतर सभागृहाच्या आत व बाहेरही लक्ष द्यावे. एखादे मूल इकडून तिकडे धावत असेल किंवा दंगामस्ती करत असेल तर अटेंडंटने त्याला थांबवावे, व असे करणे का चुकीचे आहे हे प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. मुलाच्या आईवडिलांनाही याविषयी कळवावे आणि त्यांना मुलावर लक्ष ठेवण्यास सांगावे. आईवडिलांनी लगेच अटेंडंच्या सूचनेनुसार आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे.

काही वेळा अगदी लहान मुले किंवा तान्ही मुले सभा सुरू असताना रडू लागतात आणि त्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना बाहेर घेऊन जावे लागते. अटेंडंट्‌स सभा सुरू होण्याच्या २० मिनीटे अगोदर येऊन सभागृहातील शेवटल्या काही ओळी खास लहान मुलांच्या आईवडिलांकरता राखून ठेवू शकतात. मंडळीतल्या इतरांनी त्या ओळींत बसण्याचे टाळावे व अशाप्रकारे या व्यवस्थेला सहयोग द्यावा.

एखादे मूल गडबड करू लागल्यास आईवडिलांनी लगेच हालचाल करावी. आईवडिलांनी दुर्लक्ष केले आणि इतरांना त्रास होऊ लागला, तर अटेंडंटनी विनम्रपणे आईवडिलांपैकी एकाला त्यांच्या मुलास सभागृहातून बाहेर नेण्याची विनंती करावी. आपण सभेला आमंत्रित केलेल्या नवीन लोकांना मुले असल्यास, आपण स्वतः त्यांच्यासोबत बसले पाहिजे आणि त्यांची मुले रडू लागल्यास किंवा त्रास देऊ लागल्यास त्यांना मदत केली पाहिजे.

किंगडम हॉलमध्ये सर्व वयोगटांच्या मुलांना पाहून आणि त्यांचे शिस्तवार वागणे पाहून किती आनंद वाटतो! (१ तीम. ३:१५) ते यहोवाच्या उपासनेबद्दल आदर दाखवतात तेव्हा ते यहोवाला गौरव आणतात, शिवाय, मंडळीत सर्वजण त्यांची प्रशंसा करतात.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा