सेवा सभा आराखडा
मे ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १२५ (९)
८ मि: स्थानिक घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१७ मि: मे महिन्यादरम्यान आत्म्यात आवेशी असा. सर्व्हिस ओव्हरसियरचे भाषण व मुलाखती. एप्रिल महिन्यात मंडळीने केलेल्या कार्याची उजळणी करा. ज्यांनी अधिक सेवा करण्याचा प्रयत्न केला किंवा सहायक पायनियरिंग केली अशा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले? एप्रिल महिन्यात दाखवलेला आवेश मे महिन्यातही मंडळीला टिकवून ठेवता येईल का? औपचारिक व अनौपचारिक पद्धतींनी सेवा करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. शाळाकॉलेजांत जाणाऱ्या तरुणांना उन्हाळ्याच्या सुटीचा फायदा घेऊन अधिक सेवा करण्याचे प्रोत्साहन द्या. मंडळीच्या एकूणएक प्रचारकाला रिपोर्ट देता यावा म्हणून काही प्रयत्न करता येतील का? सेवेत अनियमित असणाऱ्यांना मदत करण्यासाठी कोणत्या खास योजना करण्यात आल्या आहेत याविषयी सांगा. स्मारक विधीला उपस्थित राहिलेल्या सर्वांची आस्था वाढवण्यासाठी काही प्रयत्न करता येतील का? त्यांना आध्यात्मिकरित्या प्रगती करता यावी म्हणून बायबल अभ्यास सुरू करण्याचे प्रोत्साहन द्या. आवेशाने व उत्साहाने कार्य केल्याबद्दल सर्व बांधवांची प्रशंसा करा.
२० मि: “देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे” यहोवाच्या साक्षीदारांचे प्रांतीय अधिवेशन. पुरवणीत दिलेल्या लेखाची प्रश्नोत्तरांद्वारे उजळणी. हा भाग मंडळीच्या सेक्रेटरीने हाताळावा. संस्थेच्या मार्गदर्शनाला काटेकोरपणे जडून राहणे का महत्त्वाचे आहे हे दिलेल्या वचनांचा उपयोग करून सांगा. शुक्रवारसहित अधिवेशनाच्या तिन्ही दिवसांना उपस्थित राहण्याकरता आतापासूनच सुट्या काढण्याचे महत्त्व पटवून द्या. संस्थेच्या व्यवस्थेला सहकार्य देण्याबद्दल बांधवांची प्रशंसा करा.
गीत २०१ (८) व समाप्तीची प्रार्थना.
मे १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३४ (२८)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.
२० मि: “बऱ्याच लोकांपर्यंत पोचण्याचा एक उत्तम मार्ग—टेलिफोन साक्षकार्य.” पुरवणीतील पहिल्या १३ परिच्छेदांवर प्रश्नोत्तर पद्धतीने चर्चा. वेळेकडे लक्ष ठेवून, निवडक परिच्छेद वाचण्यास सांगा. १२ व १३ परिच्छेदात तयारी करण्याची जी पद्धत सांगण्यात आली आहे त्यावर प्रात्यक्षिक दाखवा. पुढच्या आठवडी राहिलेल्या सात परिच्छेदांची तयारी करून येण्याची आणि सोबत रीझनिंग पुस्तक आणण्याची सर्वांना आठवण करून द्या.
१५ मि: टेहळणी बुरूजच्या जानेवारी १५, २००० अंकातील २०-२२ पृष्ठांवर असलेल्या “तुमचं स्वतःबद्दल काय मत आहे?” या लेखाच्या आधारावर वडिलांचे भाषण.
गीत २०३ (५) व समाप्तीची प्रार्थना.
मे २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३६ (२३)
१० मि: स्थानिक घोषणा. प्रश्न पेटीवर चर्चा.
१५ मि: “जागृत राहा.” प्रश्नोत्तर पद्धतीने चर्चा. दिवस व घटका आपल्याला ठाऊक नसली तरीसुद्धा सतत आध्यात्मिकरित्या जागृत राहणे का गरजेचे आहे हे समजावून सांगा.—टेहळणी बुरूजच्या नोव्हेंबर १, १९९५ अंकातील पृष्ठ २० पाहा.
२० मि: “बऱ्याच लोकांपर्यंत पोचण्याचा एक उत्तम मार्ग—टेलिफोन साक्षकार्य.” प्रश्नोत्तर पद्धतीने १४-२० परिच्छेदांची चर्चा. वेळेकडे लक्ष ठेवून निवडक परिच्छेद वाचण्यास सांगा. १६ व्या परिच्छेदात रीझनिंग पुस्तकाचा संदर्भ दिला आहे; त्यावर प्रश्न विचारा. ऑगस्ट १९९० च्या आमची राज्य सेवा यातील पृष्ठ ४ वर दिलेल्यांपैकी काही मुद्दे सांगा. चालू महिन्याच्या पुरवणीतील १६ व्या परिच्छेदात, टेलिफोनवर कसे बोलावे याची काही उदाहरणे दिली आहेत. त्यांपैकी कोणत्याही एक उदाहरणावर आधारित प्रात्यक्षिक दाखवा. या पद्धतीने साक्षकार्य करणे अतिशय परिणामकारक ठरू शकेल असे सांगून सर्वांचा उत्साह वाढवा.
गीत ८३ (१७) व समाप्तीची प्रार्थना.
मे २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १३५ (६)
१२ मि: स्थानिक घोषणा. मे महिन्याचा रिपोर्ट देण्याची सर्वांना आठवण करून द्या. जून महिन्याकरता असलेल्या साहित्य सादरतेवर एक लहानसे प्रात्यक्षिक दाखवा. अपेक्षा ब्रोशरच्या १३ व्या पाठाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल हे दाखवा.
१५ मि: “आपल्या पवित्र सेवेतून आनंद मिळवा.” भाषण. कोणत्या कारणांमुळे आपली सेवा आनंददायक आहे यावर चर्चा करा.—इन्साइट खंड २ रा, पृष्ठ १२० वर पाहा.
१८ मि: बायबल वाचल्यामुळे मिळणारे आशीर्वाद. प्रशाला मार्गदर्शक पुस्तिकेतील ३४-५ पृष्ठांवर, ६, ७ परिच्छेदात दिलेल्या माहितीच्या आधारावर भाषण व प्रात्यक्षिक. दर आठवडी ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या कार्यक्रमात बायबल वाचनाचा एक भाग नेमलेला असतो व त्याच्या आधारावर ठळक वैशिष्ट्ये किंवा हाइलाइट्स दिल्या जातात. (आमची राज्य सेवाच्या डिसेंबर १९९९ अंकातील पृष्ठ ७) उदाहरणार्थ, या आठवड्याकरता नेमलेल्या भागाची एखाद्या कुटुंबाला कशाप्रकारे चर्चा करता आली असती यावर एका कुटुंबाचे प्रात्यक्षिक दाखवा. चर्चा करताना ते वॉचटावर पब्लिकेशन्स इन्डेक्स किंवा इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स यातून एखाददोन रोचक मुद्दे शोधून काढतात किंवा या प्रकाशनांतून रिसर्च करतात असे दाखवा. आपल्याला ‘सत्याचे वचन नीट सांगणारे’ बनता यावे यासाठी बायबल वाचन अधिक अर्थपूर्ण कसे बनवता येईल यावर काही सूचना द्या.—२ तीम. २:१५.
गीत ९५ (२८) व समाप्तीची प्रार्थना
जून ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ३७ (९)
५ मि: स्थानिक घोषणा.
१० मि: स्थानिक गरजा.
१५ मि: “लहान मुलांकरता उत्तम संधी.” भाषण व चर्चा. टेहळणी बुरूजच्या डिसेंबर १, १९९६ अंकातील पृष्ठ १३ वर १५ व्या परिच्छेदात दिलेले अनुभव सांगा. मंडळीतल्या लहान मुलांना मासिके देताना आलेले चांगले अनुभव सांगण्यास आवडेल का असे विचारा. घरोघरचे कार्य करताना साध्यासोप्या पद्धतीने मासिक कसे देता येते हे एक किंवा दोन लहान मुलांकडून प्रात्यक्षिक रूपात दाखवा. आपल्या मुलांना दर आठवडी मासिक वितरण कार्याकरता नेण्याचे आईवडिलांना प्रोत्साहन द्या.
१५ मि: “ ‘अगोदर पारख व्हावी’—कशाप्रकारे?” वडिलांचे भाषण. मंडळीत सेवा सेवक असण्याविषयी बायबलमध्ये काय सांगण्यात आले आहे याची माहिती द्या. (इन्साइट, खंड २ रा, पृष्ठ ४०९ पाहा.) सेवा सेवक म्हणून नेमणूक होण्याकरता कोणत्या पात्रता असाव्या लागतात हे सांगा. (आपली सेवा पुस्तकातील पृष्ठ ५५-७ पाहा.) सेवा सेवक कशाप्रकारे मंडळीत मदत करू शकतात याकडे लक्ष वेधून मंडळीतल्या जास्तीत जास्त बांधवांना सेवा सेवक बनण्याचा प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन द्या.
गीत ८२ (१०) व समाप्तीची प्रार्थना.