तुम्ही नियमितपणे राज्याचा प्रचार करता का?
१ ऑगस्ट १९९९ मध्ये भारताने २१,२१२ प्रचारकांचा उच्चांक गाठला. ही बातमी ऐकून आपणा सर्वांनाच किती आनंद झाला होता! खरोखरच, सर्वांनी खांद्याला खांदा लावून, दृढनिश्चयाने काम केले नसते तर हे शक्यच झाले नसते. पण, त्यानंतरच्या महिन्यांत काही प्रचारक नियमितपणे प्रचार करण्यात मागे पडल्याचे दिसते. कारण तेव्हापासून नियमितपणे प्रचाराच्या कार्यात भाग घेणाऱ्यांची संख्या दर महा सरासरी २०,०९५ च्या आसपास राहिली आहे. यावरून लक्षात येते, की दर महिन्याला प्रत्येक १९ प्रचारकांपैकी १ प्रचारक सेवेत सहभाग घेत नाही. खाली दिलेल्या सूचनांमुळे नियमितपणे प्रचार कार्यात भाग घेण्यास सर्वांनाच मदत होईल अशी आमची आशा आहे.
२ या विशेषाधिकाराची कदर करा: देवाच्या राज्याची सुवार्ता सांगणे हा आपल्याकरता एक बहुमान आहे. आणि या बहुमानाची आपण मनस्वी कदर बाळगली पाहिजे. या कार्यामुळे यहोवाचे मन आनंदित होते; तसेच प्रामाणिक लोकांना जीवनाच्या वाटेवर आणण्यास मदतही मिळते. (नीति. २७:११: १ तीम. ४:१६) या शिवाय, सेवेत नित्यनियमाने सहभाग घेतल्याने आपल्याला जास्त अनुभव मिळतो आणि सेवेचे परिणाम पदरी पडतात तेव्हा मनात आनंदाची आणि समाधानाची भावना फुलते.
३ सेवेचा अहवाल द्या: काही बंधूभगिनी क्षेत्र सेवा करतात पण वेळेवर सेवेचा अहवाल देत नाहीत. ‘या महिन्यात माझे फारच कमी तास झालेत. तेव्हा अहवाल कसा देऊ?’ असा विचार मनात कधीच आणू नका. (पडताळा मार्क १२:४१-४४.) महिन्याभरात आपण जी काही सेवा केली आहे त्याचा अहवाल आपण दिलाच पाहिजे! आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना दर महिन्याच्या शेवटी वेळेवर आणि अचूक अहवाल देण्याची आठवण राहावी म्हणून सेवेवरून आल्यानंतर सेवेचा अहवाल तुम्ही कॅलेंडरवर लिहून ठेवू शकता.
४ आवश्यक असलेली मदत द्या: बंधूभगिनींना प्रचार कार्यात नियमितपणे भाग घेता यावा म्हणून क्षेत्र सेवेच्या योजनांमध्ये कदाचित आणखी सुधारणा करता येईल. याशिवाय, प्रचार कार्यात नियमित नसणाऱ्या बंधूभगिनींची मदत करण्याकरता मंडळीचे सचीव आणि पुस्तक अभ्यास संचालक अनुभवी प्रचारकांना सांगू शकतात. प्रचारकार्यात जाणाऱ्या तुमच्या मुलांना किंवा अद्याप बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकांना दर महिन्याला न विसरता प्रचार कार्याचा अहवाल देण्यास सांगा.
५ या संदर्भात, ऑक्टोबर १, १९९७ च्या टेहळणी बुरूज अंकातील “यहोवाच्या सेवेत दीर्घायुष्य दिल्याबद्दल कृतज्ञ” ही जीवनकथा तुम्ही पुन्हा वाचू शकता. नॉरवेच्या ओटीले मिडलन या बहिणीचा १९२१ साली बाप्तिस्मा झाला. पण, त्याआधीपासूनच त्या सुवार्तेच्या नियमित प्रचारक होत्या. शहात्तर वर्षानंतर म्हणजे वयाच्या ९९ व्या वर्षी त्या म्हणतात: “मी अजूनही प्रचार कार्यात नियमितपणे जाते याचा मला किती आनंद होतो.” यहोवाच्या सेवकांसाठी किती हे उत्तम उदाहरण!