वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०० पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२०००
  • उपशिर्षक
  • मार्च १३ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २० ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २७ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल ३ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२०००
km ३/०० पृ. २

सेवा सभा आराखडा

मार्च १३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११८ (२०)

१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.

१५ मि: “आपण लोकांना आनंदाची बातमी सांगतो.” एका मिनिटांत लेख प्रस्तुत करून प्रश्‍नोत्तरांनी लेखाची चर्चा सुरू करा. क्षेत्रात लोकांना ज्ञान पुस्तक देताना बायबलचे कोणकोणते सकारात्मक मुद्दे त्यातून दाखवता येतील याची उदाहरणे द्या.

२० मि: “एप्रिल २०००—आपल्यासाठी आजवरचा खास महिना ठरो.” (परिच्छेद १- ११) प्रश्‍नोत्तरे. मंडळीतील सहायक पायनियरांचा अलीकडील काळातला सरासरी उच्चांक सांगा. त्यांपैकी काहींना, नेहमीपेक्षा जास्त सेवा केल्यामुळे कोणते लाभ मिळाले ते सांगण्याचे आमंत्रण द्या. एप्रिल महिन्यात सहायक पायनियरांचा एक नवीन उच्चांक गाठण्याचे उत्तेजन मंडळीला द्या. आपली सेवा या पुस्तकातील पृष्ठे ११३-११४ वर सहायक पायनियरांच्या पात्रतेविषयी सांगण्यात आले आहे; त्याची उजळणी करा. सहायक पायनियरिंग करण्याची इच्छा असणाऱ्‍यांनी सभा संपल्यानंतर अर्ज मागून घ्यावेत.

गीत १८७ (१७) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २० ने सुरू होणारा सप्ताह

गीत २१ (८)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: “मला काय करता येईल?” पुस्तक अभ्यास संचालक एकदोन सहायक सेवकांसोबत या लेखाची चर्चा करतात. निरनिराळ्या अडचणींमुळे काही प्रचारकांना असे वाटेल की ते मंडळीसाठी फारसे करू शकत नाहीत. परंतु, मंडळी बळकट करण्यासाठी आणि राज्य कार्याला बढावा देण्यासाठी मंडळीतील प्रत्येकाला कोणकोणत्या मार्गाने मोलाचा हातभार लावता येईल याची काही उदाहरणे द्या. शेवटी, प्रत्येकजण ‘अंतिम अहवालात सहभाग’ कसा घेऊ शकतो ते सांगा.—आपली सेवा, पृष्ठे १०८-११० पाहा.

२० मि: “एप्रिल २०००—आपल्यासाठी आजवरचा खास महिना ठरो.” (परिच्छेद १२-१८) प्रश्‍नोत्तरे. एखाद्या परिचित व्यक्‍तीला स्मारक विधीचे आमंत्रण कसे द्यावे याचे एक प्रात्यक्षिक दाखवा. २००० कॅलेंडरवरील एप्रिल महिन्याची उजळणी करा आणि क्षेत्र सेवेच्या सभांसाठी मंडळीने काय योजना केल्या आहेत त्या श्रोत्यांना सांगा. एप्रिल महिन्यात मंडळी या नात्याने सेवेत १०० टक्के सहभाग घेण्याचे ध्येय गाठण्यासाठी सेवेत शक्य तितका सहभाग घेण्याची आठवण प्रत्येकाला करून द्या. सर्वांना सहायक पायनियरिंग करण्याचे आणि सभा संपल्यानंतर अर्ज मागून घेण्याचे उत्तेजन द्या.

गीत ६५ (२३) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ११९ (१७)

१० मि: स्थानिक घोषणा. सर्वांना मार्च महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. जे लोक एप्रिल महिन्यात सहायक पायनियरिंग करणार आहेत अशांची नावे सांगा. सहायक पायनियरिंगचा अर्ज भरण्यासाठी अजूनही उशीर झालेला नाही हे मंडळीला सांगा. एप्रिल महिन्यात क्षेत्र सेवेच्या सभांची जी योजना केली आहे तिचा आराखडा मंडळीला वाचून सांगा. एप्रिल महिन्याची सुरवातच चांगली व्हावी म्हणून येत्या शनिवारी आणि रविवारी सर्वांना सेवेत सहभाग घेण्याचे उत्तेजन द्या. त्या महिन्यात आपण क्षेत्रात टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके देणार आहोत. त्यामुळे आपल्या प्रस्तावनेत परिणामकारकरित्या उपयोग करता येईल असा एखादा लेख आणि संभाषण सुरू करण्यास मदत करील असा एखादा मुद्दा प्रत्येक नवीन अंकातून दाखवा. प्रत्येकाने अपेक्षा माहितीपत्रक जवळ ठेवावे आणि आस्थेवाईक लोकांसोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा.

१३ मि: “मदत मागा.” वडिलांचे भाषण आणि श्रोत्यांसोबत चर्चा. आपल्यापैकी प्रत्येकाला कशाप्रकारे वेळोवेळी मदतीची गरज भासते ते सांगा. अर्थात, प्रत्येकाने आपापला भार वाहिला पाहिजे हे खरे आहे. (गलती. ६:५) परंतु, कधीकधी आपल्याला आपल्या शक्‍तीपलीकडे काही गोष्टी सहन कराव्या लागतात तेव्हा मंडळीत आध्यात्मिकरित्या प्रौढ असलेल्या बंधुभगिनींकडे मदत मागण्यास मागेपुढे पाहू नका. इतरांनी दिलेल्या प्रेमळ मदतीमुळे कसे उत्तेजन मिळाले याबाबतीत श्रोत्यांना आपले अनुभव कथित करण्यास सांगा.

१५ मि: स्थानिक घोषणा.

१२ मि: २००० इअरबुक याची उजळणी करा. पृष्ठ ३१ वरील “१९९९ ग्रँड टोटल्स” याच्या वैशिष्ट्यांची श्रोत्यांसोबत चर्चा व उजळणी करा. मग, पृष्ठ ३-५ वरील “अ लेटर फ्रॉम द गव्हर्निंग बॉडी” याची चर्चा करा. यात दिलेल्या उत्तेजनाचा कशाप्रकारे फायदा करून घेता येईल यावर काहींना आपली मते व्यक्‍त करण्यास सांगा.

गीत १९५ (८) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ७२ (२२)

१० मि: स्थानिक घोषणा आणि क्षेत्र सेवेत आलेले अनुभव. यात अलीकडचे असे काही निवडक अनुभव सांगा ज्यांमुळे इतरांना क्षेत्र सेवेत सहभाग घेण्याचे उत्तेजन मिळेल.

१७ मि: “डॅनियल्स प्रॉफेसी पुस्तकाचा अभ्यास करणे.” प्रश्‍नोत्तरे. दानीएलच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यामुळे कसा फायदा होऊ शकतो हे थोडक्यात सांगा. (डॅनियल्स प्रॉफेसी पुस्तकातील अध्याय १, परिच्छेद १५-१७, पाहा.) ज्या पुस्तक अभ्यास गटांकडे डॅनियल्स प्रॉफेसी पुस्तक स्थानिक भाषेत उपलब्ध नसेल त्या गटांनी समजेल त्या भाषेतल्या पुस्तकाचा उपयोग करावा. तेही शक्य नसल्यास, याच राज्य सेवेतील पृष्ठ ६ वर दिलेल्या आराखड्यानुसार त्यांनी प्रकटीकरण याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकाचा अभ्यास करावा. आणि त्यानुसार सदर लेख हाताळला जावा. मंडळीच्या पुस्तक अभ्यासाला नियमितरित्या उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन सर्वांना द्या.

१८ मि: एखाद्याने केलेले गंभीर पाप मी कळवावे का? खास तरुणांवर रोख असलेले वडिलांचे भाषण. हल्ली तरुणांवर वाईट परिणाम करणाऱ्‍या बऱ्‍याच समस्या समाजात निर्माण झाल्या आहेत. उदाहरणार्थ, नैतिक मूल्यांचा ऱ्‍हास, वाढता हिंसाचार, ड्रग्सचे व्यसन आणि मोठ्यांचा अनादर. काही तरुण लोक आपल्या वाईट आचरणावर पडदा घालण्यासाठी दुहेरी जीवन जगतात. हा मंडळीच्या आध्यात्मिक आरोग्याला एक मोठा धोका आहे. काहीजण गंभीर पाप करतात आणि ते लपवून ठेवावे असे त्यांना वाटते. मंडळीतील एखाद्या भावाने किंवा बहिणीने देवाच्या नियमाचे उल्लंघन करणारे गंभीर पाप केले आहे हे लक्षात येताच तुम्ही काय करावे? लेवीय ५:१ मधील सिद्धान्ताचे अनुकरण करा. (ऑगस्ट १५, १९९७, टेहळणी बुरूज, पृष्ठे २७-३० पाहा.) तसेच, तरुणांचे प्रश्‍न या पुस्तकातील पृष्ठे ६८-९ वर दिलेली माहिती विचारात घ्या आणि अशा प्रसंगी एखाद्याने काय करावे त्याचे स्पष्टीकरण द्या.

गीत ६८ (२३) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा