घोषणा
◼ डिसेंबरसाठी साहित्य सादरता: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान आणि त्यासोबत नवे जग भाषांतर. जानेवारी: मंडळीकडे असलेली कोणतीही १९२ पानांची जुनी पुस्तके. मंडळीकडे ही पुस्तके नसल्यास लाईफ—हाऊ डिड इट गेट हियर? बाय एव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? किंवा मग, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल ही पुस्तके सादर केली जाऊ शकतात. फेब्रुवारी: कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. या महिन्यात बायबल अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केला जाईल.
◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकाने किंवा त्यांनी नेमलेल्या इतर कोणत्या व्यक्तीने डिसेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. आणि पुढचा जमाखर्च अहवाल दिल्यानंतर याची घोषणा करावी.
◼ साल २००१ चा स्मारकविधी रविवार, एप्रिल ८ रोजी सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल. ही सूचना मुद्दामहून इतक्या आधी दिली जात आहे. त्यामुळे, अनेक मंडळ्या जर एकाच राज्य सभागृहाचा उपयोग करणार असतील आणि या प्रसंगासाठी बाहेरचा हॉल बुक करण्याची आवश्यकता असेल तर त्यासाठी बांधवांना पुरेसा वेळ मिळेल. हॉलच्या इमारतीत चाललेल्या इतर कार्यक्रमांमुळे कोणताही त्रास न होता स्मारकविधीचा सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावा म्हणून वडिलांनी हॉलच्या मॅनेजमेन्टशी आधीच बोलावे. हा एक महत्त्वपूर्ण प्रसंग असल्यामुळे स्मारकविधीचे भाषण देण्यासाठी एखाद्या बांधवाला नियुक्त करताना वडीलवर्गाने आळीपाळीने भाषण देण्याऐवजी किंवा दर वर्षी त्याच त्या बांधवाला भाषण देण्यास नियुक्त करण्याऐवजी अधिक कार्यक्षम असलेल्या एखाद्या वडिलाला हे भाषण देण्यासाठी नेमावे. अर्थात, अभिषिक्त वर्गापैकी एखादा सक्षम बांधव असल्यास पर्याय नाही.
◼ सांगण्यास अतिशय आनंद होतो, की ऑगस्ट १९९९ मध्ये आपण प्रचारकांचा एक नवीन उच्चांक गाठला आहे. अर्थात, प्रचारकांनी अगदी तत्परतेने आपला क्षेत्र सेवेचा अहवाल दिल्यामुळे तसेच पुस्तक अभ्यास संचालकांनी आणि मंडळीच्या सचिवांनी देखील मंडळीचा अहवाल काळजीपूर्वक संकलित करून संस्थेला पाठवून दिल्यामुळे हे शक्य झाले. याबद्दल सर्वांचीच आम्ही वाखाणणी करतो आणि दर महिन्याला इतक्याच तत्परतेने सर्वजण आपला सेवा अहवाल देतील अशी आशा करतो.