वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९९ पृ. ५-६
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km १२/९९ पृ. ५-६

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची चाचणी

ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत सप्टेंबर ६ ते डिसेंबर २०, १९९९ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्‍नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.

[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्‍नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्‍तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]

पुढील विधाने चूक किंवा बरोबर ते ओळखा:

१. आपली शासनपद्धत नेहमीच उचित आणि न्याय्य असते हे सिद्ध करण्याकरता यहोवाने मानवाला स्वतंत्रपणे शासन करण्याची परवानगी दिली आहे. (अनु. ३२:४; ईयो. ३४:१०-१२; यिर्म. १०:२३) [w-MR९७ २/१५ पृ. ५ परि. ३]

२. बायबलनुसार देवाच्या दृष्टीने सर्वच प्रकारच्या तक्रारी निषिद्ध आहेत. [w-MR९७ १२/१ पृ. ३० परि. ३-४]

३. मस्तकपद आणि सुव्यवस्था यांसंबंधी ईश्‍वरी तत्त्वे ओळखण्याद्वारे आईवडिलांना आपल्या विवाहित मुलांसोबतच्या नातेसंबंधाविषयी उचित दृष्टिकोन बाळगण्यास मदत मिळेल. (उत्प. २:२४; १ करिंथ. ११:३; १४:३३, ४०) [fy-MR पृ. १६४ परि. ६]

४. मार्क ६:३१-३४ यातील वृत्तान्त दाखवतो, की येशूला केवळ लोकांच्या आजारांमुळे आणि गरिबीमुळे त्यांचा कळवळा आला. [w-MR९७ १२/१५ पृ. २९ परि. १]

५. दुसरी मेंढरे वर्गातील एखाद्या ख्रिश्‍चनाला स्मारकविधीला उपस्थित राहता आले नाही, तर गणना ९:१०, ११ यातील तत्त्वानुसार त्याने तो एक महिन्याने साजरा करावा. (योहान १०:१६) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९३ ५/१ पृ. ३२ परि. ९.]

६. ख्रिस्ती आजीआजोबा मुलांच्या मनावर बायबलची सत्ये बिंबवण्याची आईवडिलांची जबाबदारी स्वतःवर घेत नाहीत परंतु, मुलांच्या आध्यात्मिक विकासात ते एक पूरक भूमिका पार पाडू शकतात. (अनु. ६:७; २ तीम. १:५; ३:१४, १५) [fy-MR पृ. १६८ परि. १५.]

७. नीतिसूत्रे ६:३० दाखवते, की विशिष्ट परिस्थितीत चोरी करणे चालण्यासारखे किंवा योग्य असू शकते. [g-MR९७ १२/८ पृ. १३ परि. २]

८. विल्यम टिंडेल हे १५३० साली हिब्रू शास्त्रवचनांच्या इंग्रजी भाषांतरात यहोवा हे देवाचे नाव वापरणारे पहिलेच भाषांतरकार ठरले. [w-MR९७ ९/१५ पृ. २८ परि. ३]

९. आजचे शरणपूर, रक्‍ताच्या पावित्र्याबद्दल देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे आलेल्या मृत्यूपासून आपले संरक्षण करणारी देवाची तरतूद आहे. (गण. ३५:११) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ११/१५ पृ. १७ परि. ८.]

१०. “देवाचे राज्य तुमच्यात आहे,” असे येशूने दुष्ट परूश्‍यांना म्हटले तेव्हा ते राज्य त्या भ्रष्ट माणसांच्या दुष्ट अंतःकरणात होते असे त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. (लूक १७:२१, किंग जेम्स व्हर्शन) [kl-MR पृ. ९१ परि. ६]

पुढील प्रश्‍नांची उत्तरे द्या:

११. पेन्टेकॉस्टच्या सणादरम्यान महायाजक ज्या दोन खमीराच्या भाकरी अर्पण करीत असे, त्या काय सूचित करतात? (लेवी. २३:१५-१७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९८ ३/१ पृ. १३ परि. २१.]

१२. ख्रिस्ती योबेल केव्हा सुरू झाले आणि त्यावेळी कोणत्या प्रकारची मुक्‍तता मिळाली? (लेवी. २५:१०) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ५/१५ पृ. २४ परि. १४.]

१३. यहोवाने दुष्टाईला व दुःखाला दिलेल्या अनुमतीने कोणत्या तीन गोष्टी सिद्ध झाल्या आहेत? [kl-MR पृ. ७७, ७८ परि. १८-२०]

१४. मत्सरी प्रवृत्ती न बाळगण्याविषयी मोशेने कशाप्रकारे उत्तम उदाहरण मांडले? (गण. ११:२९) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ९/१५ पृ. १८ परि. ११.]

१५. डोळ्यांनी प्रत्यक्षात पाहिलेल्या गोष्टींवर नेहमीच विश्‍वास ठेवला जात नाही हे कोरह, दाथान व अबीराम यांच्या उदाहरणावरून कसे दिसून येते? [w-MR९७ ३/१५ पृ. ४ परि. २]

१६. मत्तय १५:३-६ व १ तीमथ्य ५:४ येथे वयोवृद्ध पालकांचा सन्मान करण्यासंबंधी कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत? [fy-MR पृ. १७३-५ परि. २-५]

१७. गणना २६:६४, ६५ यातून कोणता महत्त्वाचा धडा आपण शिकू शकतो? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा g९५ ८/८ पृ. १०-११ परि. ५-८.]

१८. यहोवाला केलेल्या समर्पणाचा काय अर्थ होतो हे समजून घेण्यास फीनहासाचे उदाहरण आपल्याला कशी मदत करते? (गण. २५:११) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ३/१ पृ. १६ परि. १२-१३.]

१९. एक व्यक्‍ती प्रतिनमुनेदार शरणपुराच्या “सीमेबाहेर” कशाप्रकारे जाण्याची शक्यता आहे? (गण. ३५:२६) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ११/१५ पृ. २० परि. २०.]

२०. कोडेक्स सायनायटिकस हे बायबल भाषांतराच्या दृष्टीने कशाप्रकारे अत्यंत मदतदायक ठरले? [w-MR९७ १०/१५ पृ. ११ परि. २.]

पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक शब्द किंवा वाक्यांश पुरवा:

२१. केवळ आपणच _________________________ असून आपण निर्माण केलेल्या सर्व प्राणिमात्रांच्या शांती आणि आनंदासाठी आपले कायदे _________________________ अत्यावश्‍यक आहे हे मूळ सत्य सर्वकाळासाठी शाबीत करावे म्हणूनच यहोवाने दुष्टपणा खपवून घेतला आहे. (स्तोत्र १:१-३; नीति. ३:५, ६; उप. ८:९) [w-MR९७ २/१५ पृ. ६ परि. १]

२२. _________________________ यहोवा _________________________ पूर्ण मागणी करणारा देव आहे हे देखील सुचवतो. [kl-MR पृ. ६६ परि. १४]

२३. स्तोत्रसंहिता १४४:१५ब या वचनानुसार, खरा आनंद हा खरा _________________________ आणि यहोवा देवासोबतच्या चांगल्या _________________________ आधारित हृदयाची एक अवस्था आहे. [w-MR९७ ३/१५ पृ. २३ परि. ७]

२४. सा.यु.पू. १५० सालाच्या सुमारास पूर्ण करण्यात आलेल्या हिब्रू बायबलच्या सर्वसामान्य ग्रीक भाषेतील भाषांतराला _________________________ असे नाव पडले; सा.यु. ४०० सालाच्या सुमारास जेरोम यांनी लॅटिन भाषेत पूर्ण केलेल्या बायबलच्या भाषांतराला _________________________, _________________________ असे म्हणण्यात आले. [w-MR९७ ८/१५ पृ. ९ परि. १; पृ. १० परि. ४]

२५. देवाच्या स्मरणात असलेल्या सर्व मृतांना _________________________ किंवा _________________________ यातून मुक्‍त होण्याची आशा आहे. [kl-MR पृ. ८७-८ परि. १८]

पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:

२६. वर्षातून एकदा म्हणजे, (मांडवांच्या सणाच्या; प्रायश्‍चित्ताच्या; वल्हांडणाच्या) दिवशी संपूर्ण इस्राएल राष्ट्राला, ज्यामध्ये यहोवाची उपासना करणाऱ्‍या विदेश्‍यांचा देखील समावेश होतो, (कोणतेच काम करावयाचे नव्हते; दशांश द्यायचा होता, प्रथमफळांची अर्पणे द्यायची होती) शिवाय उपवास करावयाचा होता. (लेवी. १६:२९-३१) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९६ ७/१ पृ. १० परि. १२.]

२७. नवे जग बायबल भाषांतर समितीच्या विविध ध्येयांपैकी एक म्हणजे, (होता होईल तितके शब्दशः; मूळ भाषांतील मजकुराचा सारांश देणारे; विशिष्ट सिद्धान्ताच्या समजुतीशी जुळेल असे) भाषांतर करणे हे होते; अशा शैलीमुळे वाचकाला मूळ भाषेची छटा आणि संबंधित विचारसरणी यांचे जवळून दर्शन घडते. [w-MR९७ १०/१५ पृ. ११ परि. ५]

२८. इब्री लोकांस १३:१९ यानुसार सह विश्‍वासू बांधवांच्या निरंतर प्रार्थनांचा (देव काय घडू देईल; देव केव्हा कार्य करील; देव कशाप्रकारे घटनांना वळण देईल) यावर प्रभाव पडतो. [w-MR९७ ४/१५ पृ. ६ परि. १]

२९. इस्राएल लोकांना ‘वस्त्राच्या टोकाच्या गोंड्यावर निळे फीत’ लावावे लागत ते (पवित्र अलंकार, सभ्यपणाची खूण, यहोवाचे लोक या नात्याने या जगापासून अलिप्त राहण्याचे एक दृश्‍य प्रतीक) म्हणून लावायचे होते. (गण. १५:३८, ३९) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w८३ १०/१५ पृ. २० परि. १६.]

३०. देवाच्या मशीही राज्याचा पाया (येशूच्या प्रेषितांची निवड झाली तेव्हा; ख्रिस्ताचा बलिदानरूपी मृत्यू झाला तेव्हा; ख्रिस्ताचे स्वर्गारोहण झाले तेव्हा) घालण्यात आला. [kl-MR पृ. ९३ परि. १०]

पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:

गण. १६:४१, ४९; मत्त. १९:९; लूक २:३६-३८; कल. २:८; ३:१४

३१. तपश्‍चर्या, एका खास पवित्र स्थितीप्रत अथवा सत्य ज्ञानाप्रत पोहंचवत नाही. [g-MR९७ ११/८ पृ. २९ परि. ४]

३२. पुनर्विवाहाच्या संभाव्यतेसह घटस्फोटासाठी केवळ जारकर्म हाच एकमेव आधार आहे. [fy-MR पृ. १५८-९ परि. १५]

३३. वृद्धावस्थेतही, ईश्‍वरशासित कार्यांत अधिकाधिक सहभाग घेतल्यामुळे आपल्या वैवाहिक सोबत्याला गमावून बसण्याच्या दुःखाला तोंड देण्यास मदत होते. [fy-MR पृ. १७०-१ परि. २१]

३४. यहोवा ज्या पद्धतीने आपल्या नियुक्‍त सेवकांद्वारे न्याय करतो त्यात चुका काढल्यामुळे अतिशय अनर्थकारी परिणाम घडू शकतात. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९६ ६/१५ पृ. २१ परि. १३.]

३५. निःस्वार्थ प्रेम वैवाहिक जोडप्यांना एकत्र आणते आणि एकमेकांसाठी व त्यांच्या मुलांसाठी काय चांगले आहे ते करावयास प्रवृत्त करते. [fy-MR पृ. १८७ परि. ११]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा