नोव्हेंबरसाठी सेवा सभा
नोव्हेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १५६ (२८)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. “बायबल किती प्रभावशाली आहे ते पाहा!” याची उजळणी.
१५ मि: “प्रचार कार्यामुळे आपला वेगळेपणा दिसून येतो.” एका मिनिटाच्या आत प्रस्तावना देऊन प्रश्नोत्तरांनी चर्चा करा. ज्ञान पुस्तकातील पृष्ठ १७३ आणि परिच्छेद ८ मधील माहितीचा उपयोग करून आपल्या बायबल विद्यार्थ्याला सेवेत सहभाग घेण्याचे उत्तेजन आपण कसे देऊ शकतो ते थोडक्यात सांगा.
२० मि: “कोण बायबल अभ्यास करायला तयार होऊ शकेल?” भाषण आणि प्रात्यक्षिके. परिच्छेद ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे, आपल्या प्रकाशनांमध्ये काय सांगितले आहे याविषयी जाणून घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याच्या निरनिराळ्या पद्धती सूचवा. आणि हे कसे करता येईल त्यासाठी दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. बायबल अभ्यास सुरू करण्यात आपण यशस्वी कसे झालो हे सांगण्याचे श्रोत्यांना आमंत्रण द्या.
गीत १९८ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २०४ (२५)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. सर्वांना पुढील सप्ताहासाठी, नोव्हेंबर महिन्याच्या पुरवणीतील पहिल्या १८ परिच्छेदांची तयारी करण्याची आठवण करून द्या.
१५ मि: प्रश्न पेटी. भाषण. राज्य सभागृह स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याकरता ज्या काही योजना केलेल्या असतील त्याची श्रोत्यांना थोडक्यात कल्पना द्या.
२० मि: “यहुदी धर्माच्या व्यक्तीशी संभाषण कसे कराल?” प्रश्नोत्तरे. ऑर्थोडॉक्स, रिफॉर्म आणि कन्सर्वेटिव्ह जुडाइसम यातला फरक सांगा. (यासाठी, मॅन्काइन्ड्स सर्च फॉर गॉड पृष्ठे २२६-७ पाहा). यहुदी धर्मातल्या व्यक्तीशी बोलताना कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन आपण एक समान वैचारिक आधार तयार करू शकता ते सांगा. यावर चांगल्याप्रकारे तयार केलेले एक प्रात्यक्षिक दाखवा. जुडाइसमवरील अधिक माहितीसाठी फेब्रुवारी १९९८ ची आमची राज्य सेवा पुरवणी; युक्तिवाद पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे २२-३; आणि मॅन्काइन्ड्स सर्च फॉर गॉड, अध्याय ९ पाहा.)
गीत २०८ (८) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २११ (२२)
८ मि: स्थानिक घोषणा.
२५ मि: “इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध!” परिच्छेद १-१८ ची प्रश्नोत्तरांनी चर्चा करा. परिच्छेद ४-७, १२, १६, १७ वाचा. पुढच्या सप्ताहासाठी, परिच्छेद १९ ते ३६ ची चांगली तयारी करून येण्याचे उत्तेजन सर्वांना द्या.
१२ मि: पालकांनो—तुमच्या कुटुंबात नियमित बायबल अभ्यास होतो का? भाषण आणि चर्चा. कुटुंब मिळून अभ्यास करणे का जरूरीचे आहे ते सांगा. (प्रशाला मार्गदर्शन पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ३७-८) या संदर्भात येणारे अडथळे विचारात घ्या: (१) मुले अद्याप फार लहान आहेत असा विचार करणे, (२) मंडळीतील सभांना उपस्थित राहतो तेवढे पुरे असे वाटणे, (३) नेहमी व्यस्त असल्यामुळे फार थकून जाणे आणि (४) टीव्हीमुळे वेळ न मिळणे. (मे १५, १९९४, टेहळणी बुरूज, पृष्ठे ११-१२ पाहा.) कौटुंबिक अभ्यासाचा एक चांगला नित्यक्रम राखण्याकरता, समोर येणाऱ्या अडथळ्यांवर कुटुंब प्रमुख कशी मात करतात याबद्दल कुटुंब प्रमुखांना विचारा. यासाठी प्रयास, निश्चय आणि सहकार्य या गोष्टींची गरज आहे यावर भर द्या.
गीत २१७ (९) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १५८ (२३)
१० मि: स्थानिक घोषणा आणि क्षेत्र सेवेतील अनुभव.
१० मि: मंडळीत नेमून दिलेल्या कामाबद्दल तुम्ही कोणती मनोवृत्ती दाखवता? वडिलांचे भाषण. मंडळीचे सर्व कामकाज सुरळीत चालावे म्हणून मंडळीत बरीच कामे करावी लागतात; उदाहरणार्थ, वेगवेगळ्या लोकांना भाषणे नेमून देणे; इतरांना सभांना घेऊन येणे किंवा त्यांना क्षेत्र सेवेत घेऊन जाणे; मंडळीतल्या वयोवृद्ध भाऊ बहिणींना मदत करणे; आणि स्वच्छता करणे, दुरुस्तीकाम करणे आणि राज्य सभागृहाची देखभाल करणे. या कामात हातभार लावण्यासाठी बोलावले जाते तेव्हा तुम्ही कोणती मनोवृत्ती दाखवता? काहीजण कदाचित नकार दर्शवतील किंवा नाखुषीने तयार होतील, किंवा मग दिलेले काम अर्धवट सोडून देतील. कोणतेही काम करण्याची तयारी दर्शवणे आणि ते पूर्ण करणे हा आत्मसंतुष्टी देणारा एक सुहक्क कसा आहे याची चर्चा करा. मंडळीतील सर्वांना कामासंबंधी एक तत्पर मनोवृत्ती दाखवण्याचे उत्तेजन द्या.—स्तोत्र ११०:३, तळटीप NW; यश. ६:८.
२५ मि: “इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध!” परिच्छेद १९-३६ ची प्रश्नोत्तरांनी चर्चा करा. परिच्छेद २३ ते २५ आणि ३४ ते ३६ वाचा.
गीत २२३ (६) आणि समाप्तीची प्रार्थना.
नोव्हेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत २१५ (२२)
१० मि: स्थानिक घोषणा. प्रचारकांना आपला क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या.
१५ मि: नवीन लोकांना सभांना येण्याचे उत्तेजन द्या. यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत पृष्ठे १४-१५ यावर आधारित वडील आणि एकदोन सेवा सेवकांची चर्चा. नवीन लोकांनी सभांना उपस्थित राहणे का महत्त्वाचे आहे याची चर्चा करा. कारण सभांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना बोध, उत्तेजन आणि साहाय्य मिळेल. आपल्या पाच साप्ताहिक सभांची उजळणी करा आणि हरएक सभेचे महत्त्व काय ते सांगा. सदाचरण राखण्यास, आध्यात्मिकता वाढवण्यास, संघटनेच्या समीप येण्यास एकमेकांसोबत घनिष्ठ संबंध राखण्यास आणि आपल्या सेवेचा उद्देश काय याची समज प्राप्त करण्यास कशाप्रकारे आपल्या सभा मदत करतात याची चर्चा करा. नवीन लोकांना सभांना येण्यास उत्तेजन देण्यासाठी श्रोत्यांना वरील माहितीपत्रकाचा उपयोग करण्याचे प्रोत्साहन द्या.
२० मि: नवे जग भाषांतर—हीच आपली निवड. भाषण आणि प्रात्यक्षिके. सर्व धार्मिक संघटनांमध्ये केवळ आपलीच संघटना, यहोवाच्या अभिषिक्त उपासकांनी तयार केलेले बायबलचे भाषांतर प्रकाशित करते, त्याचा उपयोग करते आणि वितरणही करते. पैसा कमावणे किंवा विशिष्ट पंथाच्या विश्वासांचा पुरस्कार करणे हा त्यामागचा उद्देश नाही. उलट, देवाच्या नामाचा सन्मान करण्याची आणि इतरांना चांगल्याप्रकारे त्याची ओळख करून देण्याची इच्छा असे करण्याची आपल्याला प्ररेणा देते. सहसा इतर भाषांतरे समजण्यास फार कठीण असतात; तेव्हा, नवे जग भाषांतराचे प्रमुख फायदे काय याची उजळणी करा. (“प्रत्येक शास्त्रवचन” पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ३२७-३१. परिच्छेद ३ मध्ये दिलेल्या विवेचनांची नोंद घ्या, परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या सुधारित आवृत्तींच्या उदाहरणांचा उल्लेख करा आणि परिच्छेद २२-३ मध्ये दिलेले लाभ सांगा.) “तुमचे बायबल वेगळे आहे,” असा काही जण आक्षेप घेतात तेव्हा त्यांना कसे उत्तर द्यावे यावर दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा.—युक्तिवाद पुस्तक, पृष्ठे २७९-८०.
गीत २०५ (२८) आणि समाप्तीची प्रार्थना.