वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०० पृ. ८
  • मुस्लिम व्यक्‍तीशी संभाषण कसे कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुस्लिम व्यक्‍तीशी संभाषण कसे कराल?
  • आमची राज्य सेवा—२०००
  • मिळती जुळती माहिती
  • सर्व भाषीयांना व धर्मीयांना साक्ष देणे
    आमची राज्य सेवा—१९९८
  • देवाकडून आनंदाची बातमी! या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग पुनर्भेट घेण्यास व बायबल अभ्यास सुरू करण्यास केला जाऊ शकतो
    आमची राज्य सेवा—२०१३
  • इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • माहितीपत्रकांद्वारे सुवार्तेची घोषणा करा
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०००
km १/०० पृ. ८

मुस्लिम व्यक्‍तीशी संभाषण कसे कराल?

१ तुम्ही मुस्लिम धर्माच्या व्यक्‍तीशी संभाषण केले असल्यास तुमच्या लक्षात आले असेल, की मुस्लिम लोकांचा देवावर गाढ विश्‍वास असतो. परंतु, त्यांच्यापैकी बहुतेकांना यहोवाच्या संदेष्ट्यांनी भाकीत केलेल्या नव्या जगाची इतकी कल्पना नसते. तेव्हा, येणाऱ्‍या नव्या जगाविषयी आपण त्यांना सांगू नये का? (१ तीम. २:३, ४) पुढील माहिती मुस्लिम व्यक्‍तीशी चांगल्याप्रकारे संभाषण करण्यास उपयुक्‍त ठरू शकेल.

२ मुस्लिम लोक अल्लाहवर किंवा देवावर विश्‍वास ठेवतात आणि मुहंमद हा देवाचा नबी (संदेष्टा) किंवा पैगंबर आहे असे ते मानतात. कुरआन हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे आणि इस्लाम हा त्यांचा धर्म आहे; इस्लामचा अर्थ “अधीनता” असा होतो. कुरआननुसार लबाडी आणि मूर्तिपूजा करणे चुकीचे आहे; त्यात असेही म्हटले आहे, की देव एकच आहे. तो त्रैक्याचा भाग नाही. परंतु, कुरआनमध्ये अमर आत्मा, नरक आणि स्वर्गीय परादिस यांविषयीची शिकवण देण्यात आली आहे. बायबल हे देवाचे वचन आहे असे मुस्लिम लोक मानतात; पण, त्यांच्या मते, बायबलमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. कुरआन मात्र होते तसेच आहे. त्यात काहीएक बदल झालेला नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

३ मैत्रिपूर्ण, व्यवहारकुशल आणि सुज्ञ असा: त्यांच्याशी संभाषण करताना नेहमी मैत्रिपूर्ण आणि व्यवहारकुशल असा. (नीति. २५:१५) या गोष्टीचे कधीही विस्मरण होऊ देऊ नका, की मुस्लिम लोकांकडून त्यांच्या लहानपणापासूनच अनेक धार्मिक शिकवणुकी तोंडपाठ करवून घेतल्या जातात आणि त्यांचे खोलवर मुळावलेले विश्‍वास असतात. त्यामुळे धार्मिक शिकवणुकींवर तर्क करण्यास तसेच देवाची इच्छा काय आहे याचे स्वतःहून परीक्षण करण्यास त्यांना शिकवलेले नसते. (रोम. १२:२) तेव्हा, मुस्लिम लोकांशी बोलताना धीर धरणे आणि समजुतदारपणा दाखवणे अत्यंत जरूरीचे आहे.—१ करिंथ. ९:१९-२३.

४ त्यांच्याशी बोलताना असे काहीही बोलण्याचे टाळा ज्यामुळे ते तुमचा संबंध ख्रिस्ती धर्मजगताशी जोडतील. आपण कॅथलिक किंवा प्रॉटेस्टंट नाहीत, त्यांच्यापासून फार वेगळे आहोत हे त्यांना स्पष्टपणे सांगा. बायबलचा उल्लेख करताना “बायबल” असे म्हणण्याऐवजी देवाचा ग्रंथ असे म्हणा. तसेच, “देवाचा पुत्र” या अभिव्यक्‍तीचा त्यांना तीव्र तिटकारा असल्यामुळे या अभिव्यक्‍तीचा प्रयोग न करणे केव्हाही चांगले किंवा मग घरमालकाने आध्यात्मिक प्रगती केल्यानंतर हा विषय काढणे श्रेयस्कर ठरेल. पण याचा अर्थ, येशूचा उल्लेखच करायचा नाही असे नाही. येशूचा उल्लेख जरूर करावा परंतु एक नबी किंवा पैगंबर या नात्याने. वाद घालण्याचे कटाक्षाने टाळा. वादविवाद किंवा भांडण होण्याचे चिन्ह दिसताच सभ्यतापूर्वक तेथून निघून जा.

५ एकाच वेळी चारपाच लोकांशी बोलण्यापेक्षा एका वेळी एकाच व्यक्‍तीशी बोलणे केव्हाही उत्तम. शिवाय, ख्रिस्ती बहिणींनी मुस्लिम स्त्रियांशी आणि ख्रिस्ती बांधवांनी मुस्लिम धर्माच्या पुरुषांशी बोलणे सहसा उचित ठरते. अर्थात, असे करणे नेहमीच शक्य होणार नाही. अशावेळी समजबुद्धीचा वापर करा. स्त्रियांची केशभूषा आणि वेशभूषा यांबाबतीत मुस्लिम लोकांच्या विशिष्ट संकल्पना असतात; तेव्हा आपल्या पेहरावामुळे ते अडखळणार नाहीत याची ख्रिस्ती बहिणींनी काळजी घ्यावी.—१ करिंथ. १०:३१-३३.

६ कोणत्या विषयांवर बोलणार: मुस्लिम धर्माच्या व्यक्‍तींशी बोलताना देवाच्या आणि त्याच्या प्रेमाच्या महानतेविषयी बोला. आमचा देवावर विश्‍वास आहे, देव (त्रैक्याचा भाग नाही) एकच आहे आणि मूर्तिपूजा करणे चुकीचे आहे असे म्हणण्यास कचरू नका. आज जगभरात माजलेल्या दुष्टाईविषयी अर्थात युद्धे, दंगली, वांशिक भेदभाव आणि धर्मांतला दांभिकपणा या विषयांवर बोला.

७ द गाइडन्स ऑफ गॉड—आवर वे टु पॅरडाईज या माहितीपत्रकात मुस्लिम धर्माच्या लोकांशी संभाषण कसे सुरू करता येईल यावर अधिक माहिती दिलेली आहे. मनमोकळेपणे बायबल अभ्यास करू इच्छिणाऱ्‍या मुस्लिम लोकांची रूची लक्षात घेऊन हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे.

८ सुचवलेली एक प्रस्तुती विचारात घ्या:

◼ “आज तुमच्या परिसरात राहणाऱ्‍या सर्व मुस्लिम लोकांची भेट घेण्याचा मी खास प्रयत्न करत आहे. तुमच्या धर्माविषयी मी थोडंफार वाचलंय आणि मला समजलं, की एकाच खऱ्‍या खुदावर तुमचा विश्‍वास आहे आणि तुम्ही सर्व नबींना मानता. बरोबर आहे ना? [उत्तरासाठी थांबा] अनेक शतकांपूर्वी लिहिलेल्या एका भविष्यवाणीविषयी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. या भविष्यवाणीत असं सांगण्यात आलं आहे, की लवकरच सबंध धरतीचं रूपांतर खुबसुरत परादीसमध्ये होणार आहे. ही भविष्यवाणी लिहिणाऱ्‍या नबीचेच शब्द आपण वाचून पाहू. [यशया ११:६-९ वाचा] ही भविष्यवाणी वाचल्यानंतर मला या माहितीपत्रकात दिलेल्या कुरआनच्या एका उताऱ्‍याची आठवण येते.” मग, गाइडन्स ऑफ गॉड या माहितीपत्रकातील पृष्ठ ९ काढा आणि त्यात मोठ्या अक्षरांत दिलेला मजकूर वाचा. ‘पृथ्वीचे वारस आमचे नेक बंदे ठरतील,’ असे त्या मजकुरात सांगण्यात आले आहे. संबंधित व्यक्‍तीने आस्था दाखवल्यास बाजूच्याच पानावरील ७ ते ९ परिच्छेदांची चर्चा करून तुम्हाला संभाषण चालू ठेवता येईल. घरमालकाला माहितीपत्रक द्या आणि पुन्हा भेट घेण्याची योजना करा.—मुस्लिम व्यक्‍तीशी संभाषण कसे करावे याची आणखीन एक पद्धत फेब्रुवारी १९९८ ची आमची राज्य सेवा, पृष्ठ ६, परिच्छेद २३ यात दिलेली आहे; तिचाही उपयोग केला जाऊ शकतो.

९ मुस्लिम व्यक्‍तीसोबत गाइडन्स ऑफ गॉड माहितीपत्रकातील माहिती अभ्यासताना बायबल अभ्यास न म्हणता केवळ चर्चा म्हणा. त्यामुळे संपूर्ण माहितीपत्रक अभ्यासल्यानंतर ती व्यक्‍ती अपेक्षा माहितीपत्रकातून किंवा ज्ञान पुस्तकातून अभ्यास करण्यास कदाचित तयार होईल. संस्थेने खास मुस्लिम लोकांसाठी काही साहित्य प्रकाशित केले आहे. उदाहरणार्थ, परादीसकडे नेणारा मार्ग कसा शोधावा आणि टाइम फॉर ट्रू सब्मिशन टु गॉड.

१० इस्लाम धर्माच्या लोकांचा काय विश्‍वास आहे, कशामुळे त्यांच्या भावना दुःखावल्या जाण्याची शक्यता आहे याबद्दलची माहिती असल्यास मुस्लिम लोकांना कोणते साहित्य द्यावे, त्यांच्याशी कसे संभाषण करावे याबाबतीत आपण आपल्या समजबुद्धीचा वापर करू. आपण असे केल्यास, सर्व जातीधर्माच्या लोकांना देवाच्या नावाचा धावा करण्यास मदत करण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करू त्यांवर यहोवा जरूर आशीर्वाद पाठवील.—प्रे.कृत्ये २:२१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा