वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९९ पृ. १
  • मुले—“परमेश्‍वराने दिलेले धन”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुले—“परमेश्‍वराने दिलेले धन”
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km १०/९९ पृ. १

मुले—“परमेश्‍वराने दिलेले धन”

१ “बालकांच्या कल्याणाच्या दृष्टीने वेळीच आवश्‍यक गुंतवणूक न केल्यास, सबंध मानव समाजापुढे असलेले दीर्घ पल्ल्याचे मूलभूत प्रश्‍न, आहेत तेथेच राहतील.”—संयुक्‍त राष्ट्रे बाल निधी. या शब्दांत, मे ८, १९९९ च्या सावध राहा! मासिकाच्या मुख्य लेखांची सुरवात झाली होती. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्यापैकी प्रत्येकालाच सदर मासिकाचे वितरण करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याची आणि लहान मुले आज कोणत्या दैन्यावस्थेत आहेत ते प्रकाशात आणण्याची संधी मिळाली.

२ या जगव्याप्त मोहिमेत सहभाग घेताना, देवाच्या सर्व लोकांपैकी खासकरून पालक असलेल्या ख्रिस्ती लोकांना किती आनंद झाला असेल! पालक या नात्याने आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडण्यात बायबलमध्ये दिलेल्या उपयुक्‍त मार्गदर्शनापासून तर त्यांना लाभ झालाच असेल; पण त्यासोबतच, मुलांना देवाच्या मार्गांनुसार वाढवण्यास हवे हे इतरांना सांगण्याच्या कामातही ते अग्रेसर असले असतील यात शंका नाही. या मोहिमेत, धार्मिक वृत्तीच्या आपल्या मुलांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेला होता; आणि यामुळे त्यांचे ऐकणाऱ्‍या लोकांवर निश्‍चितच एक सकारात्मक छाप पडली असावी.—नीति. १:८, ९.

३ सभांना उपस्थित राहिल्याने मुलांना मोठा लाभ होतो. ख्रिस्ती मंडळीमध्ये, महान शिक्षक यहोवा याच्याकडून शिक्षण घेण्याची सुसंधी त्यांना लाभते. आणि थोर शिक्षक येशू ख्रिस्त याचे ऐकल्यामुळे त्यांना त्याचे अनुकरण करण्यास मदत होते. पण, या सर्वांपेक्षा, ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास’ लहानग्यांना आणि खासकरून तरुणांना मदत करण्याच्या उद्देशाने विशेष प्रयत्नशील आहे; विश्‍वासू आणि बुद्धिमान दास केवळ लहानग्यांना आणि तरुणांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांना देखील समयोचित सल्ला, मार्गदर्शन देत आहे.

४ आध्यात्मिकरित्या आपल्या मुलांना सतत मदत करण्यासाठी पालक काय करू शकतात? जगातली मुले संकटात असून त्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे हे जितके खरे तितकेच, जगिक प्रभावांपासून ख्रिस्ती मुलांचे पूर्वी कधी नव्हते इतके आता संरक्षण करण्याची गरज आहे हे देखील तितकेच खरे आहे. त्यासाठी कौटुंबिक अभ्यास एकमेव उपाय आहे. आपण अद्याप आपल्या घरात कौटुंबिक अभ्यास चालू केलेला नसेल तर तो आजच्या आजच सुरू करावा असे प्रोत्साहन आपल्याला देण्यात येते. (नीति. २:१-५) अर्थपूर्ण कौटुंबिक अभ्यास आणि त्याच्या जोडीला सभांची नियमित उपस्थिती या दोन गोष्टी आपल्या मुलांची फसवणूक करणाऱ्‍या दियाबल सैतानाचे प्रयत्न निष्फळ करण्यास आपल्या मुलांना बळकट करतील.—इफिस. ६:११, १२, १६.

५ मुलांचे पालनपोषण करणे हा पालकांना लाभलेला एक अद्वितीय विशेषाधिकार आहे. मुले ही, आपला स्वर्गीय पिता यहोवा देव याने पालकांना दिलेली एक ईश्‍वरी ठेव आहे. तेव्हा, ते नक्कीच एक मोठे, जबाबदारीचे काम आहे. पण, मुलांसाठी आताच वेळ दिल्यास, कष्ट घेतल्यास आपली मुले पुढे चालून आदरणीय आणि ईश्‍वरशासित स्त्रीपुरुष होतील हे पाहण्याचा अनुभव किती आनंददायी असेल!—स्तोत्र १२७:३-५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा