वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/९९ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km ८/९९ पृ. ७

घोषणा

◼ ऑगस्टसाठी साहित्य सादरता: पुढील कोणतीही ३२-पानी माहितीपत्रके वापरली जाऊ शकतात: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पाहा! मी सर्व काही नवीन करतो,” आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, मृतांचे आत्मे—ते तुमची मदत किंवा तुम्हाला नुकसान करू शकतात का? ते खरोखर अस्तित्वात आहेत का? (इंग्रजी), युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक. सप्टेंबर: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. ऑक्टोबर: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान.

◼ वर्षभरात असे काही दिवस येतात जेव्हा मुलांना आणि नोकरी करणाऱ्‍यांना सुट्टी असते. तेव्हा, मंडळ्यांना क्षेत्र सेवेतील सहभाग वाढवण्याची यापेक्षा उत्तम संधी कोणती असू शकते? या सुटीच्या दिवशी गट साक्षीकार्य करण्यासाठी मंडळीतल्या वडिलांनी योजना करावी आणि याबद्दल आधीच मंडळीला कळवावे.

◼ प्रत्येक मंडळीला तीन लिटरेचर इंव्हेंटरी (S-AB-18) फॉर्म दिले जातील. महिन्याअखेरीस मंडळीच्या साठ्यात असलेल्या साहित्यांची यादी तयार करण्याकरता मंडळीच्या सचिवांनी ऑगस्टच्या सुरवातीलाच साहित्य सेवकांशी भेटून एक दिवस ठरवावा. सर्व साहित्यांची अचूक मोजणी करून लिटरेचर इंव्हेंटरी फॉर्मवर एकूण संख्या नोंदवावी. शिल्लक नियतकालिकांची एकूण संख्या नियतकालिक सेवकाकडून प्राप्त केली जाऊ शकते. कृपया कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर ६ च्या आधी संस्थेला याची मूळ प्रत पाठवून द्यावी. त्याची एक नक्कल तुमच्याजवळ ठेवा. आणि कच्ची प्रत म्हणून तिसऱ्‍या प्रतीचा उपयोग केला जाऊ शकतो. या कामावर मंडळीच्या सचिवांनी देखरेख करावी आणि भरून काढलेला फॉर्म अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी तपासावा. मग, सचिव आणि अध्यक्षीय पर्यवेक्षक दोघांनीही त्या फॉर्मवर सही करावी.

◼ काँग्रीगेशन ॲनलीसीस रिपोर्ट फॉर्मवर (S-10) नोंद करण्यासाठी संख्या संकलित करण्याचे कामही मंडळीचे सचिव पाहतील. पब्लिशर रेकॉर्ड कार्ड्‌समधील (S-21) आवश्‍यक माहिती तक्‍त्‌याच्या स्वरूपात अचूकपणे मांडली जाते याची खात्री करण्यासाठी अहवाल संकलित करण्यात मदत करणाऱ्‍या वडिलाला अथवा सेवा सेवकाला सचिव सूचना देतील. फॉर्म भरण्याआधी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून काढा. काँग्रीगेशन ॲनलीसीस रिपोर्ट फॉर्म अचूकपणे आणि व्यवस्थितपणे भरला जावा आणि त्यावर सही करण्याआधी सेवा समितीने तो काळजीपूर्वक तपासून घ्यावा. कृपया फॉर्म S-10 ची मूळ प्रत सप्टेंबर १० च्या आधी कोणत्याही परिस्थितीत संस्थेला पाठवून द्यावी. आणि त्याची एक नक्कल तुमच्या फाईलमध्ये ठेवा.

◼ ऑगस्ट १६, १९९९ ते ऑगस्ट ३१, १९९९ दरम्यान लोणावळा बेथेलमध्ये तसेच कोट्टायम आणि चेन्‍नई बुक डेपोमध्ये सर्व शिल्लक साहित्यांची यादी तयार करण्याचे काम चालू असेल. तेव्हा या काळादरम्यान संस्था कोणतीही मंडळीची साहित्य मागणी पाठवू शकणार नाही किंवा स्वीकारू शकणार नाही.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

मूलभूत बायबल शिक्षण (बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍यांसाठी आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित या पुस्तकातले प्रश्‍न असलेली ३२ पानी पुस्तिका)—आसामी.

यहोवाचे गुणगान करा-हिंदी (२९ गीतांचे माहितीपत्रक). यासाठी मंडळ्या संस्थेला आपल्या मागण्या पाठवू शकतात. पायनियर, प्रचारक आणि जनतेसाठी प्रत्येक प्रतीची किंमत ५.०० रुपये आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा