घोषणा
◼ मे महिन्याकरता साहित्य सादरता: खास पत्रिका मोहीम. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. आस्था दाखवणाऱ्यांसाठी अपेक्षा माहितीपत्रक सोबत न्यावे आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा. जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतीही ३२ पृष्ठांची माहितीपत्रके: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एग्झिस्ट?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक.
◼ आम्हाला हे सांगण्यास आनंद होतो, की येथून पुढे संस्थेच्या कन्नड भाषेतील साहित्यांत “क्रमदा पायनियर” याऐवजी “रेग्युलर पायनियर” या शब्दप्रयोगाचा वापर केला जाईल.