आपण लोकांचे धर्मांतर करतो हा सर्वसामान्यपणे घेतला जाणारा आक्षेप आपण यशस्वीरित्या कसा हाताळू शकतो?
आपण असे म्हणू शकतो:
▪ “तुमच्या या प्रश्नावरून तुम्ही धार्मिक प्रवृत्तीचे आहात असे दिसते. आम्ही तुमच्या भावनांचा, तुमच्या विचारांचा आदर करतो आणि तुम्ही देखील आमच्या भावनांचा, विचारांचा आदर करत असाल अशी आशा आहे. खरे तर, देवावर विश्वास ठेवणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांची भेट घेण्यात आम्हाला खूप आनंद वाटतो. लोकांची भेट घेण्यामागील आमचा हेतू, विश्वास बळावणे आणि मनुष्यासाठी देवाचा एक उद्देश आहे हे लोकांच्या लक्षात आणून देणे हा आहे.”
▪ “कोणी कुणाचं धर्मांतर करू शकतं असं आम्हाला तरी वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला स्वतःचं परिवर्तन करावं लागतं. उदाहरणार्थ, एखाद्या धूम्रपान करणाऱ्या किंवा मद्यपी व्यक्तीचे परिवर्तन करून त्याला कोणी निर्व्यसनी बनवू शकतो का? हे त्याला स्वतःलाच करावं लागेल. आपण फक्त त्याला बजावून सांगू शकतो, की धूम्रपान किंवा मद्यपान आरोग्यासाठी घातक आहे.”
▪ “खरं म्हणजे, आमचे दर्जे अतिशय उच्च स्वरूपाचे आहेत. आणि आमच्या संघटनेचा सदस्य बनण्यासाठी एखाद्याला प्रामाणिक, कष्टाळू असण्याची तसेच सर्व कर भरण्याची गरज आहे; त्यानं खोटं बोलू नये, कुणाची फसवणूक करू नये, शिवीगाळ करू नये, आपल्या कुटुंबाचा सांभाळ करावा अशा अनेकानेक गोष्टी त्याला कराव्या लागतात. आणि तुम्हाला काय वाटतं, किती लोक खरं हे सगळे बदल करण्यास तयार असतात? खरं तर, वारंवार मदत करूनही जे लोक या उच्च दर्जांचे पालन करत नाहीत त्यांना बहिष्कृत करावं लागतं.”
▪ “काहींना असं वाटतं, की आम्ही धर्मपरिवर्तन करतो पण असं करून आम्हाला खरं काय फायदा होणार? आज जगभरात इतका भ्रष्टाचार का माजला आहे याची कारणे सांगण्यासाठी आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या भेटी घेतो. खरं म्हणजे, आज या भ्रष्ट जगाचे एका चांगल्या जगात परिवर्तन होणे आवश्यक आहे; नाही का? हे शक्य आहे असं तुम्हाला वाटतं का?”