वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/९९ पृ. २
  • मेसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मेसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • उपशिर्षक
  • मे ३ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे १० ने सुरू होणारा सप्ताह
  • मे १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे २४ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे ३१ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९९
km ५/९९ पृ. २

मेसाठी सेवा सभा

मे ३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत  ७ (१७)

८ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त.

१७ मि: “इतरांना स्वतःचे हित साधण्यास शिकवा.” लेखाची प्रस्तावना एका मिनिटाच्या आत करून प्रश्‍नोत्तरांनी चर्चा सुरू करा. ज्ञान पुस्तकातील १३ व्या अध्यायाचा उपयोग करून बायबलच्या सिद्धान्तांचा अभ्यास केल्याने, ते समजून घेतल्याने तसेच ते अंमलात आणल्याने लोकांना व्यावहारिकरित्या कसा फायदा झाला आहे याची उदाहरणे द्या.

२० मि: खास पत्रिका मोहीम. एखाद्या वडिलाने उत्साही चर्चा करून तसेच प्रात्यक्षिके दाखवून हा भाग हाताळावा. वक्‍त्‌यासोबतच श्रोतेगणातील प्रत्येक व्यक्‍तीजवळ, या भागात विचारात घेतल्या जाणाऱ्‍या चार पत्रिकांचा एक संच आहे याची खात्री करा. पत्रिकांचा एकेक संच प्रत्येकाला देता यावा म्हणून सभा सुरू होण्यापूर्वीच मंडळ्या हे संच तयार करून ठेवू शकतात. पुरवणीतील परिच्छेद १-६ ची श्रोत्यांसोबत चर्चा करा. त्यानंतर परिच्छेद १० मध्ये दिलेल्या दोन प्रस्तुतींचा तसेच घेतला जाणारा एक सर्वसामान्य आक्षेप यशस्वीरित्या हाताळण्यासाठी पृष्ठ ६ वर दिलेल्या पेटीतील दोन पद्धतींचा उपयोग करून उत्तम तयारी केलेली दोन प्रात्यक्षिके दाखवा. मे महिन्यात होणाऱ्‍या या खास मोहिमेत सगळ्यांना सहभाग घेण्याचे प्रोत्साहन द्या.

गीत ११ (९) आणि समाप्तीची प्रार्थना

मे १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत १५ (२)

८ मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१२ मि: उन्हाळ्यात तुम्ही काय करणार आहात? पत्रिका मोहिमेत सहभाग घेणे, सहायक पायनियरींग करणे, सुट्टीला जाणे आणि मनोरंजन यांसाठी आपण काय योजना केल्या आहेत याची चर्चा एक कुटुंब करते. (मे १९९८ आमची राज्य सेवा, पृष्ठ ७ पाहा.) अनौपचारिक साक्षीकार्य करण्यासाठी काय योजना केल्या जाव्यात आणि हे कार्य कसे केले जावे याची चर्चा ते करतात तसेच संभाषण कसे सुरू करावे याचे प्रात्यक्षिक ते दाखवतात. व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक बायबल अभ्यास करण्याच्या, बाहेर कोठे गेले असल्यास तेथील मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याच्या आणि आपल्या मंडळीला आपला क्षेत्र सेवा अहवाल पाठवून देण्याच्या महत्त्वावर भर द्या. इतर मंडळ्यांना भेटी देताना कुटुंबाला यापूर्वी आलेल्या चांगल्या अनुभवांच्या तसेच आनंदाच्या आठवणी काढून ते चर्चा करतात. मंडळीत येणाऱ्‍या पाहुण्यांना आपण आदरातिथ्य कसे दाखवू शकतो याचीही ते चर्चा करतात.

२५ मि: खास पत्रिका मोहीम. चर्चा, अनुभव आणि प्रात्यक्षिके समाविष्ट असलेला हा भाग वडिलांनी हाताळावा. श्रोतेगणांतील प्रत्येकाजवळ विचारात घेतल्या जाणाऱ्‍या चार पत्रिकांचा एकेक संच आहे याची खात्री करा. मागच्या आठवडी केलेल्या चर्चेची संक्षिप्त उजळणी करा. एक किंवा दोन प्रचारकांना, सेवेत पत्रिकांचा उपयोग करताना आलेले उत्तेजनात्मक अनुभव कथित करण्यास सांगा. श्रोत्यांसोबत परिच्छेद ७-९, ११ आणि १२ ची प्रश्‍नोत्तरांनी चर्चा करा. पुरवणीतील परिच्छेद १० मध्ये दिलेल्या दोन प्रस्तुतींचा तसेच यशस्वीरित्या आक्षेप हाताळण्यासाठी पृष्ठ ६ वर दिलेल्या पेटीतील दोन पद्धतींचा उपयोग करून उत्तम तयारी केलेली दोन प्रात्यक्षिके दाखवा. जेथे कोठे साहित्य आणि पत्रिका दिल्या होत्या तेथे पुनर्भेटी करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

गीत १९ (४) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २७ (३)

१० मि: स्थानिक घोषणांचा भाग एखाद्या वडिलाने भाग हाताळावा. “राज्य सभागृहांसाठी कर्ज” याची चर्चा करा. कोणीही वैयक्‍तिक पातळीवरसुद्धा अनुदानांची विनंती करू नये यावर भर द्या.

१२ मि: “पूर्वयोजना करा!” येत्या काही महिन्यांत मंडळीतर्फे आयोजित केलेल्या सर्व ईश्‍वरशासित कार्यहालचालींची रूपरेषा सांगणारे भाषण. सगळ्यांना आपल्या कॅलेंडरवर त्यांची खूण करण्याचे तसेच इतर कोणत्याही गोष्टीला यांच्या आड येऊ न देण्याचे प्रोत्साहन द्या.

२३ मि: “आपली सेवा वाढवण्याचे मार्ग.” श्रोतेगणांतील काही बंधुभगिनी दोन वडिलांना काही प्रश्‍न विचारतात, आणि त्यांना दिलेल्या उत्तरांच्या माध्यमाने ते दोन वडील या लेखाची चर्चा करतात. आपल्याला आपली सेवा कशी वाढवता येईल याबद्दल दोन किशोरवयीन प्रचारक, एक विवाहित जोडपे आणि सेवा निवृत्त झालेला एक बांधव वडिलांना प्रश्‍न विचारतात. यावर, सदर लेखातून तसेच आपली सेवा या पुस्तकाच्या ९ व्या अध्यायातील पृष्ठे ११६-१८ वर असलेल्या, “भविष्यासाठी तुमची कोणती आध्यात्मिक ध्येये आहेत?” या माहितीवर आधारित व्यावहारिक सल्ले त्यांना दिले जातात. जवळच्या भवितव्यात आपली सेवा वाढवण्यासाठी योजना कशा कराव्यात यावर संस्थेने दिलेल्या उपयुक्‍त माहितीसाठी प्रचारक कृतज्ञता व्यक्‍त करतात.

गीत २९ (१८) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४१ (६)

१५ मि: स्थानिक घोषणा. कृपया आस्थेचा मागोवा घ्या (S-43) या फॉर्मच्या संदर्भात संस्थेने पाठवलेल्या ऑक्टोबर १५, १९९८ च्या पत्राची उजळणी करा. अनौपचारिक साक्षीकार्य करताना किंवा तुम्हाला येत नाही अशी भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीशी संपर्क आल्यास आस्थेचा पाठपुरावा करण्यासाठी या फॉर्मचा उपयोग कसा केला जाऊ शकतो ते सांगा. प्रचारकांना या फॉर्म्सचा चांगला उपयोग करण्याचे उत्तेजन द्या.

१२ मि: प्रश्‍न पेटी. वडिलांचे भाषण.

१८ मि: आपण विभाजनाच्या कार्यात सहभाग घेत आहोत का? जुलै १, १९९७ च्या टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे ३०-१ वर आधारित सेवा पर्यवेक्षकांचे उत्तेजनपर भाषण.

गीत ३२ (३) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे ३१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४३ (४)

१५ मि: स्थानिक घोषणा. सर्वांना आपला मे महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. जूनसाठी असलेल्या साहित्य सादरतेची उजळणी करा. ज्ञान पुस्तक सादर करताना मंडळीच्या अतिरिक्‍त साठ्यात असलेले कोणतेही १९२ पृष्ठांचे जुने पुस्तकही सादर केले जाऊ शकते. याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: स्थानिक गरजा.

१५ मि: माझ्या धर्मात काय कमी आहे? दोन सेवा सेवकांमधील चर्चा. सत्याबद्दल आपुलकी दाखवणारे तसेच यहोवाच्या साक्षीदारांचे कौतुक करणारे अनेक लोक आपल्याला भेटतात. पण, चर्चशी असणाऱ्‍या निकटच्या संबंधांमुळे मात्र पाऊल उचलण्यास ते का-कू करतात. शिवाय, एकमेव खरा धर्म केवळ आपल्यापाशी आहे आणि त्यांच्या उपासनेची पद्धत चुकीची आहे यावर इतक्या सहजासहजी त्यांचा विश्‍वास बसत नाही. आणि यामुळेच प्रामुख्याने त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीला खिळ बसते. इतर धर्म बायबलचे अनुकरण का करत नाहीत याबद्दल युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकात पृष्ठ २०४ वर दिलेल्या सहा कारणांची बांधव उजळणी करतात. आपल्या धार्मिक विश्‍वासांचे विश्‍लेषण करण्यास प्रामाणिक लोकांना मदत करण्यासाठी या मुद्द्‌यांचा उपयोग करण्याचे प्रोत्साहन श्रोत्यांना द्या.

गीत ५० (६) आणि समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा