ईश्वरशासित सेवा प्रशालेची चाचणी
ईश्वरशासित सेवा प्रशालेत जानेवारी ४ ते एप्रिल १९, १९९९ पर्यंतच्या आठवड्यांच्या दरम्यान हाताळल्या गेलेल्या साहित्यावर आधारित पुस्तकांचा वापर न करता घेण्यात येणारी चाचणी. नेमून दिलेल्या वेळेत तुम्हाला जितक्या प्रश्नांची उत्तरे देता येतील ती लिहिण्यासाठी वेगळ्या कागदाचा वापर करावा.
[सूचना: चाचणी परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी केवळ बायबल वापरावे. प्रश्नानंतर जो संदर्भ लिखित आहे तो केवळ तुमच्या व्यक्तिगत संशोधनासाठी आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी पृष्ठ व परिच्छेद क्रमांक देण्यात येतीलच असे नाही.]
पुढील विधानांची उत्तरे, खरे किंवा खोटे यात द्या:
१. बायबलमधील लिखाणाचा प्रत्येक वेळी शब्द न शब्द यहोवाने सांगितला नाही. (२ तीम. ३:१६) [w-MR९७ ६/१५ पृ. ५ परि. ३]
२. कौटुंबिक ऐक्य आणि मुलांचा आध्यात्मिक विकास संपूर्णपणे पालकांवर अवलंबून असतो. (नीति. २२:६) [fy-MR पृ. ८५ परि. १९]
३. “दाराशी पाप टपूनच” बसल्याने काईनापुढे गंभीर पाप करण्यावाचून दुसरा मार्ग नव्हता. (उत्प. ४:७) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९४ ६/१५ पृ. १४ परि. ११.]
४. किशोरवयीन जसजसे मोठे होतात तसतसे त्यांना मनोरंजनाची निवड करण्यात अधिक स्वातंत्र्य दिले जावे. [fy-MR पृ. ७३ परि. २०]
५. निर्माणकर्त्याला संतुष्ट करण्याची इच्छा असली, तर सर्व लोकांशी सतत खरे बोलण्यास आपल्याला अधिक प्रेरणा मिळते. (नीति. ६:१७) [g-MR९७ ३/८ पृ. २८ परि. ५]
६. प्रार्थनेमध्ये, ‘आपल्या तोंडचे शब्द आणि मनातील विचार यहोवाला मान्य’ होण्यासाठी आपण होता होईल तितके मोठमोठाले शब्द, उच्च भाषा वापरली पाहिजे. (स्तोत्र १९:१४) [w-MR९७ ७/१ पृ. २९ परि. ४–५]
७. उत्पत्ति २६:५ मध्ये उल्लेखिलेल्या आज्ञा, नियम आणि कायदे नियमशास्त्रातील आहेत. [साप्ताहिक बायबल वचन; पाहा w-MR९२ १०/१ पृ. १० परि. ८.]
८. लूक ८:४८ मध्ये “तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे,” असे येशूने म्हटले तेव्हा, त्या आजारी स्त्रीने बरे होण्याआधी येशू हा मशीहा आहे असा विश्वास दाखवायची गरज होती असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता. [w-MR९७ ७/१ पृ. ४ परि. २–४]
९. अनेक बायबल वचनांमध्ये “पृथ्वी” ही संज्ञा मानवजातीला किंवा मानवी समाजाला सूचित करण्यासाठी वापरली आहे; उत्पत्ती ११:१ येथे ही संज्ञा अशाचतऱ्हेने वापरण्यात आली आहे. [g-MR९७ २/८ पृ. १९ परि. ३]
१०. आपले कौमार्य गमावून बसण्यात दीनाची संमती होती असे जरी दिसून आले नाही, तरी काही अंशी ती त्यासाठी जबाबदार होती. (उत्प. ३४:१, २) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-८५ ६/१५ पृ. ३१ परि. ४.]
पुढील प्रश्नांची उत्तरे द्या:
११. उत्पत्ति ३:१–५ येथे दिलेल्या युक्तीवादाद्वारे सैतानाने काय सुचवले? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ७/१५ पृ. ५ परि. १.]
१२. प्रकटीकरण १९:१५ मध्ये, येशूच्या मुखातून निघणारी “तीक्ष्ण धारदार तलवार” कशाला सूचित करते? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-९० ५/१५ पृ. ४ परि. ४.]
१३. नोहाच्या दिवसातील जलप्रलयासंबंधी मोशेने विशिष्ट तारखा दिल्या त्यावरून कशावर जोर दिला जातो? [g-MR९७ ३/८ पृ. २५ परि. १]
१४. अब्राहामाने कशाप्रकारे “परमेश्वराच्या [यहोवा, NW] नावाने प्रार्थना केली”? (उत्प. १२:८) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-८९ ७/१ पृ. २० परि. ९.]
१५. यहोवाने पौलाला “माझी कृपा तुला पुरे आहे” असे म्हणण्याचा त्या संदर्भात काय अर्थ होता? (२ करिंथ. १२:९) [w-MR९७ ६/१ पृ. २५ परि. ३]
१६. लोटाच्या बायकोने मागे वळून पाहिले आणि ती मीठाचा खांब बनली ते कशामुळे? (उत्प. १९:२६) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९० १२/१ पृ. २० परि. १०.]
१७. चोरीच्या वस्तू खरेदी करण्याबाबत ख्रिश्चनांचा दृष्टिकोन काय आहे? (अनु. २२:१; यिर्म. १७:११) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-९२ ६/१५ पृ. ३० परि. ३; पृ. ३१ परि. १, ६-७.]
१८. उत्पत्ति ३३:१८ नुसार, कनानी लोकांबरोबर संबंध ठेवायची इच्छा नसल्याचे याकोबाने कसे दाखवून दिले? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९५ ९/१५ पृ. २१ परि. ४.]
१९. उत्पत्ति ३७:१३ मध्ये सांगितलेले योसेफाचे कार्य येशूच्या कार्याच्या समांतरेत कशाप्रकारे आहे? [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR८८ ४/१ पृ. २५ परि. १२.]
२०. राग व्यक्त करण्याबाबतीत, देव आणि मनुष्य यांमध्ये कोणता फरक आहे? [g-MR९७ ७/८ पृ. २९ परि. ३-४]
पुढे दिलेली विधाने पूर्ण करण्यास शब्द किंवा वाक्यांश पुरवा:
२१. कोणत्याही _________________________ कारणाविना इतरांवर _________________________ इराद्यांचा ठपका लावणे म्हणजे त्यांचा न्यायनिवाडा केल्याप्रमाणे आहे. [w-MR९७ ५/१५ पृ. २६ परि. ५]
This question is missing in vernacular
२२. रहबाम आणि एलीची उदाहरणे, मुलांवर अधिक _________________________ घातल्याने किंवा त्यांना अधिक _________________________ दिल्याने काय परिणाम होतात ते समजण्यास पालकांना मदत करू शकतात. [fy-MR पृ. ८०–१ परि. ९–१३]
२३. ईश्वरी _________________________ विकसित करण्यात, _________________________ संपादन करणे एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. [w-MR९७ ८/१ पृ. ४ परि. ५]
२४. अपराध कळवणे म्हणजे _________________________, _________________________ आणि _________________________ ख्रिस्ती तत्त्वांवर आधारलेली प्रीती दाखवणे होय. [w-MR९७ ८/१५ पृ. ३० परि. २]
पुढील विधानांतून अचूक उत्तर निवडा:
२५. (कडक; सौम्य; योग्य) शिस्त, मुलांवरील पालकांच्या प्रेमाचा पुरावा आहे. (इब्री १२:६, ११) [fy-MR पृ. ७२ परि. १८]
This question is missing in vernacular
२६. योहान ८:३२ येथे येशूने ज्या स्वातंत्र्याविषयी सांगितले ते (रोमी साम्राज्य; खोट्या धर्म समजुती; पाप आणि मृत्यू) यांपासून असलेले स्वातंत्र्य होते. [w-MR९७ २/१ पृ. ५ परि. १]
२७. उत्पत्ति २२:१८ च्या शेवटच्या पूर्णतेत संतान म्हणजे (इसहाक; इस्राएल लोक; येशू आणि १,४४,०००) होय. [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-MR९८ २/१ पृ. १४ परि. ८.]
२८. (मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करायचे असल्यामुळे; देव अस्तित्वात असल्यामुळे आणि त्याला असंतुष्ट करण्याचे हितकर भय असल्यामुळे; शिक्षेचे भय असल्यामुळे) योसेफ अनैतिक मोहाचा यशस्वीरित्या प्रतिकार करू शकला. (उत्प. ३९:९) [साप्ताहिक बायबल वाचन; पाहा w-८१ २/१५ पृ. ७ परि. २.]
पुढील शास्त्रवचने त्याखालील विधानांशी जुळवा:
नीति. ५:३, ४; १५:२२; २०:११; इफिस. ५:१९; २ तीम. ३:१६
२९. आपली मुले नैतिक आणि शुद्ध जीवन जगण्याच्या महत्त्वावर पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवतात याची पालकांनी खात्री करून घेणे आवश्यक आहे. [fy-MR पृ. ६७ परि. ८]
३०. किशोरवयीन आणि पालक यांच्यात खुले दळणवळण असावयाचे असेल, तर खाजगी बातचीत झाली पाहिजे. [fy-MR पृ. ६५ परि. ४]
३१. मंडळीच्या सभांमधील गायनामध्ये आपल्याला सुधार करायचा असेल, तर योग्य मनोवृत्ती महत्त्वाची आहे. [w-MR९७ २/१ पृ. २७ परि. ३]
३२. सार्वकालिक जीवनासाठी देवाचे वचन अर्थात बायबल यातील शिकवणींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. [w-MR९७ ८/१५ पृ. ६ परि. ५]
३३. अनैतिकतेचे पाश टाळण्यासाठी, प्रथम ती चुकीची आहे व तिचा परिणाम आपत्तीकारक व विपरित आहे हे आपण ओळखले पाहिजे. [fy-MR पृ. ९३ परि. ९]