वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९९ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९९
आमची राज्य सेवा—१९९९
km ४/९९ पृ. ७

घोषणा

◼ एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या वर्गण्या. आस्था दाखवणाऱ्‍यांसाठी अपेक्षा माहितीपत्रक सोबत न्यावे आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा. जून: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान. जुलै आणि ऑगस्ट: पुढील कोणतीही ३२ पृष्ठांची माहितीपत्रके: जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुम्ही त्रैक्य मानावे का?, तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी), देव आपल्याकडून काय अपेक्षितो?, देव खरोखरी आपली काळजी करतो का?, नंदनवन आणविणारे सरकार, भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी). उचित असेल तेथे पुढील माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात: आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?, स्पिरिट्‌स ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एग्झिस्ट?, युद्ध नसलेले जग कधी असेल का? (इंग्रजी) आणि सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक.

◼ नेमून न दिलेल्या क्षेत्रात कार्य करताना प्रचारक ज्ञान पुस्तक किंवा अपेक्षा माहितीपत्रक सादर करू शकतात. घरमालकाकडे ही दोन्ही प्रकाशने असल्यास दुसरे कोणतेही प्रकाशन सादर केले जाऊ शकते. घरी न भेटणाऱ्‍यांसाठी किंवा साहित्य न स्वीकारणाऱ्‍या लोकांसाठी सर्वांनी निरनिराळ्या पत्रिका आपल्याजवळ ठेवाव्यात. ज्या न नेमलेल्या क्षेत्रांमध्ये खास पायनियर कार्य करत असतील किंवा ही क्षेत्रे मंडळीच्या जवळपासच असतील अशा क्षेत्रांतील आस्थेचा मागोवा घेण्यासाठी खास प्रयत्न केले जावेत.

◼ संस्थेला सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षक आणि सचिव यांचे पत्ते आणि टेलिफोन नंबर यांची एक अद्ययावत नोंद ठेवणे जरूरीचे असते. त्यामुळे यांत काही बदल झाल्यास अध्यक्षीय पर्यवेक्षक/सचिव पत्त्यात बदल (S-29) फॉर्म सचिवांनी तत्परतेने भरून संस्थेला पाठवून द्यावा. कृपया त्यात व्यक्‍तीच्या नावाची आद्याक्षरे न देता संपूर्ण नाव द्या.

◼ मंडळीच्या सचिवांनी पुढील पायनियर फॉर्म्सचा पुरेसा साठा आपल्याजवळ ठेवावा: नियमित पायनियर सेवेसाठी अर्ज (S-205), सहायक पायनियर सेवेसाठी अर्ज (S-205b) आणि नियमित पायनियर सेवा स्थगित करण्यासाठी सूचना (S-206). या फॉर्म्सची मागणी साहित्य मागणी फॉर्म (S-14) यावर केली जाऊ शकते. या फॉर्म्सचा निदान एका वर्षाचा साठा ठेवला जावा. नियमित पायनियर अर्ज फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासून पाहावे. अर्जदारांना त्यांच्या बाप्तिस्म्याची तारीख आठवत नसल्यास त्यांनी अंदाजे तारीख घालून त्याची नोंद करून ठेवावी.

◼ सर्व मंडळ्यांना फेब्रुवारीच्या यादीसोबतच वार्षिक साहित्यांसाठी खास मागणी फॉर्म पाठवण्यात आला होता. ज्या मंडळ्यांनी अद्याप १९९९ साठी अधिवेशन बॅज काड्‌र्सच्या तसेच वर्ष २००० साठी वार्षिक साहित्यांच्या साठ्याची मागणी केलेली नसेल त्यांनी ती लगेच पाठवून द्यावी. पण, तुम्हाला प्लॅस्टिक बॅज कार्ड होल्डर्स हवे असल्यास अनेक साहित्यांचा समावेश असलेल्या तुमच्या नेहमीच्या साहित्य मागणी फॉर्मसोबत (S-AB-14) त्यांचीही मागणी केली जावी, कारण ने-आण करताना अशा लहानसहान वस्तू सहसा गहाळ होतात.

◼ डिसेंबर २०, १९९८ रोजी भारतातील २३ विद्यार्थी आणि नेपाळमधील ३ विद्यार्थी, लोणावळा येथे झालेल्या सेवा प्रशिक्षण प्रशालेतून पदवीधर झाले. हे विद्यार्थी २५ मंडळ्यांतून आले होते. त्यांच्यापैकी १८ विद्यार्थी आपल्या स्वतःच्या मंडळ्यांमध्ये सेवा करण्यास परतले तर बाकीच्या ८ विद्यार्थ्यांनी नवीन खास पायनियर म्हणून पूर्ण-वेळेची सेवा हाती घेतली. ज्या मंडळ्यांमध्ये सेवा करण्यासाठी या अविवाहित बांधवांना नियुक्‍त केले आहे त्या मंडळ्यांवर समृद्ध आशीर्वादांचा वर्षाव होवो अशी आमची प्रार्थना आहे.

◼ जानेवारी १, ११९९ च्या अंकापासून आमची राज्य सेवा आसामी आणि मिझो भाषांत उपलब्ध झाली आहे.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

शांतिमय नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५)—नेवारी

◼ उपलब्ध असलेली नवीन ऑडिओकॅसेट:

कुटुंबांनो - दैनिक बायबल वाचनास आपल्या जीवनाचा मार्ग बनवा—इंग्रजी, कन्‍नड, तामीळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी

पुढील प्रकाशनांचा साठा आता कायमचाच संपुष्टात आल्यामुळे जानेवारी १, १९९९ ची टेहळणी बुरूज प्रकाशन सूची अद्ययावत करण्याची गरज आहे:

पुस्तके: तुमचे तारुण्य - त्यापासून सर्वोत्तम लाभ मिळविणे आणि खरी शांती आणि सुरक्षितता - तुम्हाला कशी लाभेल?—मल्याळम

पुस्तिका: काळजी वाहणारा कोणी देव आहे का? आणि “राज्याची ही सुवार्ता”—तामीळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा